Powered By Blogger

Wednesday, April 18, 2018

बसेरा-ठिकाणा..! :-)



♥ क्षण..! ♥

बसेरा-ठिकाणा..!


ना जाने कितनी हसरते हैं उनकी,

एकदा बघितलं अन् बघतच राहिलो,
तुझी तू, माझा मी शोधतच राहिलो..

कभी शिकवा की तो कभी नफरत की,

म्हटलं आता सगळंच सये ठीक होईल,
तू ही येऊन जाशील अन् मी पूर्ण होईल..

हद तो तब हुई जब यें रिश्ता तय हुआ,

आपल्या तेव्हा एवढंच तर लक्षात आलं,
तू-मी सोडून सगळंच विरोधी पक्षात गेलं..

अब और क्या? इतनाही बहोत काफी हैं,

मी अगदी सहज दोन कप कॉफी मागवली,
तू मात्र सये उठून माफी मागून चालली गेली..

फितरत बदली शहर तक मैंने बदल दिया,

चारही दिशा माझ्या केल्यास तू मोकळ्या,
ओंजळीत आता फक्त सुकलेल्या पाकळ्या..

फिर एकबार मुलाकात हुई और होती रहीं,

पाऊस होऊन मी थेंब-थेंब बरसत राहिलो,
ओंजळ झुगारुन इतःस्त: तरसत राहिलो..

जो हुआ भूल जाओ, फिर अजनबी बन जाओ,

तुला मग आठवत राहिलो पानं पलटत राहिलो,
कधी उशात कधी मनात उगाच दाटत राहिली..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Friday, April 13, 2018

जय भीम..! :-)

:-)
जय भीम..!

नेहमी मला वेगळ ठेवलं
जागो जागी कमी लेखलं,
शुद्र म्हणूनच दुर केलेलं
अभद्र म्हणत हिनवलेलं..

माणूस म्हणून विचारलं
तर तुच्छच जात म्हणालं,
ढुंगन धुवायलाच लावलं
स्मशाना जवळ घर केलं..

पाण्यासाठीच तरसवलं
विहिरीवरच नागड केलं,
मागासलो तर का चुकलं
कुत्र त्यांच दारात बांधलं..

घर त्यांच रोजच सावरलं
आज उभ जाळून टाकलं,
चौकटीत शिळंपात खाल्ल
अन् म्हणे ते दिवटं माजलं..

हाणून पाडली त्यांची प्रथा
मुस्काट शेकते माझी कथा,
पुजत नाही कधी दगडाला
माणुसकीतच माझी आस्था..

शोषू नकोस या समाजाला
पोसू नकोस त्या रे शंढाला,
ठेचूनच काढा रे या विंचूला
जे धर्म म्हणे पुजला पाचवीला..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

"महामानवास विनम्र अभिवादन..!"
..भीमराज का बेटा मैं जय भीम वालां हुं..!

Sunday, April 8, 2018

विरक्ती..! :-)



♥ क्षण..! ♥

विरक्ती..!

पायरीपासून गाभाऱ्यापर्यंत लागलेली धाप..हापापले होऊन प्रसादासाठी ओंजळ पुढे करताच लागलेली ठेच..शेंदूर फासून खुशाल कितीतरी अभंगांचा स्वामी बनलेला तो..पोरका, उपरा करुन गेल्यावर मागणं घ्यायला झोळीत पडतं काय?.. प्रथा, कृती कितीतरी आकृतींच सृजन करुन वंचित राहिलेलं..क्रोधाची गर्भधारणा होऊनही व्यक्ततेच्या प्रसूतीनंतर निपजले दूषणं..अनावृत्त करावं म्हटलं तेव्हा पद्धत चुकली..प्रसारित करावं म्हटलं तेव्हा बांधणी खचली..पटलांवरचे वलय आवर्तन समजून ओढले तेव्हा..ते ही तर मुखवटेच!..भक्त मग कुणाचा आणि देवही कुणाचा?..वाटणी करुन झाल्यावर हवं ते न मिळाल्याची आर्तता आतल्याआत..प्रसन्नता मग कोणत्या मातीने घडवावी?..दाहकतेच्या उंबरठ्यावर अतृप्त आत्मा तो ही आहे आणि हा ही आहे!..तहानलेला, कोरडा पडत आलेला कंठ तरीही खर्जात सुमने गात येतो..श्रवण करणे त्या क्षणी कानांना सुचते कुठे?..तल्लीनतेच्या भावबंधावर प्रबोधन रचिते कुठल्याही प्रांताचे नसतात..तेव्हा ही विरक्ती शाबूत राहून पत्करावी..कारण यहींच सच हैं बाकी सब मोह माया हैं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Saturday, April 7, 2018

कंचणी..! :-)




♥ क्षण..! ♥

कंचणी..!

ए हाड हाssssड
थोडीही नाही चाड,
ढळला पदर अन्
जमली कुत्री भ्याड..
काही अंगलट येऊन
देह ओरबाडून गेले,
खुडून कोवळी कळी
फूल निष्प्राण झाले..
त्राण एकवटून कंठात
दबली वाघिणीची दहाड,
लांडग्यांची पैदास अन्
अवसेची एकादस आड..
दोष काय होता सांगा
आक्रोश आज अंगणी,
गळ्या भोवती भोवली
स्वतःच्या वेणीची कंचणी..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Thursday, April 5, 2018

आतलं..! :-)



♥ क्षण..! ♥

आतलं..!

एकदा मग असं झालं
मनातलं मनात राहिलं,
वाटलं वाचू लिहिलेलं..पण
पानातलं पानात राहिलं..

मागे पुढे पाऊल पडलं
दूरवर चालणं होत गेलं,
काही अंतरावर भेटलो..पण
पुढचं पान पलटत गेलं..

सहज मग गोष्टीतून कळलं
चारचौघात मी बोलून पाहिलं,
गोष्टच होती गोष्टच ठेवली..पण
शब्दांत श्वासांना कोंडलं गेलं..

जमवत गेलो जमतही गेलं
दारामागून दार बंदही झालं,
गोष्टच होतो सांगत मी..पण
गोष्टीतून मलाच वजा केलं गेलं..

तेव्हा तिथेच मग माझं ठरलं
मांडू क्षणभंगुर क्षणी क्षणातलं,
बरंच काही आतल्याआतलं..अन्
सर्वकाही थोडं यातलं थोडं त्यातलं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

का कळे ना..! :-)




का कळेना
असे का व्हावे
तू सतत बोलावे
मी मुकाट ऐकावे

का कळेना
असे का व्हावे
थांबलेल्या क्षणाने
आठवांना उजळावे

का कळेना
असे का व्हावे
हृदयातली स्पंदने
पुन्हा नव्याने स्मरावे

का कळेना
असे का व्हावे
का कळेना
असे का व्हावे....!
- मृदुंग®