♥
♥ क्षण..! ♥
दैनंदिन..!
घरापासून मी असा दूर आहे
घरीही मला जाता येत नाही,
वाट पाहतात जी डोळे माझी
मिठी त्यांना मारता येत नाही..
दिवस राबतो रात्रसुद्धा झटते
स्वप्नातलं चित्र खरं दिसत नाही,
दमतं शरीर माझं मिळतो पैसा
सुखाचा आरामचं मिळत नाही..
एकदा येऊन भेट निरोप असतो
हसणारा ओठ माझा असत नाही,
रमणं होतं आहे त्या परिस्थितीत
सहवासात फारसे करमत नाही..
स्वतःशी स्पर्धा करुन जगणं होतं
जग जिंकण्याचा आनंद होत नाही,
गंध दरवळतो सतत मातीचा पण
अफाट गर्दीतला घाम जिरत नाही..
रोजच्या चढाओढीत वरचढ ठरतो
माझं माझ्याशीच हरणं होत नाही,
असचं परत फिरावे एकदा माघारी
उधारी उंबरठ्यांची बाकी देत नाही..
तू वेळेवर आठवणही काढत नाही
पोच पत्राचीही कधी पाठवत नाही,
स्वतःतच गुंग तू आहेस रे माणसा
इथे परकं आपलं कधी होत नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३