Powered By Blogger

Sunday, July 27, 2014

लोणचे..! :-)

क्षण..!

लोणचे..!

सत्तरी उलटली तिच्या वयाची... तरी आयुष्याच्या लोणच्याला प्रेमाची सर तशीच आहे... चष्म्यावर साचलेले तुषार रुमालापेक्षा तिच्या पदराला पुसत जवळ बसलो... कसं जमलं असावं आणि कसं बंर जमत असावं... सुरवातीच्याच स्फुरतीने बरणीत एकरुप होत असावं... दरवेळी विचारता विचारता राहून जाते...आंबट-गोडव्याचे प्रमाण कसे चुकत नाही... सार असतो गोड पण कैरीचा आंबट गुणधर्म तसाच का राहातो... रोज सकाळ संध्याकाळ बरणीतले लोणचे आवर्जुन फिरवत बसते... सगळ्यांच करण्यात भिंगरी तिच्याच पायाला बांधली असते... चव मात्र जिभेवरुन काही केल्या ओसरत नाही... नजर भरुन बघत असते अन् घरभर त्या लोणच्याचा सुवास दरवळतो... मातीचा वास न लोणच्याचा सुवास... कुठे तरी घराच्या भिंतीत चिकटून राहातो... भेगा जातात भिंतींना रंगही पापुद्रे होवून निघू लागतात... ती तशीच पदर कंबरेत खोचून तयार सगळे काही सावरायला... थकवा उसंत माहितच नसावे जणू... कर्तव्य बोलावे तरी कसे अवाक्या बाहेरचे प्रेमच असे... तोच परिघ तोच वर्तुळ आणि तिच टिकावू बरणी... दरवर्षी मुरणारा तोच पदार्थ पण अगदी नव्याने... चष्म्यावर साचलेले तुषार पुसत पुन्हा डोळ्यावर चढवून चोथा झालेल्या बातमीचा आस्वाद घेत बसलेला मी... काय करताय म्हणत हातातला पेपर बाजुला ठेवून, "घ्या बटाट्याच्या पराठ्या सोबत लोणचे खाऊन बघा"... नेहमी सारखेच अरे वा! म्हणत कैरीची फोड चोकून, मुरलंही का लोणचे? खोचट टोमणा मारुन न थांबणा-या राजधानीच्या मुखातल्या बडबडीचा रस्वाद घेत पॅसेंजरच्या वेगाने हळूच एक घास तिला भरवून मिश्किल हसणारा..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment