Powered By Blogger

Tuesday, July 29, 2014

परिस्थिती..! :-)

क्षण..!

परिस्थिती..!

सहसा आपण परिस्थितीच्या पायरीवर उभे असतो. या परिस्थितीच्या पायरीला नियतीने कदाचित चार चाके लावली असावीत. स्वत:च्या ओझ्याचे संतुलन करुन स्थिर उभे राहायला म्हणून अवघड जात असावे. तोल गेला, जास्त चुळबुळ केली तरी पायरीवरुन पडणे निश्चित असते. एव्हढ-तेव्हढ नको म्हणून परिस्थितीचे गुलामच एक प्रकारे. त्यातही पायरी गाठायला सोडून मिळवायलाच झटापट जास्त होते. स्पर्धा काय तेव्हा मग उपहासात्मक वाटून जाते. परिस्थिती बदलायला कुठे तरी आपला हातभार अथवा आपण जबाबदार आहोत हे लक्षातच येत नाही. लक्षात येते तरी केव्हा? जेव्हा अवाक्या बाहेरचे न पेलवणारे ओझे घेवून या परिस्थितीच्या चार चाके असलेल्या फळी वरून जमिनीचा आणि आपला संगम होतो तेव्हा. थोड खरचटलं वाटत असते निरखून पाहिल्यावर जखम खोल झालेली असते. आरोप कुणावर करायला चुकही कुणाची नाही स्वत:चीच झालेली असते. गुदमरायला न स्वत:च्या नजरेत पडायला खरी सुरवात तेव्हा होत असते. जिद्द मरत नाही आत्मीक बळ बंडखोर करुन, पेलेल तुला एव्हढ सगळं ओझं घेवून, संतुलीत स्थिर उभं राहायला बजावत असते. उठण्यासाठी तरी आधार शोधला जातो. पण इतका वेळ ज्या पायांवर उभे असतो, त्यांच्यावरच पुन्हा विश्वास नसतो. पण! कुणी येत नाही. एकटेच स्वत:ला सावरत उभे राहून ही निसटलेली पायरी पुन्हा बसवून पुढे चालायला लगतो. अनुभव गाठीशी असतात, पायरीच्या स्वभावाशी परिचय झालेला असतो. पुन्हा परिस्थितीच्या नावाने बोम्ब मारायला जिवावर आलेले असते. मुकाट सगळे बंद ओठातल्या ओठात परतवत, लटपटत्या पायांनी शिखराच्या टोकावर कधी पोहोचलो कळत देखील नाही. त्यावेळेस जगापेक्षा स्वत:ला सांगण्यात मजा येत असावी. "परिस्थितीने परिस्थिती भलेही बदलता येत नसेल, पण आलेल्या परिस्थितीला तोंड देवून जगायला न मिळण्यापेक्षा जगणे मिळवायला खरंच मजा आली..!"
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment