Powered By Blogger

Wednesday, July 23, 2014

नैतीक / अनैतीक (संबंध / नातं)..! :-)

क्षण..!

नैतीक / अनैतीक (संबंध / नातं)..!

परवा असंच एका मैत्रीणी सोबत बोलत होतो. अर्थात एन.आर.आय. असल्यामुळे विचारांत बरीच प्रौढता होती. नेहमी प्रमाणे हां, हम्म, बाय होणारच होते. माहित नाही काय आठवले तिला. एक विचारु का विचारले तिने. म्हणटले एक काय दोन विचार. खरे तर विचारायचे नाहीये काही बस! सांगावेसे वाटतंय तुला म्हणून सांगतेय. म्हणालो मग संकोच कशाला? ते असे आहे कि, मी इकडे सेटल होवून जवळ पास बारा वर्षे झालीत. लग्ना नंतरचा गोडवा काय दोन मुलं होण्यातच संपला.
कुटूंब वाढले तसे जबाबदारी सुद्धा वाढली. डॅालर्स कमवायला माझे हे सोळा तासांच्या व्यापात गुंतुन गेले. घरी यायचे तेव्हा मुलांना गुड नाईट म्हणत दोन घास खाऊन सरळ अंथरुनात जावून पडायचे. अर्थात या इथल्या घराच्या आघाडीवर राहून तिकडे भारतातल्या घराची सुद्धा आघाडी पेलत होते. अजुनही पेलते आणि जमेल त्यापेक्षा जास्त सर्वच करायचे. मुलं मोठी झाली न स्वावलंबी देशात असल्यामुळे स्वत:चे स्वत:च करु लागली. मला उद्योग मग फारसा उरला नाही. काही आहेच तर लक्ष ठेवणे. वाहावत जावू न देणे आणि हमखास एखाद्या गोष्टीत आक्षेप घेणे. संवाद माझा माझ्या घरातच मोबाईलच्या स्क्रिनवर होतो. 'Don't wait for dinner', l'll be home @ 10:30 pm., अजुन काय तर यायच्या जायच्या वेळेची लेखी नोंदच. का कशासाठी मतलबच उरला नाही.
काही दिवस असेच गेले. न राहावून थोडा छोटा मोठा उद्योग करुन वेळ जावा म्हणून जॅाब शोधायला लागले. मिळाला देखील कॅफेत काऊंटर सांभाळायला लागले ते पण पार्ट टाईम. फ्री कंट्री म्हणून बरेच तसे संबंध पाहिले. माझेही तसे होतील मला वाटले नव्हते. संस्कार म्हण अथवा काहीही. ही गोष्ट मैत्रीच्या पुढे जावू द्यायची नाही असेच ठरवले. पुन्हा परतायचे भारतात मध्यंतरी वारेही उठले होते. पण! सोई सुविधेच्या न स्वच्छ देशाच्या झगमगाटीत आंधळ्या झालेल्या प्रत्येकाच्या मुखातून एकच निघाले अगदी माझ्या सुद्धा, "What will we do in our dirty india..?"
पुन्हा सुरवातीचा एकही व्रण नसलेल्या देशात, भलेही तो आपलाच असो तिथे नवी सुरवात करायला आज इथे आहे तो बस्तान हलवण्यात इष्ट कुणालाच वाटले नाही. सहाजीक होते फ्रिडम आणि फ्रि कंट्री यात विदेशच वरचढ ठरला. दहा वर्षात पहिल्यांदा अर्धा तास माझे कुटूंब यावर चर्चा करायला एकत्र उपस्थीत होतो. निष्कर्श काय तर इथेच आहे तसेच राहूया निघाला. दोन दिवसांनी सगळे विसरुनही गेलो. आज आठवले तरी आपल्या सोडून एका परक्यालाच सांगायला. मला संवाद आवडतो अगदी काही तरी बोलायचे म्हणून बोलत राहाणारी लोकं मला खुप आवडतात. अश्याच या तोडक्या संवादात कॅफेत त्याच्याशी ओळख झाली. मैत्री झाली न खुप जवळ आलो. घराच्या चौकटी बाहेरच आहे सगळे. भेटणे, फिरणे आयुष्य जगण्याला कारणीभुत एखादा रसिक मिळावा तसे अगदी उत्तम चालू आहे. कुठे तरी मनात चुकल्या सारखे वाटतेय. एक स्त्री म्हणून निश्चित चुकले असेल मी. त्यातही माझ्याच मानसांना फसवत आलेय मी. पण! एक सांग पुर्ण चुक माझीच आहे का? वाद-संवाद सगळे धागे मी धरुन ठेवायला हवे होते का? कर्तव्य म्हणून कुठे कमी पडले नाही. भुक फक्त स्पर्शाची असेही नाही. दोन प्रेमाच्या शब्दांचीच भुक होती आजही आहेच. हक्क असू दे पण! तो ही का मागुनच संतुष्ट होवू?
नैतीक-अनैतीक संबंध आहे कि नातं आहे तेच आता कळेनासे झालेय. पण! एक गरज म्हणून बघीतले तर सगळे फोल ठरतेय असे नाही का? सतारा-अठरा वर्षापासून मनात सलतेय. चुक कि बरोबर तुला विचारण्याचाही अधीकार नाहीये. तरी तुला विचारतेय सांग काय चुकलेय माझे..!
उत्तर असे माझ्याजवळ सुद्धा नाहीये. तुझ्या बाजुचे समर्थन केले तर विचारसारणी न परिपक्व बुद्धीमत्तेचा टेम्भा मिरवत माझ्यापुढे येईल. असमर्थन केले तुझ्या बाजुचे तर बुरसटलेल्या विचारवंतांच्या पंक्तीत जावून बसेल. फार तर काही नाही गरज म्हणून तू तुझी इच्छा पुर्ण करुन घेतली आहेस किंवा घेत आहेस. अपराधी असे तुला ठरवण्यात दोष तुझाही पुर्ण नाही. तुझं नातं किंवा तुझे संबंध तू तुझ्या घराच्या चौकटी पासून भलेही लांब ठेवले असो, फक्त एक सांग तुझ्या मुलांच्या मोठे होण्याकडे पाहून, तुझ्यासारखेच असे नैतीक-अनैतीक नात्यांची किंवा संबंधाची त्यांना गरज पडली असती तर तू ते स्विकारु शकली असतीस का? नाही याहून असहनिय तुला काहीच नसते. तुला गरज पडू शकते तशी त्यांना का नाही? तुला फि कंट्री तशी त्यांनाही का नाही? प्रत्येकाला आपलीच गरज न आपलीच बाजू बरोबर वाटत असते. तोडून लावण्याचा किंवा दुखावण्याचा अजिबाद हेतू नाहीये माझा. अनैतीक संबंध जोडायला न टिकवायला वेळ लागत नाही. वेळ लागतो अनैतीक संबंधातून बाहेर पडून, स्वत:च्या अनैतीक मुल्यांची आहूती देवून, नैतीक संबंधात प्रस्थापित झालेला विश्वास अबाधीत ठेवायला. चौकटी बाहेर मैत्री अथवा काहीही असू दे! त्याची गढूळता वाढत आपलेच न आपण स्वत: फरफटले नाही जावू एव्हढीच काळजी घे..!
आधार देणारे बरेच असतात पण आधार बनून सोबत राहाणारे आपलेच असतात. अनैतीक का असे ना असतात काही संबंध पण! ते तेव्हढाच वेळ जेव्हढा वेळ आपण त्यांच अस्तित्व स्विकारतो. हळूहळू सुरवात होते तसा शेवटही सावकाश, हळूवार, तुटतंय याची जखम सुद्धा व्हायला नको. एकदम शेवट झालाच तर जखमा आयुष्यभर चिघळत राहातात. सल उरते मनात जी फक्त आतून पोखरत राहाते. बाकी समजदार तुम्ही स्वत:च आहात मी फक्त एक माध्यम आहे..!
.
----------------- © मृदुंग
kshanatach@gmail.com

No comments:

Post a Comment