Powered By Blogger

Friday, May 2, 2014

(असच काही तरी) अ'न्याय..! :-)

क्षण..!

(असच काही तरी) अ'न्याय..!

चुक अथवा बरोबर ठरवणारे, आपले मन तरी कोण असते? समाजाच्या नियमात रुढी, परंपरेत अहित तरी काय असते? चौकटी बाहेर चौकट असते. उंबरठ्या बाहेर उंबरठे असतात. भिंती, दारं, खिडक्या, अंगन झोपडीलाही असतात. फरक करण्याचे अन् सिमेंट विटांच्या जंगलात असण्याचे समिकरण येव्हढे वेग-वेगळे का असतात?
आयुष्याचे गणित प्रत्येकाला सारखेच असतात. तफावत नावाची तवायफही सारखीच असते. अडकाठी अन् विरोध प्रवाहा विरुद्ध असण्याचा, सहज स्विकारला का जात नाही. 'माणूस म्हणून घडा" पहिल्या वर्गातला पहिला पाया कुठल्याही मराठी-हिंदी-उर्दू-इंग्रजी शाळेत शिकवलेच जात नाही. येव्हढेच काय शाळेत दाखल करण्यापुर्वी बौद्धीक क्षमता काय हे तपासण्यासाठी "मुलाखतीतले तिन प्रश्न आजही तसेच आहेत 1) तुझे पुर्ण नाव काय? 2) आई-बाबांचे नाव अन् राहायला कुठे? *3) तुझी जात किंवा धर्म याही पलीकडे तुझा देव कोण? इतक सोपे अन् सहजच अबोध बालकाला / बालीकेला विचारले जाते. पलकांनी रटून घेतलेल्या शिकवणीचा कसं दिसत असतोच. यावरही चंट आणि चुणचुणीत शेराही हुशार नावाखाली बहाल केला जातो.
काय अर्थ आहे या सगळ्याचा? काही एक समजत नाही. आश्रमानंतर शाळेतली ही वर्गवारी एकतेच्या नावाखाली, नाक दाबून घशाखाली उतरवलेली वाटते. विद्या समान प्रदान करुन बौद्धीक क्षमतेवर ग्रहन अन् आत्मसात करुन बदल कुठे कसा घडलाय सालं! तेच कळत नाही. इ.स.चा वर्तूळ आहे तसाच आहे. फारफार काय तर वाढलाच आहे. चौकटही आहे तशीच अन् अ'न्यायही आहे तसाच वाटलेला आणि उपकार म्हणून दिलेला..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment