Powered By Blogger

Saturday, March 25, 2017

घन व्याकुळ..! :)


♥ क्षण..! ♥

घन व्याकुळ..!

डोक्यावरची भाजीची परडी तिने लगबगीने खाली ठेवली. पाण्याचा तांब्या म्हातारीने हातातून अगदी ओढुनच घेतला. वर नारायणाचा ताप काय कमी नव्हता. दारात भर उन्हाची ही महामाया प्रकटली. माझं दार उघडं होत म्हणून धाडस झालं असावं तिचं. अन्यथा अंगणातल्या वाघ्याला न जुमाणून दार गाठण्याची कुणाची ब्याद जन्माला आली नाही. तांब्या घशाखाली रिचवणार होतीच तेवढ्यात मी हटकल तिला. ओट्यावर बसा आधी मग सावकाश पाणी प्या!
शरीरावर कितीही सुरकुत्या चढल्या तरी आपलेपणाने बोलले गेलेले चार शब्द वात्सल्य आणि करुनेला पुरेसे ठरतात. परडी बाजूला ढकलत म्हातारी मटकन बसली. एक क्षण स्थिर होत तांब्या मुखाला लावून गटागटा पाणी प्यायला लागली. उन्हाने होरपळलेला देह असल्यावर भान कशाचं राहतं? त्यात तहानेने व्याकुळ झालेला कोरडा कंठ म्हणजे अधीरतेने तापलेला वाळवंटच. तृष्णा शमल्यावर गंधर्वाने कृतज्ञ व्हावं अन् देवताने प्रसन्न स्मित वदन करावं असे दुहेरी भाव म्हातारीच्या चेहऱ्यावर होते.
म्हातारी : बर्र झालो बगा तुम्हच दार उघड धाडलं. न्हायत आज सुटलेच आसत्ये.
मी : सुटून काय मिळवलं असतं? जीवाचं रान केलं ते काय कमी झालंय का..?
म्हातारी : ते बी हायेच. पन गरीब करनार तरी काये?
मी : ही काय वेळ आहे का भाजी विकायची? त्यातपण गिऱ्हाईक काय मिळतात..?
म्हातारी : गिराईक लई लागो तितेक मिळत्यात पर मानुस एग बी नगं.
मी : मग पोटापाण्यासाठी आतड्याला कशाला पीळ द्यायचा या माणसाने..?
म्हातारी : जगण्यासाटी...
मी : .......... एवढा आटापिटा जगण्याचा मग सुटण्याची चिंता का करायची..?
म्हातारी : चिंता न्हाई. म्हताऱ्याक वचन दिलो हाय. पावसोतच ईल म्हनून.
मी : ते का म्हणून?
म्हातारी : त्यो घनश्याम न्हवं. आन म्या कविता. आमुचो मिलाप पावसोतच. उन्होत न्हाई.
मी : अच्छा! आणि हे ठरवलं कुणी..?
म्हातारी : म्हताऱ्याक दम आस्सल का? त्ये बेनं गेल भर उन्हाक. म्या नगं म्हनलं तरी बी.
मी : तुम्ही कशाला या भर उन्हात मग..?
म्हातारी : ते हैत नं. या भर उन्हात म्हनून.
मी : धत्त! काही तरीच काय..?
म्हातारी : नगो वैतागु. ह्या उन्हाची धग म्हताऱ्याने कशी सोसली तेच बघाया निघते. पर गिराईक हाय का वैरी कळ्याक न्हाई. सावलीतच धाडत बग. पर आज इथवर जीव लई कसानुसा होऊन गेलता. गिराईक बी न्हाई आन सावली बी. तुम्हची आमराई दिसली डोळ्याक म्हनून धरली वाट. त्येत बी तुमच दार उघड व्हतं म्हनून नाईत...
मी : कशाला जीवाची चेष्टा करावी..?
म्हातारी : च्येष्टा नाय. म्हताऱ्याक काळजीच पिरेम जाळ्याक ह्ये समद.
मी : जळाले असेल मग ते आता तर...
म्हातारी : व्हय. समदं जळ्याल. म्हताऱ्याची रग बी आणि धग बी. काय बी हाताशी आलं न्हाई. डोस्क फुटून जाग्यावरच सुटला. आता माझी बारी. ह्यो पाऊस न्हाई सोडायची बगा!
मी : न्याहारी उरकली का?
म्हातारीने नकारार्थी मान डोलवली. तिने ठेवलेला तांब्या उचलत बसा दोन घास खाऊन जा. म्हणत आत आलो. पिठलं भाकरी कांदा ताटात घेऊन बाहेर येऊन बघतो तर म्हातारी परडी डोक्यावर घेऊन निघायला तयार...
म्हातारी : घरला म्हताऱ्याक युन बसल्याक अस्सल. येते म्या पुना!
माझं ऐकायला ती थांबलीच नाही. गुणगुणत लगबग चालू लागली..
।। घन व्याकुळ तो हाये श्यामरंगा,
अन् भग्न अभंगात दंग तू पांडुरंगा ।।
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
"क्षणातच"
पि. ओ. बॉक्स क्र.६७,
जगळगाव हेड पोस्ट ऑफिस,
जळगाव - ४२५ ००१

Thursday, March 9, 2017

पहिले पाढे..! :-)


एक कालखंड झालाय. सध्या आहे ते लिखाण बाजूला ठेव. नव्या सुरुवातीकडे वाटचाल कर. ऐकलं, केलं, करतोय. पण मुळात मेलेलं लिहिणे माझा पिंड. वेदनेला उसवणे आणि यातनेला तरसवणे माझा आवडता खेळ. जखमांच्या अंगणात जीव होरपळून काढणे. जाणिवांना उसवून आणखी स्वतःला बोथट करत जाणे एकेकाळचा छंद. त्याला बाजूला ठेऊन माझे जगणे तर होते पण रमणे माझं होत नाही. म्हणतात ना शब्द फिरवता येतात पण शब्दात काही लपवता येत नाही. म्हणून हाच सखोल विषय माझ्या तुम्हाला समजायला वेळ लावणाऱ्या किंवा अवघड वाटणाऱ्या शब्दातच.. सोप्प करुन...

पुन्हा आयुष्य गोल झालं
नवं रोपटं गाली हसू लागलं,
ऋतू बदलला जरासा अन्
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Sunday, March 5, 2017

नयन जरा भिजले..! (मराठी सुफी - सात) :-)


♥ क्षण..! ♥

नयन जरा भिजले..! (मराठी सुफी - सात) :-)

त्या रात्रीच्या डिनरनंतर पुन्हा आपली भेट झाली नाही... तुझ्याबद्दल काय वाटलं हे एकदा भेटून सांगायचं होतं... खरं तर आता या गोष्टीला काही अर्थ नाहीये... तुझा तू मार्ग निवडलास आणि माझा मी निर्णय घेतला... वाटा वेगळ्या झाल्यात आपल्या अन् प्रवासही... पण तरीही पाऊले एकदा माघारी वळतातच...

सांगू शकत नाही मी
माझी रात्र कशी जाते,
अंधारात गप्प रातराणी
अगदी तू तशी वागते...

लुडबुड करावी जरा तर
तू सपशेल टाळून जाते,
आपल्यातलं एवढं अंतर
उंबरठ्यात पाळून घेते...

ना मला काही बोलवे
ना तुला काही बोलवे,
हे सारेच किस्से जुने
तरी वाटतात नवे-नवे...

ओघवत्या प्रवाहात मग
झालं-गेलं सगळं मांडतो,
भर वाळवंटात एकाकी
सावली सोबत भांडतो...

माझं वेड जगाला
न तुझं वेड मला,
तरी गुंतागुंतीचा
हा साराच मामला...

अजून लाजिरवाणे तुला चारचौघात मी करत नाही... दोष माझाच आणि गुन्हाही... फरार आरोपी मी जबाबदार तुला धरत नाही... कवडी मोलाची ही जिंदगी... भावनांचे व्यवहारी मोलभाव मी करत नाही... पटलं तर ठीक अन्यथा फसगत स्वताचीही करत नाही... याचना नाही अन् गाऱ्हाणेसुद्धा नाही... हा उध्वस्त वादळ कोणत्याही परिणामांची पर्वा करत नाही...

पुन्हा पुन्हा तेच तेच
कितीदा बजवायचं,
सांगून थकले रे मी
कितीदा समजवायचं...

लाट किनाऱ्याची नसते
किनारा लाटेचा नसतो,
एकाजागी उभे राहून
प्रवास पूर्ण होत नसतो...

अंतरे निरंतरे झालीत
दुरावे कायमची झालीत,
नियतीचे समज भाकीत
हे आयुष्यच तुझं शापित...

मला काही वाटत नाही
तुला पाहून वाईट वाटत,
तुझी ही फरफट पाहून
काळीज माझं तूट-तुटत...

जळत नाही मी तरसते
सर होऊन तुझी बरसते,
माझीच नसते मी कधी
तुझी होऊन सारं विसरते...

ऐक आता तरी माझं
पुरे झालं उध्वस्त असणं,
शक्य नाही तुझं होणं
शिक आता तरी तू जगणं...

विसर मला सांगून मी चुकले
आठवणीत रमते अन् झुरते,
पण तुझी असूनही कुंकू मी
एका गैराचं भाळी मिरवते..!

.....तो निशब्द होतो... जडावलेली पावले न भिजलेली डोळे जगापासून लपवत रहातो... ओठांचे हसणे जो तो बघतो त्याचं... पण त्याचं मन कोणीच जाणत नाही... त्याची यातना वेदना होऊन कधी समोर येते त्याचं त्यालाही कळत नाही... तरी तो जगतो खोट्या आशेवर... लुभावण्या स्वप्नांवर विश्वास ठेवून... कारण नयन जरा भिजले निश्चित असतील पण श्वास... श्वास अजून थिजले कुठे..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, March 2, 2017

तुझ्यात आणि माझ्यात..! :-)


आठवणी झोप उडवतात...मन सैरभैर करुन डोळे भिजवतात... स्वप्नांचा गंध दरवळतो श्वासात... पण एक "क्षण" तरीही उरतोच... तुझ्यात आणि माझ्यात..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

खाज..! :-)


♥ क्षण..! ♥

खाज..! :)

कितीतरी युगांनी तुला सांजेसह पाहिले आज आहे,
नभातल्या चंद्रासह तुझ्या मुखचंद्रालाही लाज आहे..!

हो, म्हण, "माझं आपलं काहीतरीच काय?" असतंय;
फितूर चांदण्याला काळ्या नभाचाही माज आहे..!

नक्षत्रांचा डोह - मण्यांचा मोह भाळी हा ताज आहे,
काहीही म्हण तू, वाट्टेल ते, हे एवढंच सरताज आहे..!

--------------------------------------------------राज-------,
-------------------------------------------------नाराज----!

--------------------------------------------------------------,
------------------------------------------------- नाज -----!

--------------------------------------------------बाज------,
---------------------------------------------दगाबाज------!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

("खाज" असंच ठेवावं वाटलं म्हणून..! वाटलं तर पूर्ण करू शकता हं..!) :-)

Monday, February 13, 2017

अंबाड्यातली एक... :)


♥ क्षण ♥

अंबाड्यातली एक...

तिने कातिल अदांनी स्वतःच्या केसांच्या बांधलेल्या अंबाड्यात. माझ्या हृदयाची स्पंदने गुंतली आहेत. ती केस मोकळे सोडत नाही. मी स्पष्ट बोलून दाखवत नाही. तिचं जगणं होतं. माझं अजूनही गुदमरनंच होत आहे. समजण्याचा अवधी नजरेने काय कृतीनेही देऊ केला. ती वेंधळी समजते हा अंबाडा मला खूप आवडला. कुणी सांगा जरा तिला "केसांनी गळा घोटला आठवून द्या". अन्यथा नव्हतो माझा मी तेव्हाही आताही. थोडा माझा मी तेवढा तरी मोकळा सोडून दे म्हणावं..!
(अंबाड्यातली एक लिख किंवा उ)
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, February 2, 2017

मर्यादा ओलांडून..! :)


♥ क्षण..! ♥

मर्यादा ओलांडून..!

चालढकल करण्यात दिवस तर जातो. रात्रीच मात्र काय करायचं कळत नाही. कुशिवरून कुशी बदलते आणि उशी भिजते. बेमोसमी पावसाचे ढग वर्दी देत नाहीत. कळत असत पण वळत नसतं. पावलांनी संथ चालतांना मन वेगात पळत सुटत. अंतर अजून वाढतात...
अंतर अजून वाढतात उत्तर नंतर सांगू म्हणत टाळली जातात. वेळ शतपावली करत असते आणि मध्यरात्री दाराशी पैंजणे रुणझुणतात. शब्द मुके होऊन डोळ्यांच्या काठाशी धुके दाटली असतात. अंधुक दिसत असतं. कोणीतरी उभे आहे वाटतं. ओळख मात्र होतं नसते व ती पटत सुद्धा नसते. कसं बसं धाडस करून दार गाठल्यावर दरवाज्यात स्वतःशिवाय कोणीच नसते. पुन्हा पाठ फिरवून अंथरून पाहिल्यावर...
पुन्हा पाठ फिरवून अंथरून पाहिल्यावर चादरसुद्धा चुरगाळली नसते. पाठीमागेच दार सहज बंद होऊन जातं. पावले खिडकीशी येऊन मग थांबतात. मंद वाऱ्याने उडणारी परदे हातात धरुन; कितीतरी आठवणी मुठीतून निसटल्या असतात. बरीच स्वप्ने बेचिराख झालेली असतात. तरीही असंही अन् तसंही जगण्याचा कायदा मोडला गेलेला नसतो. पापण्यांची कवाडं झुगारुन मात्र साधा अश्रू मर्यादा ओलांडून गेलेला असतो..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Saturday, January 28, 2017

दिसलं.. पण पाहिलं का..? :-)


♥ क्षण..! ♥

दिसलं.. पण पाहिलं का..? :-)

पुन्हा सोडून द्यायचं म्हटलं तर, स्वतःच तुटणे आणि काचांसारखे विखुरणे माणसाला नको वाटते. पण फुटलेल्या काचांचा गुणधर्म घेऊन रुतने, खुपणे आणि इजा करणे "बदल" या संज्ञेसाठी माणसाला आवश्यक व आधाराचे वाटतात. माणसाला हे मात्र कळत नाही उचललेल्या गुणधर्मासकट स्वतःसह त्याच्या आपल्यांचीही फरफट बरीच होते. हे जेव्हा जाणवतं तेव्हा झाल्या जखमांचे निव्वळ व्रण उरतात. कालांतराने त्या काचा नाहीश्या होतात. नव्या काचा येतात आणि माणसे पुन्हा आरशासमोर व्रणांसोबत मिरवायला येतात. कारण दिसणारं त्यांना लपवायचं असतं. मात्र आरश्याला लपवलेलं बघूनही दाखवायचं नसतं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Saturday, January 7, 2017

ती सध्या काय करते..? :-)


♥ क्षण..! ♥

ती सध्या काय करते..?

तिला जे वाटत ती तेच करते...
क्वचित तिची तर ती असते
पण नेहमी माझी ती मात्र नसते...
कधी सगळं वेगळं करत बसते
मग कधी वेगळं एकत्र करुन देते...
अवचित मग एकाकी हुंदके देते
गालावरची ओल ती हळूच पुसते...
हसते, बोलते आणि भांडतेसुद्धा
देव-देव जाप करत गोलगोल फिरते...
सगळं इतस्तः विखुरले जाऊनही
जो तो विचारचतो मग उगाचच
काय रे ए मृदुंगाssssssss
तुझी "ती सध्या काय करते..?"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

#अवलक्षण

Monday, December 26, 2016

स्पंदने.. त्या फुलपाखराची..! :)


♥ क्षण..! ♥

स्पंदने.. त्या फुलपाखराची..!

गॅलरीत बसल्या बसल्या कळलं नाही की काय होतंय आणि काय चाललंय? पण जे काही होत त्या रात्री भयंकर होतं. एक-एक थंड घाव होत असल्याचा भास. शरीराची शुद्ध तर नाहीच. थंड श्वासांचेही मग भान राहिले नाही. सुरु होत काहीतरी आतल्याआत. पण बाहेरच्या बाहेर सगळं गार पडत चाललं होतं. रगात वाहणार रक्तसुद्धा गोठतांना आपला प्रवाह थोपवत होता. पण झालं एकदाच काय व्हायचं ते. सगळं थांबलही आणि सुन्नही पडलं. जाणिवा पण बोथट होत गेल्या. नजेरेसमोरचा अंधार अलंकार होऊन लुप्त झाला. काही कळलं नाही मग पुढे काय झालं. डोळे उघडले तेव्हा बरंच काही तसंच होतं. जरा उजाडलं होतं. दुरुन कोणीतरी धावत येत होतं. त्राण नसलेलं शरीर एखादा बाण होऊन गप्प गार पडलेलं होते. नजर धूसर झाली होती आणि वाचा खुंटली होती. वेदना नव्हती ना संवेदना जाणवत होती. बस! स्पंदने त्या वेंधळ्या फुलपाखराची चुकत गेली आणि मग बंदच पडली..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, December 21, 2016

कुचेष्टा..! :)


♥ क्षण..! ♥

कॅचेष्टा..! :)

बोलून झाल्यावर, आपण काय बोललो? याचा फेर विचार करत बसायची मला सवय नाही. त्यामुळे कदाचित, विचार करुन बोलायची सवय लावून घेतली आहे. अर्थात याला काही चौकट आखणे म्हणतात. मी ही म्हणतो. पण ही चौकट ओलांडण्याची इच्छा दुर्मिळ झालेली आहे. अंतर ठेवून वागल्यावर अंतर सहसा कमी होत नसते. ते अंतर वाढत जाते. आपण कोणत्या एका अनोळखी वाटेवर कुठवर चालत जाणार? त्यापेक्षा ओळखीची वाट थोडी फेऱ्याने पडली तरी ती चौकटीत नचुकता पावलांना उभेच करणार असते. मग आड मार्गावर किंवा वाटेत भेटलेले सहप्रवासी हे लुभावणारे स्वप्नदोष असतात. त्यांचं अस्तित्व अस्तित्वात खरोखर असतं. पण आपल्या स्वतःच्या आयुष्यात ती निव्वळ थट्टा आणि मस्करीच्या पुढे कुचेष्टा असते. ..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
7387922843

Tuesday, December 20, 2016

To be or not to be..? :-)


♥ क्षण..! ♥

To be or not to be..? :)

To be or not to be..?
एव्हढाच तर सवाल आहे...
Option ला काही नसून
सगळं equal झालं आहे...
Opportunityचं वादळ
Priorityत बदललं आहे...
Love नावाची अफवाच
Dirty बनलेली आहे...
दिसलेला स्पष्ट Picture
Capture होणं राहिलं आहे...
Happy आयुष्य मागतांना
Face बेक्कार पडलं आहे...
To be or not to be..?
Understanding खोटं
Reacting खरं झालं आहे...
ओळखणं social होऊन
Identity खाजगी आहे...
Tell you गप्प बसायचं
Moove on होऊन जायचं...
Restart करुन परत एकदा
स्वतःला Satisfy करुन घ्यायचं...
Try केलं होतं सगळं मनापासून
Unable झालं सोडून द्यायचं...
To be or not to be..?
जगायचं फक्त जगायचं आहे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Monday, December 19, 2016

ते दोघं..! :-)

माझ्या वॉलवर भेटलेल्या त्या दोघांना..! ;)

♥ क्षण..! ♥

ते दोघं..! :-)

सहज सूर जुळत नाही
न काही एक कळत नाही...
कशातही मन लागत नाही
आणि सहसा करमत नाही...
बऱ्याचदा कारण लागते
कधी तेही सापडत नाही...
हो-हो नाही-नाही असं नाही
पण थोडक्यात बरंच काही...
कधी धुंदी लागते आणि
बेधुंद तराने सुरेल वाटतात
पण उगाच समजत नाही
आणि मोकळं बोलत नाही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

#आपण नको
#तुम्हीबोलायलाहवं #एकमेकांशी

Saturday, December 17, 2016

ही प्रीत तुझी मजला कळली नाही..! :)


♥ क्षण..! ♥

ही प्रीत तुझी मजला कळली नाही..!

मी अबोल होतो स्थिर होतो
तुझ्याशी अंतर ठेवून वागतो..
तू एक काही विचारल्यावर
मी बरंच काही नंतर सांगतो...

तू पिच्छा पुरवते मागे लागते
मी षंढ प्याला रिता करतो...
सगळं कळते मला-तुलाही
तरीही मग उगाच उरतो...

सैरभैर होतो अन् कोसळतो
पुन्हा मग मी सगळं आवरतो...
ओठांवरुनच परत परतवतो
मग कितीसा तुला कळतो..?

श्वास अनेक उसासा एकच
दिलासा तेवढा जवळ ठेवतो...
मितभाषा बोलून गोंधळ मांडतो
तरीही उगाच तुला छान वाटतो...

देणं-घेणं नसतं कशाचं नात्यात
नियमित व्यवहार हिशेबी राहतो...
वाचलं काय? उरलेलं काय होतं
रिता प्याला मग पुन्हा भरतो...

दोष घेऊन समारोप होऊन जातो
आरोप तरी जगजाहीर होत असतो...
तुला कळत नाही मी समजवत नाही
ही प्रीत तुझी मजला कळली नाही..!

तरीही...
काहीनाही
काहीही...
कधीही
केव्हाही...
जेव्हाही
तेव्हाही...
आणि
आताही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

Saturday, December 10, 2016

क्रिमरोल..! :-)


♥ क्षण..! ♥

क्रिमरोल..! :)

कुणीतरी: माझ्यासाठी एक छानसा रोल लिहून दे! अगदी लोकांना कायम लक्षात राहील असाच.
मी: प्रत्येक रोल चांगला आणि छानच लिहिला गेला असतो. स्वतःतल्या अभिनयाने त्याला न्याय दे. चांगल्या रोलच्या शोधात चाललेली भटकंती बंद होईल..!
कुणीतरी: म्हणजे? तुला म्हणायचं काय आहे? मी चांगला अभिनय करत नाही?
मी: अगदी तसं नाही. पण थोडं फार तसंच. तू एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस. पण कुठला रोल आपल्याकडून काय मागत आहे. याचा थोडा विचार कर. ग्लॅमरच्या चकाकीत फक्त चमकत ठेवणारे रोल पितांबरी नाहीतर विमबार सोप सारखे रासायनिक असतात. त्यात अंगणात लागलेल्या लिंबाची ओरिजनल सर येत नाही. रुजावे लागते. उन्हाळे-पावसाळे सहन करावे लागतात. सहज मिळणारे खत दुरापास्त झाल्यावर उपासमार पण खरोखर अनुभवावी लागते. तेव्हा ती जिवंत आणि मनापासून उमटते.
कुणीतरी: आजकाल सहज सगळं मिळत असतांना एवढं कशाला करायचं? की तुला द्यायचं नाही?
मी: अभिनयाच्या गुणांची तू घमंड निश्चित कर. पण सहज चार पैसे मोजून विकत घेतलेला रोल चांगला होईलच कशावरुन? मला काय मी सहज देऊन टाकेल लिहून. पण तो रोलही तुझ्याकडून चांगलाच होईल याची खात्री आहे का तुला?
कुणीतरी: हो! निश्चितच. तू लिहिलेला रोल म्हणजे चांगलाच होणार. दे स्क्रिप्ट.
मी: तुला हवा तसा आणि शोभेल असा सध्या माझ्याकडे रोल नाहीये. काहीतरी द्यायला म्हणून पण माझ्याकडे रोल नाहीये.
कुणीतरी: तुला खरंच रोल द्यायचा नाही?
मी: पुणेतल्या मालपाणीचे क्रिमरोल आहे देऊ..?
कुणीतरी: याचे परिणाम खूप वाईट होतील. बघून घेईल तुला. (चरफडत गेली)

दिखावट्या सौंदर्यासाठी मी तडजोड केली नाही आणि शब्दांचा बाजार पण मांडला नाही. स्वतःच्या मिजासात ऐटीत असलेले बरेच उंबरठे पाहिले आणि अनुभवले पण आहेत. त्यांच्यापासून वेगळं होतांना स्वतंत्र आणि जगावेगळं स्वतःत जिवंत असतं. तेव्हा परिणामांची पर्वा ही वेळ करते. तेवढीपण मला आता सवड नाही एंटरटेन करायला..!
#जोहोगादेखलेंगे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

Wednesday, December 7, 2016

मनावर..! :-)


♥ क्षण..! ♥

मनावर..!

हल्ली माझं बोलणं त्यापेक्षा जास्त माझं लिहिणं तिच्यासह सगळेच फार मनावर घेतात. मला काय वाटलं? नव्हे तुझ्याकडून काय हवं यात अपेक्षांची मग कोंडी होते. तुम्ही जेवढं मनावर घेता! तेवढं मी कागदावर पण ठेवत नाही. हे माझं सत्य आहे. माझ्या जाणिवा अजून जिवंत आहेत. पण तेवढ्याच उणिवा मी संवादासाठी मांडून ठेवल्या आहेत.
आपल्याला एकमेकांशी बोलायला एवढं एकच माध्यम आता उरलेलं आहे. अर्थात चौकट माझी मला जपायची आहे. तुझी/तुमची तुला/तुम्हाला यात अतिक्रमण कुणालाच करायचे नाही. निव्वळ ओघवते काही लिहून झाल्यावर येणारं सर्व काही अपेक्षित असते. हे ठरवून म्हणता येईल.
सोशल होतांना पब्लिकची काय टेस्ट आहे? हे कळायला यापेक्षा दुसरं माध्यम कागदावर तरी नसतं. सगळं काही ताटात वाढून बघावं लागतं. नेमकं काय आवडत? हे उघड माहीत असूनही नावडतच कागदावर लिहून पुढे वाढलं जात असतं. मुद्दाम कारण ज्याला तुम्ही वाचताय हे त्याचं कर्तव्य आहे की तो तुमची चॉईस आणि लाईक या दोघांच्या चक्रव्यूहापेक्षा सहज नजर गेली न वाचलं गेलं अथवा रिमाईंड झालं. चुकलं आणि ओढून ताणून बुद्धीला ताण दिलाय असं वाटतं ना! त्यापेक्षा जाणवतं. तेव्हा लिहिलेलं काहीही न समजणारेही स्वतःची उपस्थिती कागदावर नजरेतून देतात.
रटाळ अर्थहीन असलं तरी. वाचक असतो. श्रोता जागरूक असतो. रसिक नाराज असतो आणि प्रेयसी रुसली असते. कारण अनपेक्षित मांडलेलं अपेक्षाभंग करत असते. तरीही अपेक्षेवर आणि वेळेवर सर्वस्वी सोपवून चालढकल होत असते. चॉईस आणि लाईकच काहीतरी मिळेल म्हणून. व्हेरिएशन आणि व्हरायटी यातली कॉन्टिटी मार खाते. कारण ते कॉन्स्टंट नसतं. स्टेबल नसतं. ओघवतं असतं. म्हणून काही आवडलं नाही तरी ते आपल्याला आवडलेलं नसतं हे खरंय. तरी भावना आणि मनाचा विचार करून दुखापतीवर सॉरी ही फुंकर निर्थक असते.
मनावर घेतलं सरळ साधं सोपं ते तिथंच फुलस्टॉप लावतं. जे कळत नाही. आवडत नाही. तेच मनावर नजरेसमोर सतत येत. काय असेल? म्हणायचं काय असेल? काहीतरीच काय हे? असं का पण? प्रश्न तयार होतात. उत्तर माहीत असूनही. सहज विसरलं जातं थोडं लक्षात राहायला फार चुकावं लागतं अगदी असं तेव्हा कुठं कागदावरच असं मनावर घेतलं जातं. नाही का..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Monday, December 5, 2016

फ्लॅटमेट 3 :-)

#पुणे

#फ्लॅटमेट 3
ए! उठे! स्ट्रॉ कुठंय? दे पटकन..!
काय भाई? ती काय तिथं ठेवलीये...
हां सापडली..!
हॅहॅहॅ! काय भाई? काय चाललंय? स्ट्रॉ खिशात गुलाबाच्या फुलासारखं खोचून कुठं निघालायेस?
कुलकर्ण्यांकडे..!
परमेश्वरा! ते आणि कशाला?
कॉफी प्यायला बोलवलंय आणि काय हां त्यांना मी माझं लेखकीय नाव 'मृदुंग' हेच का म्हणून ठेवलं? या प्रश्नाचं उत्तर हवंय..!
हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. म्हणजे कुलकर्णी स्वतःच्याच कॉफीने स्वतःच तोंड भाजून घेतात. असे कसे भेटतात रे भाई तुला एकेक नमुने?
आपण कुठं आहोत..?
आपण पुण्यात! हे काय विचारणं झालं?
इथंच चुकलास बघ! आपण पुणेत आहोत आणि इथं फ्री मध्ये सॅम्पल जसा पेटीस व समोस्यासोबत देतात ना अगदी। तसेच पुणेत शोधले की नमुने भेटत राहतात..!
हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. कुलकर्ण्यांना जरा जपून आणि समजून घे भाई!
नको. मी गैरसमज दूर नाही करत कुणाचे तुला चांगल्याने माहीत आहे. झालेले समज आता आणखी वाढवून येतो बाकी नंतर कुलकर्णी गैर झालेत तरी आपलं काय जातंय..? ही स्ट्रॉ त्यासाठीच आहे. कॉफी पिऊन झाल्यावर सप्रेम भेट म्हणून उष्टी स्ट्रॉ द्यायला..!
अगं आई गं! भाई हे लय झ्याक होतं बग! हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ.
त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ये ही स्ट्रॉ..! चल जातो बाय..!
#एवढंच
✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com

Saturday, November 26, 2016

फ्लॅटमेट..! (2)

#पुणे
#समजदारफ्लॅटमेंट

(जोशी काकुंकडून आल्यानंतर)
तो : ए साल्या! काल जोशींकडून आल्यापासून तू एक अवाक्षर बोलला नाहीयेस. तिकडे ती प्रार्थना फोन उचलत नाही. इकडे तू बोलत नाही. समजू काय मी? वाट बिट लावलीस की काय? ए मेल्या बोल ना! पाया पडू का? (पाया पडतो)
मी : तथास्तू..!
तो : बोल ना भाई... काय झालं तिकडे?
मी : पुणेकर आणि पु. लं. चे परिचित जवळचे लोकं त्यांना #भाई म्हणायचे. अगदी त्यांची बायकोसुद्धा.
तो : तू कुठं कमियेस मग? माझा अंत नको पाहूस सांग पटकन.
मी : काही नाही रे, घर शोधण्यातच १ तास गेला. या जोश्यांच सदाशिवपेठ म्हणजे कुंभ मेळाच आहे तो ही दुसरा-तिसरा एकत्र.
तो : असं का म्हणतोस?
मी : नाही तर काय? कुलकर्णी किराणा दुकानाच्या बरोबर खाली थांबून जोशी काकूंना फोन केला. इथं थांबलोय. अपार्टमेंटच नाव आणि फ्लॅट नंबर सांगा. ते म्हणतात काय? कुलकर्णी किराणा दुकानात कोण येतं जातं सगळं दिसतं आम्हाला. तू थांबलेला कुठंच दिसत नाहीये. मी 8व्या मजल्यावरून खिडकीतून बघतेय.
तो : म्हणजे तुझं गटार अजून तुंबलं.
मी : नाहीतर काय? म्हटलं जोशी काकू असं मोठ्या आवाजात ओरडू का? साधारण किती जोशी काकू जमतील? त्यावर म्हणतात अख्ख सदाशिवपेठ एकत्र येईल. पुढं मी म्हणालो तरी तुम्ही आठव्या मजल्यावरची खिडकी सोडणार नाही हो ना? हो म्हणते बाई. सगळं दिसतं ना!
तो : मग काय खरंच आवाज ठोकलास काय?
मी : तुझी अपेक्षा तीच होती ना? पण नाही चिंटू दिसला. तुझा होणार साला बाईक कॉर्नरवर थांबवून खिडकीतून दिसणार नाही अश्या आडोश्यात सापडला!
तो : कोण होती सोबत?
मी : मला काय करायचंय? जी होती ती वात्रट होती. पण चिंटू चपापला रे मला पाहून!
तो : चला काहीतरी सापडलं.
मी : चिंटूला घरी चल म्हणालो. आलाच नाही. घरी काही सांगू नको म्हणाला. म्हटलं पत्ता दे तासभर झाला घर शोधतोय. त्याने पत्ता दिला तर नाही पण बिल्डिंग दाखवली दुरुनच. मग तो आणि ती वात्रट गेले निघून.
तो : मग एकदाचा घरात घुसलास ना?
मी : हो, पायातल्या जोड्यांसकट घुसलो.
तो : काहीच बोलल्या नाहीत?
मी : मी बोलू दिलंच नाही. घुसल्या घुसल्या प्रश्न डागले त्यांच्यावर. नको ती, नको ते अर्थहीन सगळे प्रश्न सोडले एकदम. उत्तर ऐकायची इच्छा नव्हती म्हणून पुढची प्रश्न सोडत गेलो. अशीच प्रश्न प्रश्न सोडत अर्धातास झाला. तेवढ्यात चिंटू पण आला. प्रश्न झाडत मी दाराबाहेर निघालो आणि लिफ्ट मधून जोशी काकूंना चिंटूचा आणि त्या वात्रटचा फोटो व्हॉट्सअप केला. मी लिफ्ट मधून बाईक जवळ येता येता आठव्या मजल्यावरून लय रडारड ऐकू येत होती खाली.
तो : कप्पाळ! करायला काय गेला होतास आणि करून काय आलास?
मी : असं झालं म्हणून सांगत नव्हतो.
तो : प्रार्थना पण फोन उचलत नाहीये.
मी : मी माझा फोन चेकवला प्रार्थनेचा मॅसेजमध्ये मला प्रसाद होता. "आईचं बीपी आता ठिके. बाबा उदास आहेत आणि मी मजेत. घरात पहिली मुलगी पर जातीतली येणार आणि मी पर जातीतील मुलाच्या घरात जाणार. माझ्या ठोंब्याला काही सांगू नकोस. संध्याकाळी थेट येऊन भेटणार आहे. तेव्हा सांगते मी माझ्या सोनूला..
#तेदोघेफ्लॅटबाहेरपडल्यावर
#इतकंच..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com