क्षण..!
अवलंबून..!
वेलीसारखे आयुष्य निवडायचे कि, झाडासारखे आयुष्य घडवायचे. आपले आपण ठरवायचे असते. सुरुवातीलाच वेल निवडली तर 'अवलंबून' राहावे लागते. अन् सुरवातीलाच कुंडी सकट झाड निवडले तर पाने,फुले,फळ ओघानेच वेल आणि घरटे यासोबत आश्रीतासाठी सावलीही घडवता येते. त्यातही वेलीलाच सुंदर फुलं, नाजुक काया अन् पोकळ बांधा घेवून नजरेला लुभावेल एव्हढेच गुण असतात. या व्यतीरिक्त वेलीला लागणारे फळे उदा. : टरबूज, भोपळा तिच्या आकारमाणाने मोठी अन् तिला स्वत:लाच त्यांचा भार न पेलवता येण्यासारखी असतात. कुठेतरी पायाशी सतत लोळण घेत बसण्यापेक्षा उंच अन् ताठ उभे असलेले झाड परवडते. कारण त्या एका पुष्ट झाडावर सगळे 'अवलंबून' राहातात अन् स्वत:चे स्वाभिमानी अहंकारी गुणधर्म विसरुन जातात. का? तर ते 'अवलंबून' असतात. एखाद वेळेस अंधारली वाट म्हणून बोट धरुन वाट दाखवण्यात अर्थ असतो स्वार्थ अन् गर्व नसतो. पण सतत परिस्थितीशी स्वत: न झगडता आयता सहज सोपा पर्याय निवडून वेलीसारखे पायघड्या पाडत ''अवलंबून' असणे अन् आधार मागत विणवन्या करणे कितपत योग्य आहे? नाहीच ना! म्हणून 'अवलंबून' राहाता येईल अन् ठेवता येईल असे निस्वार्थ झाड बनन्यात तथ्य आहे. नसेल वेलीशी काही कर्तव्य झाडाला तर मुकाट उभे-उभे जळून विरोध पक्तारुन आयुष्य त्यागता तरी येईल..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment