♥
♥ क्षण..! ♥
विरत नाही..!
हल्ली काहीच उरत नाही
रात्रही लगेच सरत नाही,
तू आणि मी याच घरात
काही पेच स्मरत नाही,
साठवलं मी ज्याच उरात
देणंही तेच परत नाही,
रितं होतं सगळचं क्षणात
काही मनेच भरत नाही,
लाटेला बांधायचं मनात
आजही हेच ठरत नाही,
तू आहेस तुझ्याच जगात
मी ही इथेच मरत नाही,
मरण गाणे सख्याच गात
तू ही अरेरेच करत नाही,
शेवटी स्वप्न उद्याच हातात
मी ही खरेच धरत नाही,
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment