Powered By Blogger

Tuesday, October 3, 2017

चाल-ढकल..! :-)


♥ क्षण..! ♥

चाल-ढकल..! :-)

रात्री उशिराने अंधाराचा आधार घेऊन, पापण्यातून एक थेंब हळूच ओघळतो. कुणाला? स्वतःलासुद्धा नसेल, पण उशीला त्या थेंबाचं कारण आणि महत्त्व माहिती असतं. दिवसासाठी ओढलेला मुखवटा एवढ्या सहज गळून पडल्यावर, अंधाराची जी भीति वाटते ना ती मग इतर कुणाचीही वाटत नाही. अंधार सत्य आणि शाश्वततेची जाणिव करुन देऊ शकतो. दिवस या जाणिवेची उणीव भरुन काढू शकत नसतो. जी चाल-ढकल रोज करतो ना आपण ती याच आयुष्याची. आतल्या आत आणि मनातल्या मनात आपण आणखीन एक वेगळं आयुष्य जगत असतो. जे फक्त आपल्या स्वतःला माहीत असतं. याची वच्यता कुठे चुकून करावी किंवा ओघवती झाली देखील; तरीही आपण ती बंद ओठांच्या ओशाळ हसण्यावर अधांतरी तोलत ठेवत असतो. याचं मूळ कारण स्वतःने स्वीकारलं असतं तर मांडावे लागले नसते आणि स्वतःशीच भांडावे कधीच लागले नसते..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment