क्षण..!
अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-8)
प्रवासाचे तणाव अन् एकटेपणाच्या झळेचे परिणाम तब्बेत ढासळून दिसू लागतात. बंडखोर मन त्या अवस्थेतही स्वत:ला सोडून शरिराला जमेल तितक कामात गुंतवून घेतं. आठवणींच मुजोर सावट इतक सहज कुठे पिच्छा सोडणार असतं? जरा उसंत अन् थोड स्वस्थ होताच नजरेसमोर सगळ्या प्रतिमा तरंगू लागतात. गेल्या दिवसातल्या खोळंबलेल्या कामांची वाट मोकळी करुन दिल्या नंतर पुढे फार अशी कामेही नसतात. मग वाट्याला आलेल्या दिवसाचा संथ प्रवास सुरु होतो अन् निवांत मिळालेल्या क्षणात आठवणी हक्काने येत-जात राहातात.
स्वत:शी झगडू लागतो, झटकून बाजुला करु लागतो. कुठे तरी गुंतून राहावे आता अन् झालं-गेलं एखाद्या अडगळीत कोंडून ठेवावं. भुक मेलेली असते इच्छा फारशी नसते. गुढ होवून स्वत:च एक कोडं बनून जाते. अनइच्छेने फ्रेश होण्याचे सोपस्कार पार पडतात. छताकडे शुन्यात नजर खिळून राहाते. जाणीव स्वत:चीच मग एक यंत्र करुन देतो. अंबरचा भ्रमणध्वणी गुणगुणू लागतो. क्लायेंट्सचे रेफरन्स मेल चेक करुन पुढे पाठवण्याचे आदेश Boss नावाच्या खडूस इसमाकडून येतात. डिस्चार्ज झालेला लॅप्पी चार्जींगला लावून अर्ध्यातासात तेही काम हातावेगळे होते. ऑफिसिअल साईट साईन-ऑउट करुन फेसबूकवर साईन-इन होते.
नोटीस्फीकेशन क्लिअर करुन मॅसेजसकडे मोर्चा वळवतो. धाराचा 'Ok, Take care..!' वाचतो. जरा शांत अन् पुर्ववत वाटू लागते. पुन्हा सुरुवातीपासून झालेले संभाशन वाचून काढतो. ओठांवरचे हरवलेले स्मित विषन्न अवस्थेत परत ओठावर उमटते. अनामिक चैतन्याने कि-बोर्डवर सराईत बोटे फिरू लागतात.
"h! मिस ऑक्सफर्ड हाऊ आर यू..? बरीच आठवन काढलेली दिसतेय माझी तुम्ही. काय चाललेय सगळे ठीक ना..? एंटर करतो अन् काही तरी खायला हवेय आता याचा साक्षात्कार होतो. लॅप्पी तसाच सुरु ठेवून किचन मध्ये धुडगुस घालतो. coffee & न्युडल्स वर ताव मारत जुण्या हिंदी गाण्यांची मैफल लॅप्पीत प्ले करतो.
ऑफीसची धावपळ संपवून धाराही निवांत coffee न ब्रेडचे लचके तोडत फेसबूक साईन-इन करते. नोटीस्फीकेशन क्लिअर करुन मॅसेजेस चेकवते. आलेत तर साहेब बडबडत ओठांनी हसत मॅसेज वाचते.
धारा : आठवण?...अम्म्मम्म्मम्म्मम dnt knw पण हा आता तुमचा मॅसेज वाचून एव्हढे नक्की कळाले कि, इतक्या दिवसात कमतरता वाटत होती. ती ही कि, या दिवसात माझे डोक खायला कोणी नव्हते. (मॅसेज एकदा वाचून एंटर करत हाताची घडी घालून रिप्लायची वाट बघत बसते..)
अंबर : (तोंडात लटकलेल्या न्युडल्सचा अवशेष मुखात पुर्ण ओढतो.) अच्छा! म्हणजे डोक्याचा साठे बाजार करुन ठेवला आहे माझ्यासाठी. अलभ्य लाभ! पण काय चार्जेस काय या ॲन्ग्री डिशचे..? कि मंदीरातल्या प्रसादासारखे आज फ्री वाटप आहे..?
धारा : ब-याच दिवसांनी भेट झालीये तर आज फ्रि ठेवू उद्यापासून बघू काय चार्जेस लावायचे ते..!
अंबर : दिसतोय दिसतोय आनंद अगदी उठून दिसतोय..!
धारा : खाली या..! जास्त नका उडू पडाल तर लागेल अन् उगा माझ्या नावाने ओरडाल..! :-)
अंबर : तुमच कसेय ना वारा जोरात करुन आधी हवेत नेवून ठेवता मग माझ्यासारखा गरिब बिचारा दिन दुबळा त्या क्षणभंगूर हवेवर हेलकावे खात राहातो..!
धारा : हो का..? येव्हढे हलके-फुलके असाल वाटले नव्हते. पाय जमिनीवर अन् मस्तक आभाळात ठेवावे माणसाने म्हणजे तो अधांतरी अन् अवलंबून राहात नाही कुणावर..!
अंबर : ते झालेच! पण असते ना सवय एखाद्याची आधार बनन्याची अथवा दोर बनून बांधून ठेवण्याची. मग हिरमोड कशाला करु ना..?
धारा : आहाहा हा ! किती कौतूक नाही स्वत:चे. इच्छा स्वत:ची असते उडण्याची अन् दोष मात्र इतरांना देण्याची..!
अंबर : दोष कुठे हो आरोप आहे..! पण या आरोपांचा समारोप मात्र तुम्ही स्वत: जवळ सुरक्षीत ठेवले आहे..!
धारा : यूssss! यू आर जस्ट impossible आय हेट यू बाय..! :x (रागाच्या भरात ऑफलाईन होते)
अंबर : हाssssय! "लव्ह मी ऑर हेट नो मॅटर बट यू आर स्टिल थिंकिंग ऑफ मी दॅट्स मॅटर..!" :-) टेक केअर बाय..! :-)
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)
No comments:
Post a Comment