क्षण..!
चिमुरड्यांच्या विश्वातून..!
आवडीने चाखते ती मी भरवलेली मलाई
चोळत येते डोळे अन् म्हण म्हणते अंगाई,
घेवून तक्रार चुळबुळत कुशीत अशी शिरते
ऐकत तोतळे बोल निज पापण्यांवर फिरते,
निरागस तिचा चेहरा न्याहाळत मी असतो
लांबडच लावत रातीला एक क्षण मी जगतो,
कुरबुर करत पाहाट होते समज दिली जाते
रातीला भेट होईल या आशेवर सांज झुलते,
देवून आढावा पुर्ण दिवसाचा पापणी जडावते
नखरे करत अंथरुनात चिमुकली मिठी पडते,
खर्जातली अंगाई या ओठातून बाहेर निसटते
नाद घेवून चांदण्यांचा पाकळी पापणी मिटते..!
.
--------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com
lahanapnich aayushya khup sunder asat
ReplyDelete