क्षण..!
अनुभवातून..!
तो बराच वेळ बोलत होता माझ्याशी... बोलतं त्याला असेही मी केलं नाही...त्याच्या खांद्यावर हात ठेवला माझा अन् ध्यानस्त बगळ्यासारखा पायावर पाय ठेवून बाजुला बसलो... हट! यार, ती समजते काय स्वत:ला? आताच्या आता सिनेमाला ने, शहरा बाहेर दुरवर फिरायला ने, भसम्या झालाये अशी भुकेने कावरी बावरी होते अन् ढगभर मागवून चतकुरच खाते साध अर्धही खात नाही. चहा-कॅाफी--कोल्ड ड्रिंक काय साधी पाण्याची बाटली दोन घोट रिचवून बाकी तसंच टाकून देते. काय करावं कसं समजवावं काहीच कळत नाही. बोललो काही तर मन भरलेय कि समधान झालेय तुझे अन् शेवटी तुझं माझ्यावर प्रेमच नाही या निष्कर्शावर येवून सगळा सोक्ष-मोक्ष लावण्याचा पवित्रा घेते...इडियट..!
बोलणे सुरुच होते त्याचे न तिचे आगमन होते. तिला पाहून त्याचा पारा चढतो अन् तो उठून निघून जातो. चारचौघात त्याचं तिला असं लाजीरवाणं करणं तिच्या मनाला फार लागतं. डोळ्यांमधल्या पावसाला मग आभाळ कुठे हवं असतं? काही क्षण ओलाव्यात मोकळे होवून असाच आहे तो म्हणत आजुबाजुच्या दुकानातल्या गर्दीत तिची नजर हरवते.
एक साधारण चिमुरडी गर्दीशी झगडत दुकानदाराला चकोबार मागते. पैसे मोजून गर्दीशी झगडत थोडी बाजुला थांबते. वेष्टण उघडून चकोबारचा पहिला अस्वाद घेणार तोच पाठीमागच्या गर्दीतुन कुणाचा तरी नकळत धक्का लागतो. कोवळ्या हातातुन चकोबार निसटून मातीत विरघळू लागतो. एकटक त्याची होणारी अवस्था बघत जागीच खिळून उभी राहाते. त्या चिमुरडीची मजा बघत बसलेली ती लगेच जागेवरुन उठते. झपाझप पाऊले उचलत चिमुरडीला गाठते. लाडीगोडी लावून गर्दीशी झगडत ती चिमुरडीसाठी पुन्हा एक चकोबार विकत घेते.
चिमुरडा हात हातात धरुन होती त्या जागेवर तिला घेवून येते. जवळ बसवून स्वत:च्या चकोबार वेष्टणातून मोकळा करुन तिच्या हातात देवू लागते. इवलेसे मन संकोच तरी करतेच. हतबद्धपणे चकोबारला पाहात इच्छा मारुन नकारात मान हालवते. समजुत घालत कशी बशी तिची शेवटी चकोबार चिमुरडी फस्त करते. हसतात तिचे डोळे अन् मन भरुन येते. कुठल्या शब्दात काय बोलावे. शोध घेणारी आई समोर पाहात लगबगीने जवळ जाते. तोतळ्या बोलांनी हात ओढून जवळ आणते अन् आईला झालं-गेलं सगळे सांगते. दिदीला थॅंक्स बोल बेटा अन् व्यवहार आई संपवू लागते. आढे-वेढे घेत तिलाही शेवटी स्विकारावे लागते. जाता-जाता ती तोतळी बोलते. "अर्धवट पिले होते दुध गार आईस्क्रिम कसे केले तू फस्त. पुर्ण दुध पि आणि राहा मग तू मस्त".
गर्दीत तो ही हे सगळे दुरुन पाहात असतो. त्याच्या आधी फक्त तिला पोहचलेले पाहातो. निरोप घेवून चिमुरडी निघून जाते. अन् तो तिच्या शेजारी येवून बसतो. आजचे छे! नेहमीचे तुझे आठवतेस का जरा? अधुरे ताट तू किती होते ठेवले? सांगीतलेस तर सहज ग्लासभर दुधाचे तू महत्व, मग तू विसरतेस कशी भरलेल्या ताटल्या दाण्यांचे अस्तित्व..? दातांच्या मधोमध ती तिची जिभ चावते. हातांनी तिचे दोन्ही कान पकडते. पुन्हा नाही असे होणार आश्वासन देते. हसतो तो न मोकळा श्वास घेतो. दोघांची नजर मग माझ्यावर रोखली जाते. पायावरुन पाय बाजुला करत उठून मी उभा राहातो. दोघांकडे पाहात प्रत्येक गोष्ट समजवून सांगण्याची वेळ सुंदर असते. पण! त्या वेळेपेक्षा सुंदर वेळ ती गोष्ट अनुभवातून समजवून घेण्यात मजा असते..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:
Post a Comment