Powered By Blogger

Friday, April 13, 2018

जय भीम..! :-)

:-)
जय भीम..!

नेहमी मला वेगळ ठेवलं
जागो जागी कमी लेखलं,
शुद्र म्हणूनच दुर केलेलं
अभद्र म्हणत हिनवलेलं..

माणूस म्हणून विचारलं
तर तुच्छच जात म्हणालं,
ढुंगन धुवायलाच लावलं
स्मशाना जवळ घर केलं..

पाण्यासाठीच तरसवलं
विहिरीवरच नागड केलं,
मागासलो तर का चुकलं
कुत्र त्यांच दारात बांधलं..

घर त्यांच रोजच सावरलं
आज उभ जाळून टाकलं,
चौकटीत शिळंपात खाल्ल
अन् म्हणे ते दिवटं माजलं..

हाणून पाडली त्यांची प्रथा
मुस्काट शेकते माझी कथा,
पुजत नाही कधी दगडाला
माणुसकीतच माझी आस्था..

शोषू नकोस या समाजाला
पोसू नकोस त्या रे शंढाला,
ठेचूनच काढा रे या विंचूला
जे धर्म म्हणे पुजला पाचवीला..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

"महामानवास विनम्र अभिवादन..!"
..भीमराज का बेटा मैं जय भीम वालां हुं..!

No comments:

Post a Comment