Powered By Blogger

Monday, February 1, 2016

आर्त आयुष्याचा निसर्ग..! :-)


♥क्षण..! ♥

आर्त आयुष्याचा निसर्ग..!

छातीत दाटलेला उर आणि मनात माजलेले काहूर ही डोळ्यांची दारं अश्रूंसाठी उघडी करतात. गालावर ओघळलेल्या थेंबांना हातांनी पुसून आठवणींची उघडी दारं बंद केली जातात. प्रत्येकाच्या आयुष्याची खोली अशीच असते. जिथे काही माणसे धर्मशाळेसारखी राहतात तर काही माणसे घर असल्यासारखी वागतात. सरतेशेवटी घरासमोरचे स्वप्नांचे आंगण हे रिकामेच होत असते. उरतात ते वयोवृद्ध होत आलेली श्वासांची झाडे! ज्यांची मुळे मनाच्या जमिनीत खोलवर रुजली की, स्वतःच्या चरितार्थासाठी कडवे पाणी पितात आणि परिस्थितीच्या कुऱ्हाडीची घावं हसत हसत आपल्याच खोडावर झेलायला तयार होतात कारण देत राहायचं हा त्यांचा स्वभाव धर्म असतो. त्यामुळे आनंदाने सजलेला आयुष्याचा बगिचा हा सुनासुनाच वाटू लागतो..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment