Powered By Blogger

Thursday, April 5, 2018

आतलं..! :-)



♥ क्षण..! ♥

आतलं..!

एकदा मग असं झालं
मनातलं मनात राहिलं,
वाटलं वाचू लिहिलेलं..पण
पानातलं पानात राहिलं..

मागे पुढे पाऊल पडलं
दूरवर चालणं होत गेलं,
काही अंतरावर भेटलो..पण
पुढचं पान पलटत गेलं..

सहज मग गोष्टीतून कळलं
चारचौघात मी बोलून पाहिलं,
गोष्टच होती गोष्टच ठेवली..पण
शब्दांत श्वासांना कोंडलं गेलं..

जमवत गेलो जमतही गेलं
दारामागून दार बंदही झालं,
गोष्टच होतो सांगत मी..पण
गोष्टीतून मलाच वजा केलं गेलं..

तेव्हा तिथेच मग माझं ठरलं
मांडू क्षणभंगुर क्षणी क्षणातलं,
बरंच काही आतल्याआतलं..अन्
सर्वकाही थोडं यातलं थोडं त्यातलं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment