♥
♥ क्षण..! ♥
विरक्ती..!
पायरीपासून गाभाऱ्यापर्यंत लागलेली धाप..हापापले होऊन प्रसादासाठी ओंजळ पुढे करताच लागलेली ठेच..शेंदूर फासून खुशाल कितीतरी अभंगांचा स्वामी बनलेला तो..पोरका, उपरा करुन गेल्यावर मागणं घ्यायला झोळीत पडतं काय?.. प्रथा, कृती कितीतरी आकृतींच सृजन करुन वंचित राहिलेलं..क्रोधाची गर्भधारणा होऊनही व्यक्ततेच्या प्रसूतीनंतर निपजले दूषणं..अनावृत्त करावं म्हटलं तेव्हा पद्धत चुकली..प्रसारित करावं म्हटलं तेव्हा बांधणी खचली..पटलांवरचे वलय आवर्तन समजून ओढले तेव्हा..ते ही तर मुखवटेच!..भक्त मग कुणाचा आणि देवही कुणाचा?..वाटणी करुन झाल्यावर हवं ते न मिळाल्याची आर्तता आतल्याआत..प्रसन्नता मग कोणत्या मातीने घडवावी?..दाहकतेच्या उंबरठ्यावर अतृप्त आत्मा तो ही आहे आणि हा ही आहे!..तहानलेला, कोरडा पडत आलेला कंठ तरीही खर्जात सुमने गात येतो..श्रवण करणे त्या क्षणी कानांना सुचते कुठे?..तल्लीनतेच्या भावबंधावर प्रबोधन रचिते कुठल्याही प्रांताचे नसतात..तेव्हा ही विरक्ती शाबूत राहून पत्करावी..कारण यहींच सच हैं बाकी सब मोह माया हैं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment