♥
♥ क्षण..! ♥
"आई म्हणजे जखमेवरची एक हळुवार फुंकर"..!
काळ बराच पुढे गेलाय आजची आई आधुनिक काळातली कर्तबगार मॉम मध्ये बदलली आहे. स्त्री संरक्षण आणि सुरक्षा आजच्या काळात महत्त्वाचे असूनही आपल्या प्रशासनाची अवस्था केविलवानीच आहे. असो, प्रशासनाच्या दुखऱ्या नसेवर बोट नाही ठेवत. आज जागतिक मातृत्व दिन काल आणि उद्या मातृत्व स्वीकारणाऱ्या प्रत्येक स्त्रीला भरभरुन शुभेच्छा.
काळ बदला तसा आई या शब्दांमधला ओलवा देखील कोरडा पडत चालला आहे. आजच्या तडफदार तरुणाई सोबत आई देखील मॉम या सज्ञेत मोडर्न होण्यात एकरुप झालेली आहे. जागतिक स्पर्धा जगासोबत सुरु तर आहेच पण अलिकडे आईची मॉम होण्याची स्पर्धा विलोभनियतेने वाढली आहे. पूर्वी आईच्या पदराखाली मायेचा ओलावा, प्रेमाची छाया, करुणेचा सागर दुथडी भरून वाहत असायचा. आज आईच्या पदरात स्पर्धेचे टेंशन, अधुनिकतेची धडपड, शर्यतीत जिंकन्याचाच अट्टाहास आणि 'वेल मोडर्न कल्चर्ड एडव्हांस चाइल्ड' निपजून, स्वतःच्या सगळ्याच संवेदनांची आहुती देऊन, भावना शून्य होण्याच्या प्रगतीकडेे मॉमचे पाऊल पुढे पडत आहे.
याचे प्रमाण फार नसले तरी निदर्शनात न येण्यायेवढे कमी देखील नाहीये. धावत सुटलेय सगळेच! मातृत्व सुखाचे क्षण होण्या ऐवजी कोरडेपणाचे लादनेच झाले आहे. यात दोष एकट्या स्त्रीचा देखील नाही. पुरुष प्रधान देशात मुलगाच हवा या बुरसटलेल्या शुद्र विचारसारणीचा आहे. आजची मॉम सरकारी क्षेत्रात कार्यरत असो किंवा कार्पोरेट क्षेत्रात उच्च पद, बक्कळ इनकम पुरुषाच्या बरोबरीने कमावत-भूषवत आहे. हे वास्तव दिसायला जेवढे सुखद आहे या मागच्या काहाण्या तेवढ्याच काळजाला चरे पडणाऱ्या आहेत.
निव्वळ मुलांना जन्म दिल्याने पुरुषाचे आणि स्त्रीचे कर्तव्य संपत नाही. आपल्या मुलांना सभ्यतेचा मुखवटा ओढुन घडवण्यात सभ्य संस्कारांचा अंश पूर्वग्रह दूषितसारखा उपजत त्यांच्या वर्तनात व चरित्र्यात येत नाही. प्रगती म्हणून वंशवेल वाढवण्यापेक्षा संस्कारांची वृद्धी म्हणून एक पिढी घडवण्याची आजच्या युगाची खरी गरज आहे. बघा..विचार करा..मातृश्री म्हणून आपली कर्तव्ये निभवा. आईचीच कर्तव्ये म्हणून हे सांगणे नाही, आजच्या आईने अत्याचाराचा विरोध केला तर उद्याची आई सुरक्षीत या जगात श्वास घेईल तेव्हाच पुरुषाची पुरुष प्रधान मानसिकता बदलेल. आई म्हणजे जखमेवरची एक हळुवार फुंकर, आई म्हणजे घर, आई म्हणजेच पदर, आई म्हणजेच कोसळलेल्या आयुष्याचा न ढासळणारा शाबूत आदर. पुन्हा एकदा मातृ दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!
------------------------- (पियूष) मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment