क्षण..!
फेसबूक ढाबळ..!
(पात्रे : स्टेटस, लाईक, कमेंट, शेअर, पोक)
स्टेटस : what's on your mind? लय उकडतंय..! फिलिंग hot.. hot..hot..! :-(
लाईक : आलास मुडद्या? आता गर्दी होईल अन् माझा घाम निघेल. >:(
कमेंट : सेम हिअर..! या लाईकच्या समुद्रात मी तरंगासारखी असते हलकी-फुलकी. ^_^
शेअर : लिहायचा कंटाळा करणारी माणसे मला कामाला लावतात. :-/
पोक : काही काम नाहीये का तुम्हा लोकांना? घामाच्या धारा निघतांना दिसतायेत तरी तिथे माझं बोट... शी! किळस येतेय..! :-|
लाईक : थम्स अप करुन ठेंगा दाखवायला काय मजा येतेय कळत नाही मला. असे वाटते लहानपणी अंगठा चोकण्याची हरवलेली सवय अथवा इच्छा पुर्ण करत आहेत. (y)
कमेंट : होत असं कधी कधी..! बेकार असलेला माणुसही घामात भिजतो एव्हढ काय विषेश..?
स्टेटस : अगं कमेंट तू अशी टिकटॅाक टिकटॅाक चालत बोलत असतेस मला आवडते..! <3
कमेंट : हो का? पण तु मला अजिबाद आवडत नाहीस? :-/
स्टेटस : का बुवा?
कमेंट : तू आलास ना कि सगळ्यांना तोंड फुटते आणि ही बावळट लाईक आरसपाणी सौंदर्य समजून स्वत:चे भाव खाते. एकदा काही चांगलं वाईट बोलले कुणी तरच तू दखल घेतो माझी अन्यथा तिथेही लाईकच करतो तू..! :-/
लाईक : (मध्ये तोंड मारत) जळतंय कुणी तरी..! :-D
शेअर : रताळे यांचे काय शेअर करु हाड..! :x
स्टेटस : असे नाही गं कमेंट! माझ्या मागे तुझंच नाव घेतात सगळे..!
कमेंट : नो उल्लू बनावींग.. नो उल्लू बनावींग..! >:o
पोक : (उतावळेपणाने) मी काही बोलू..? मी काही बोलू..? -_-
स्टेटस, लाईक, कमेंट, शेअर (एकत्र) : नको, एव्हढे पुरे आहे..! :-) :-)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment