Powered By Blogger

Friday, July 18, 2014

ऑर्कुट..! (निरोप)

क्षण..!

ऑर्कुट..! (निरोप)

काळही किती विचित्र आहे ज्या गोष्टी सुरु होवून अपुर्ण राहिल्या, त्यांचीच खाडाखोड आता करतो आहे. वाटतही बघ आता काहीच नाही. जपुन ठेवलेल्या वस्तुंची विल्हेवाट, एकदिवस लावावीच लागते. हे सगळेही ठरवून! भेटी-गाठीचे सगळे धागे-दोरे तोडून..!
"जे होतं ते चांगल्यासाठीच होतं". कदाचित, मी खोडणार नव्हतो म्हणून काळानेच पुढाकार घेतला असावा. सरते शेवटी काय तर आठवण सुद्धा पुसली जाते. जपली होती थोडी फार आठवण पण! पुढचा घेतला गेलेला श्वास शाश्वत असेलच असेही नसतेच ना..!
चालायचेच! म्हणून चालत जातोय. माध्यम कुठलंही अन् कुठेही असो, घर कसं बनवायचे ज्याला त्याला कळूनच जातं. थोड रुतत तरी आपली गाठ आपण फक्त सुटतांना नव्हे, आपले धागे मुळापासुन तुटतांना पाहातोय. आठवायचेच म्हणटलेस तर वेळ कमी पडेल एव्हढे आहे. आठवूनही काय होणार आहे आता..?
"पळपुटेपणा करुन अंग तर काढता येते, पण! जिथे मनाची आणि क्षणांची पहिली विट रचली गेली तोच पाया उपटून निघतांना यातना होणारच आहेत. बोलून व्यक्त होतील अन् सांगुन समजतील छे! दाखवल्या तरी दिसतील का..?
30-सप्टेंबर पर्यंत अवकाश आहे तसाही. संपणार आहे माहित असुनही साठवायचे तरी काय काय..? थोड तेव्हाही राहूनच जाणार आहे. मोकळे जगायला आणि व्हायला ही किंम्मत थोडीच वाटतेय. कुठे तरी असेही वाटते फार मोबदला दिला जातोय..!
'निरोप' आरोपांसकट दिला जातो म्हणतात. त्या आरोपांवर देखील चार बोटे आपलीच स्वत:वर उलटतात. होते तेव्हढे तर मी साठवून घेतले. उरले काय अन् गेले काय लावेल एकदिवस हिशेब. 'आठवणी ऑर्कुटच्या' मथळ्याखाली. तेव्हा कितपत आठवेल हाही प्रश्नच असेल. "विसरेल म्हणत लक्षात बरेच काही राहून जाते..!"

"बाय-बाय ऑर्कुट..!"
(दहा पैकी पाच वर्षे बरीच धुमाकुळ केली आहे. गेली दोन वर्षे तिथे शांतताच पसरुन आलोय..! पुढे म्हणजे (30-सप्टेंबर रोजी) थोडा ओलावा ठेवून आक्रोश खोडून घेतांना बघणार आहे..!)
.
--------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment