Powered By Blogger

Sunday, August 31, 2014

प्रेमपत्र..! ;-)

:-)
क्षण..!

प्रती,
स.न.वि.वी.
पत्ता
विषय :- प्रेम करतो / करते कळवण्यास

वरील विषयानुसार पत्रास कारण कळलेच असेल, म्हणून मजकूर लिहित नाही. पत्र पोहोचल्यावर दोन दिवसात तातडीने उत्तर कळवावे..! अन्यथा उत्तर दिले नाही तरी उत्तर मिळेल व दुसरे पत्र पाठवेल पहिल्या पत्राचे उत्तर द्यायचे आहे याची आठवण करुन द्यायला..!

तुझा / तुझी
स्विटी / स्विटू..!

---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, August 30, 2014

प्रसंग..! :-)

क्षण..!

प्रसंग..!

वैतागून होते आज सगळे, प्रत्येकाचे कुठे ना कुठे काही ना काही बिनसले होते. माझ्यापरिणे मी सोडवण्याचा निश्फळ प्रयत्न केला पण अपयशीच ठरलो. का? माहित नाही.  कशासाठी मी स्वत:चा त्रास विसरुन त्यांच्या मदतीला धावून गेलो? माहित नाही. आता स्वत:लाच कोसत बसलोय.
झालं-गेलं सगळं उसवत बसलोय. गाठी सोडत एकाकी स्वत:शीच हसलो अन् पुन्हा चालू लागलो. त्याच उन्हात तिच चटके सहन करत. अनवाणी वाळवंटात गुंतत गेलो. राजरोस हे कुणा ना कुणा सोबत घडणार असते. मी तरी कुठवर पुरणार आहे?
आज मी आहे तर उद्या दुसरं कोणी असेल. वेळेचे चक्र फिरत राहिल. पुन्हा असंच घडत राहिल. व्यक्ती तिच नसेल आणि वेळही दुसरी असेल. प्रवासी मात्र वेगवेगळे असतील. काही सावरायला धावत जातील. काही तमाशा बघत टाळ्या पिटतील. मी तेव्हा असेल-नसेल ठाऊक नाही. बघ्या असण्यापेक्षा धावून गेलो एव्हढेच म्हणेल. राहिलाच तो प्रसंग आहे-होता-असेल तसाच जिवंत..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, August 29, 2014

समाधान..! :-)

क्षण..!

समाधान..!

कधी-कधी आपण इतके पुढे निघून येतो कि, स्वत:चे पंख पसरुन उडण्याचे विसरुन जातो. सतत कोणी तरी हवं असतं. प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष कुणी हवं असतं. आधार आणि पाठींबा म्हणने चुकीचेच ठरेल. पाठराखण आणि पर्याय म्हणने सुद्धा चुकीचेच ठरेल. नात्यांचा सोज्वळ गोतावळा तर दुरच. नेमकं कोण हवं असतं विचारलेच तर उत्तर कुणीही चालेल ओठात असतं. का? कशासाठीची वर्गवारी करतांना, कांद्याचे एक-एक पापुद्र बाजुला निघावेत तसे सगळे आपापली जागा हेरुन नजरेसमोर फिरत असतात.
सखोल विचार केला तरी उत्तर मिळत नसतं. वाट अडली नसते, वेळ थांबली नसते. पर्याय म्हणून कुणाला निवडण्याची इच्छाच नसते. बस! थांबावं इथेच म्हणत आजवर घडून गेलेल्या झालं-गेलंची उजळणी होते. सरते शेवटी प्रश्न होता तसाच राहातो. होतं एखाद वेळेस म्हणून आपण पुर्वरुप होतो. काही दिवस जातात. आठवडा उलटण्यात असतो कि, पुन्हा तसाच तो एक प्रश्न आ वासून बघतो. पुन्हा वेळ जायला प्रत्येक नात्याचे समिकरण आजमावून बघतो. शेवटी तरीही उत्तर मिळत नसते. नेमकं कुणाला शोधत असतो? कुणाला स्वत:च्या इतक्याजवळ अनुभवत असतो? आभास म्हणून खिल्लीही उडवता येत नाही. झटकून मोकळंही होता येत नाही. काय चाललेय काय नेमकं स्वत:लाच कळत नाही.
पंख स्वत:चेच असले तरी मालकी स्वत:चीच नसते. गुलामगिरी म्हणावे तर मोबदला राजेशाही असतो. एक सहवास, एक भिजरी पायवाट, रितेपणात प्रकर्शणाने एकटेपणा देवून जातो. हवं काय होतं अन् मिळालं काय होतं? स्वत:ला निचोडून कमवलं काय होतं? हिशेब लावला तरी गमवलं काय होतं? प्रेम-मैत्री-नातं नेमकं कशात शोधायचे स्वत:चेच समाधान?
पंख असुन आभाळ गाठता येत नाही. आभाळ दिसून पंख पसरता येत नाही. दुनियादारी करतांना कर्जबाजारी होता येत नाही. पुन्हा सुरवात करायची तर आहे त्याचाच निकाल लागत नाही. दरवेळी तिच आघाडी सराईतपणे पेलता येत नाही. छंद करावे पुन्हा तर धुंद होत नाही. झुगारावे सगळेच तर चौकट सुटत नाही. आयुष्याची नशा बाटलीत उतरत नाही. दशा करुन घ्यावी तर नेटकेपणा सुटत नाही.
हव्यास वाढवावा तर प्रयास पुरे पडत नाही. आयुष्य जगल्याशिवाय कयास कशाचाच लागत नाही. प्रश्न-प्रश्न म्हणत उत्तर तडीस लागत नाही. आहे त्यात समाधान मानावे, कसं सहज सुचत नाही? शोधत समाधानच असतो नेमकं कशात मिळत? ज्याच तो व्यवस्थित जाणतो. मला तरी लिहून समाधान मिळतो. तर कुणाला मी लिहिलेलं वाचून 'समाधान' मिळतो..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

गरळ..! (स्वगत..!) :-)

क्षण..!

गरळ..! (स्वगत)

कोरे कागद समोर पाहिल्यावर, बरेच विचार शब्दांत उमटायला आतुर झालेले असतात. मनासारख चंचल अजुन कोण असतं? आता हे तर लगेच ते! चौकटीतली मर्यादा मनाला लागू नसते. अवाक्या बाहेर आणि कल्पनेच्या पलिकडे, 'सुचणं' हे प्रासंगिक तत्वावर व्यक्त होत असते.
लिहून तर सहज जाते लेखणी. त्या लिखाणा मागे प्रश्न धावत राहातात. हे असंच का लिहिलं? हे तसंच का वाटलं? वाचायला निट-नेटकं होतं पण! ते आहे तसंच स्विकारायला मन का तयार नव्हतं? कधी चपखल अन् रास्त सुचल्यावर, "अरे! यात काय विषेश होतं?" व्यक्ती अनेक कल्पना अनेक. जसा गडबडीत थोडा फार वेळ मिळेल, तसे माझा शब्द रुपी कागद चाळून मोकळे.
पुर्वी दहा लोकं वाचतील असे मनात यायचे. आता हजार लोकं वाचतील त्याचे दडपण येते. थकवा वाटायला लागलाय आताशा, कि, मनात काहीच शिल्लक नाही? कुणाला प्रश्न नंतर पडतील पण मला नंतर द्यायच्या उत्तराचा आताच विचार करायला हवा. एक ना अनेक! लिखाणाचा विषय मांडून झाल्यावर, बोलायला अजुन एखादा विषय काढून ठेवावा लागतो. बरोबर मग उरायचे तरी काय? चुकांवर तोंडभर बोलायला असंच करावं लागतं. कदाचित, लोकांना त्यांच्यापेक्षा जास्त ओळखून पुढची रचलेली पायरी माझी असावी. पुन्हा मग दुखणं वर येतं. समज होण्यापेक्षा गैरसमज वाढत जातात. ज्याला मी स्वाभिमान म्हणतो त्याला ही लोकं अहंकाराच्या श्रेणीत बसवतात. फटकळ होवून विचारावे का मग मी त्यांना, तुमच्या लेखी स्वाभिमानाची परिभाषा काय आहे? झालेच मग मुसक्या बांधल्यास आमच्या तोंड पण उघडू दिले नाहीस. काय बोलावे तुला खरंच कळत नाही. चुकीच आहे पण ते व्यक्त करता येत नाही.
हाडाचा कवि आणि जन्मजात लिखाणाचा पिंड माझाही नाही. डोक्याचा वापर करुन लिहायला सुपिक बुद्धीही माझी नाही. डोक्यापेक्षा मनात जे येतं ते लिहून मोकळा होतो. स्वत:ला बुद्धीने हुशार समजणारे मग असे तर्क-वितर्कात का गुरफटले जातात कळत नाही. चार लोकांसारख वागण्यापेक्षा एक स्वत:सारख वागणं, सो कॉल्ड मला ओळखणा-या लोकांच्याही पचणी पडू नये तर म्हणावे काय? धरुन बाजुला केले तर तुझ्याकडून हे अपेक्षीत नव्हते. इथेही दिडमुढ होवून विचारले, मग काय अपेक्षीत आहे तुम्हाला माझ्याकडून? झालं विषयांतर! पिच्छा सोडला नाही पुन्हा विचारले तर शांतता. अपेक्षेच्या नावाने गरळ ओकण्या ऐवजी आतल्या आत गिळले सगळे. एव्हढे सर्वे असुनही मग पुन्हा दखल मी तरी का घ्यावी? चार लोकं सोडून देतात तसेच मी ही सोडून दिले. यातही चुकले माझेच तर 'हुशार' पुन्हा कोणी नाहीच या जगात.

----------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, August 22, 2014

परी-लोक..! (चिमुरड्यांच्या विश्वातून..!) :-)

क्षण..!

परी-लोक..! (चिमुरड्यांच्या विश्वातून..!)

गोब-या गोब-या गालांची एक परी होती छान
तिचे कर्दळी डोळे अन् चाफे कळी होती मान,

हसतांना लुकलुकायचे तिचे पांढरे शुभ्र दात
उशीर झाला म्हणून कंबरेवर ठेवायची हात,

विचार मग्न होत एक गोड शिक्षा द्यायची दान
पुन्हा असे करु नाही धरले होते माझेच कान,

कसे-बसे मनवत बसलो खर्जात अंगाई गात
खदखदून हसली यात गदगदून आलेच आत,

पाहाटे पर्यंतच्या स्वप्नात हुकूमत होती लहान
कोरड पडलेल्या घशाला ठावूक नव्हती तहान,

चोळून डोळे शिरायची बाणासारखी ह्या मिठीत
ढाल वेढली जायची दोन्ही हातांची त्या पिढीत,

क्षिण कसाला उरणार निरागस तो चेहरा पाहुन
परी सोबत बघू या म्हणतो परी-लोकात राहून..!
----------------- © मृदुंग
kshanatach@gmail.com

उद्विग्न..! :-)

क्षण..!

उद्विग्न..!

सहसा, आपण मनाला अंधारात कोंडून घेतो. उजेडाची भिती वाटते म्हणून नाही. मनात असलेलं स्वत:शिवाय कुणाला कळू नये. चेहरे-डोळे बोलके असले तरी, मनाचे हाल-बेहाल उघड होवू नये. तसेच नात्यांवर स्वत:च्या अस्वस्थ मनाचे परिणाम पडू नये. एकटेपणाच्या वलयात राहून सभोवती असलेलं, वर्तुळ विचलीत होवू नये म्हणून. पण! असे करतांना गोंधळ आपलाच होतो.
कुणाच्या नाही, आपल्याच जवळच्या व्यक्तींना आपण आपल्याच चौकटीतून दुर ठेवतो. "तुला-तुम्हाला कळणार नाही", समजुतीचे दोन शब्द सांगणे सोपे वाटतेय, तितके समजुतीने स्वत:चे वागणे-बोलणे स्वभावाच्या आचरणात आणने आपल्याला अवघड वाटत असते. वास्तविक, स्वत:कडून कुणाला पुन्हा दुखवण्याची आपली मंशा नसते.
सतत गर्दी टाळत राहातो. गर्दीत सापडून एकांत शोधत राहातो. सोबत कुणाची नाही स्वत:चीच हवी असते. खोट्या मुखवट्यांचा आधार घ्यायची इच्छा नसते. झगडायचे असतेच परिस्थितीशी पण कुबड्या म्हणून कुणाचा आधार नको असतो. कदाचित, स्वत:चाच स्वाभिमान स्वत:लाच नडत असतो. कुणाला सांगून छे! अगदी गरळ ओकून. सहज मार्ग मिळवायला कुणाच्या आधीन जाण्यास मन तयार नसते.
इतकाही वाईट काळ नाहीये हा. यापेक्षाही ब-याच वाईट दिवसांना-प्रसंगांना आपण स्वत:च हाताळलेले असते. तेव्हाही कोण होते आपल्यासोबत? चला, आताही आवाज दिला तर दहा पैकी एक तरी जवळ येईल. विचारेल-बोलेल-प्रश्नांचा भिडीमार करेल. त्यातून निश्पन्न काय होणार आहे? होईल ठीक, शांत राहा, जरा सबुरीने घे! हे असे करुन बघ, ते तसे करुन बघ. चहोबाजुने विचार करण्याची पात्रता असुनही, शेवटी एक निर्णय जो स्वत:लाच घ्यायचाय. यावर परिस्थितीच्या परिणामांचा काय प्रभाव पडेल? याची गृहीतके पुन्हा पडताळण्यात काय अर्थ आहे?
"तुला जे हवं तेच तू केलं", उपहास म्हणून उपकाराचे शब्द तरी का हवेत? बरोबर नसेलही कदाचित, चुकीचेही नसेल कदाचित. आहे ते स्विकारायला मग एव्हढे स्वत:चेच मन का मुजोर झाले असावे? वेळ काय तो नंतर या निर्णयाचा सोक्ष-मोक्ष लावेल. ठरवलंय ना आता मग पर्वा कशाची? "हात लावेल ते मातीच होते". अरे, हात लावून सोने होण्यापेक्षा हे चांगलेच. माती होती मातीच झाली.
ढग दाटून आल्यावर, थेंब बरसू लागल्यावर त्याच मातीतून जे पेरलेय तेच उगवेल ना! गोंधळ काय नेमका माहित आहे का? मातीची राख होत नाही. वेळे आधी रोपटे उगवून त्याला फुले लागत नाही. घाईत आपण असतो पण वेळ तिच्याच सवडीने बदल घडवते. वाट पाहून विट आपल्याला येतो. वाट पाहातोय म्हणून थट्टा स्वत:ची होतांना बघतो. निराश होवून या आयुष्याला शेवटी जगणेच सोडून देतो.
करावे तरी काय मग आता? दरवेळी इतरांच्या कलेने घेवून, झुकते माप घ्यायचे तरी किती? उद्विग्न होणारच ना मन! मुकाट सहन केलं जातेय म्हणून थोडंही निटसे आयुष्य नसावे का? मला वाटेल तेव्हा नाहीच, वेळेच्या मनात असेल तेव्हाच. का अवलंबून राहावे वेळेवर तरी? ठरलेय आता वेळ गेली खड्यात. मी हवं तसं आनंदात स्वच्छंदपणे जगणारच. वेडं होवून जगल्याशिवाय वेड काय ते कळत नाही. बदल स्वत:लाही घडवता येतो. इथे गुलामी-मालकी-बांधिलकी कुणाची का म्हणून स्विकारावी?

झुगारलीत आता बंधणे
तोडल्यात सगळ्या बेड्या,
खरं जगण्यात मजा आहे
जाणून घे तू ही शब्द वेड्या..!
.
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, August 20, 2014

प्रेम..! :-)

क्षण..!

प्रेम..!

जगण्यात मजा येईल आणि जगायला आवडेल एव्हढेच प्रेम करावे. कुणाच्या नसण्याने गुदमरायला होईल किंवा कुणाच्या असण्याने डोकेदुखी वाढेल ते कसले प्रेम? तुझ्यासोबतही आयुष्य असायला हवे आणि तुझ्याशिवायही आयुष्य असायला हवे. दुध नासले म्हणून वाया ते जात नाही. काही ना काही चविष्ट पदार्थ बनवता येतो. तसेच दुध उतु गेले म्हणून चुकचुकत बसण्यातही अर्थ नसतो. जरा वेळाने सांडलेल्या त्या दुधाजवळ, डोळे मिटून अवघडून बसलेलं मांजर आलेलंच असतं. पर्याय असतोच पण तो शोधायचा नसतो. मोकळीक आहे म्हणून थोडं चुकण्याचाही हक्क असतो. बरोबर उत्तर आले तरच प्रश्न सुटाणार. शेवटचे नेमके उत्तर चुकले म्हणून सगळेच चुकायला आयुष्य न सोडवता येणारे गणित आहे असे थोडीच असते. उगाच श्वासांचे हिशेब लावत बसण्यात, समोर आलेला एक क्षण उष्टाच होवून जातो. प्रेमात जगायचे तर नभातल्या स्वच्छंद पाखरांसारखे. प्रेमात हारायचे तर पुन्हा बरबाद होण्यास जवळ काहीच शिल्लक अन् उसणेही नको..!
------------------ मृदुंग
kshanatch@gmail.com

7387922843

Monday, August 18, 2014

चाहता हुं..! :-)

क्षण..!

चाहता हुं..!

अब फिर कोई बरसात ना हो
किसीसे कोई मुलाकात ना हो,

बिछड जायें अपनेही भिड में
ऐसी मेरी फिर हैसीयत ना हो,

वजुद से मेरे करवट बदल लें
ऐसी कोई भी आधीरात ना हो,

जिन्दगी गुलजार सी मांग'कर
परेशानीयों की शिकायत ना हो,

आज भी फिर मुहोब्बत ना हो
के इस दिलमें कोई चाहत ना हो,

क्यों करुं सांसों से इबादत मैं
जब कोई अपना सलामत ना हो..!
------------------ मृदुंग
kshanatch@gmail.com

जिद्द..! :-)

क्षण..!

जिद्द..!

एखाद्याची झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात बळकट होवून; गाठलेले आभाळ म्हणजे 'जिद्द'..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Sunday, August 17, 2014

न पाठवलेलं पत्र / मेल..! :-)

क्षण..!

न पाठवलेलं पत्र / मेल..!

(सप्रेम) नमस्कार,

काल-पर्वाचे नव्हे, वाचून कदाचित काल पर्वाचाच मेल(E-mail) आहे किंवा नुकतेच हातात पडलेलं तुझं पत्र(Latter) आहे? अशी नवीच अवस्था नव्याने जुणाट रित्याणे माझी होत गेलीये. का?? माहित नाही. तोडून उडवून लावण्याचे नित्याचेच होते तरी. चॅट / SMS / कमेंट्स मधला हा ऑप्शन मेल्स आणि पत्रात मला लागू करता आला नाही. म्हणून कदाचित एक वेळ बाजुला ठेवले किंवा नंतर जरी वाचायला घेतले तरी नेमकं तोडून-मोडून न काढता तुला जे माझ्याशी बोलून स्पष्ट करायचे होते ते तुला करता आले असावे.
या प्रपंचातही तुझं एक चुकलं. सांगून मोकळे व्हायचे होते तुला पण तू स्वत:च आधी दिलेल्या उत्तराचा पुन्हा प्रश्न मलाच केलाय! :-) होतं शाहानिशा किंवा कुठे चुकलं? कुठे बरोबर होतं? तुझे हे विचारणे निश्चित स्वरुपात रास्त होते. पण! एक कळत नाहीये, झालं-गेलं त्या सगळ्याचे उत्तर तुझ्या न माझ्याकडे असुनही; आपण ही औपचारिकता का पाळतोय? तुला तोडून लावतांना स्पष्ट केलेच होते मी. तुझ्या बद्दल पुन्हा ना काही जाणून घ्यायचे आहे, ना काही जतवून द्यायचे आहे. जे झाले ते, अथवा जे होते ते! तुटणार होतं तुटलं आहे. स्वप्न होतं स्वप्नंच राहिले आहे.
या शिवायही तुझ्या(सो कॅाल्ड "सोबत")  नंतर, माझे जे असेल जसे असेल, ते तसेच असेल त्याच्यात तू अध्ये-मध्ये (चुकूनही चुक तू करत नाही म्हणून) जाणून-बुजून लुडबुड करु नये. एव्हढीच सुप्त इच्छा होती-आहे-असेल. तुला हे समजेल तर ना? कारण असे आहे कि, तुला फक्त समजून घेवून, माझे समजवून सांगणेच कळलेय. तुला स्वत: स्वत:चे समजतांना; माझे आज तुझा विषय आशया सकट गुंडाळतांना कितपत समजेल माहित नाही. 'काळजी-प्रेम-कणवं-दया-माया', तू लिहिलेल्या आणि दिलेल्या प्रत्येक संदर्भावर उपकारच वाटले. अगदी हाता वेगळे करुन निर्विकारपणे लिहिलेयेस. हा बदल तुझ्यात झालाय याचाच, वाचून मला झालेला द्विगुणित आनंद उत्तर दाखल कळवतोय..!
नेहमी प्रमाणे आहे तशीच राहा! मी छान(उगाच) वाटून घेतलंय तुझं पत्र / मेल वाचून..!

(पुन्हा नाही काही कळवले तरी चालेल..!) कळावे..!

अच्छा, गुड बाय..! (या वेळेस तरी कायम स्वरुपी..!)

कधी काळी (होतो)"आपला" सध्या प्रत्येकाचा,
---------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, August 14, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! ( कथा) (भाग-11)

:-)
क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-11)

(सारांश रुपी शेवट..!)

पहिले कोवळे दिवस भर्रकण उडून जातात. गेलेल्या प्रत्येक क्षणात ओढ रुपी कित्येक गाठी पडतात. 'ताबा ठेवावा तरी मनावर' असे, मनाला सांगाण्या आधीच मन मुजोर कधीच झाले असते. वेळ नसतो तरी वेळ काढतो. निघालेल्या सवडीतला वेळ सतत कमी पडतो. भर-भरुन बोलायला काहीच नसते. बस! नजरे समोर असावे फक्त वाटत असते. परिस्थिती दोघांची सारखीच होते. मनाचे सोडा, आपल्याच हृदयावर आपली मालकी नसते.

कुणाला तरी शब्दांनी सुरुवात करावी लागणारच असते. 'त् त् प् प्' करत अडखळत एव्हढे सोपे आयुष्य तरी कुणाला लाभले असते..? तू बोल आणि तू बोल मौनात मनाचे गोडवे हुरळून गेले असतात. थोडा अवकाश घेतांना सवकाश निवळणारी वेळ भरधाव धावते. बदलत असते असणे कुणाचे. ओळखू लागतो नसणे कुणाचे. बस! हे असेच असावे. अधुरे पण पुर्ण, अपुरे पण पुरे. फार काही काय द्यावं कुणा? थोड काही काय घ्यावं कुणा? जे आहे ते चांगलेच मग, काही तरी राहिलंय का वाटते मना?

दिवसा वेळ मिळेल तसा तोडका-मोडका संवाद होतो. रात्री सवड काढून आवर्जुन वाद होतो. राग-राग येतो नुसता तरी नव्या पाहाटे जुनाच खेळ होतो. प्रेमाचा एक घास हाता-तोंडाशी येवून जिभेवर बेचव वाटून जातो. त्याच्याशिवाय ती राहू शकत नाही. तिच्याशिवाय तो राहू शकत नाही. एकमेकांशिवाय करमते कसे कुणीच सांगू शकत नाही. ठरवून काहीसे ती बोलायला सुरवात करते. सहज तिच्याही नकळत तो शेवट करतो. पुन्हा एकदा ठरवून तो सुरवात करतो. अजाणतेने ती पुन्हा शेवट करते.

नियती रुपी परिस्थिती त्यांच्या विनोदाचा पुर्ण निचोडून आस्वाद घेते. पुढे काय या साध्या विचारा अंती अंगावर काटा आणि मनात गुलाबी गुदगुल्या होवू लागतात. पुढाकार घेण्यास मन कच खातेच. स्वप्न म्हणावे तरी अस्तित्वात त्या स्वप्नाची किंम्मत मोजतांना हात अखडता होतोच. गुलाबी बंधाची रेशीम गाठ बांधतांना चौफेर विचारांना खुंटी बसतेच. आहे-आहे होईल-होईल आयुष्य जरा आनंद देईल. कधी-कुठे-कसे-केव्हा तरी भेट समोरा-समोर होईल. निसटू नये म्हणून सतत जपत जावे. काय नेमकं मनात का कळे ना असे का व्हावे?

सहज सोपे अवघड होवून बसते. साधेसुधे नखरे हजार करते. ती त्याच्यावर ढकलते. तो तिच्यावर ढकलतो. वेळ चालून आल्यावर निभाव कुणाचा लागतो?

भेट होईल किंवा नाही. नातं फुलेल किंवा नाही. शेवट हवा तसा असेल किंवा नाही. बागेत रोज एक गुलाब उमलतो. गंध त्याचा दरवळेल किंवा नाही. संवाद आवडून जातात. स्वभाव बदलून जातात. छोटसेच जग भलते गोल-गोल फिरवतात. अंबर-धारा दररोज आजुबाजुला दिसतात. छोट्या-छोट्या गोष्टीत भर-भरुन जगतांना दिसतात.
.
(समाप्त)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

( मनोगत : सर्व प्रथम पुढचा आणि शेवटचा भाग लिहिण्यास जरा उशीर झाला त्या बाबत 'क्षमस्व'. एव्हढ्यात कथा संपवेल असे वाटलेही नसेल तुम्हाला. खरे तर दाहाव्या भागा नंतर कथेला अजुन पाय फुटायला हवे होते, मान्य! त्यात बरेच मित्र-मैत्रीणी हक्काने सांगू लागले कि, शेवट गोडच असावा. मग सुचले असेच गोड किंवा कडवट काय हे न संपणारे प्रेमच आहे. आता-आता संपेल म्हणत अजुनच अजुन रंग भरनारे मनच आहे. नातं बनवून समोरोप का करावा? प्रेम असणे स्वत:तही एक नातंच तर आहे. सारांश रुपी कथेचा शेवट घोळ करु लागला. रास्तही होते ओढून ताणन्यात अर्थही फारसा नव्हता. गेले तिन-चार महिने पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत असलेल्या सगळ्या रसिकांचा मनापासुन आभारी आहे..! )

Tuesday, August 12, 2014

सखे गं साजणे..! :-)

क्षण..!

सखे गं साजणे..!

बघुन तुला एक नजर
माझाही चंद्र लाजला,
चांदण्यांच्या मैफलीत
माझाही शब्द गाजला..!

भाळून या रुपास शंख
माझ्या हृदयात वाजला,
काय करावे न करावे मी
दवांवर स्वत:च भाजला..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, August 9, 2014

कशाला उगाच..? :-)

क्षण..!

कशाला उगाच..?

गंधाळून गार वारा
मंद वाहात राहातो,
विसरण्याचा त्याचा
छंद पाहात राहातो,
आठवतच ती वाट
रुंद नाहक पाहातो,
झालं-गेलं सगळंच
धुंद ग्राहक राहातो.
निसर्गाचा उभा मी
बंद पाहात राहातो,
निशिबाला पोरका
वंद वाहात राहातो..!
---------------- © मृदुंग
Kshanatch@gmail.com

Friday, August 8, 2014

होते..! :-)

क्षण..!

होते..!

विक्रेत्यांचे भरले बाजार होते
विकृतांचे झाले आजार होते,

सताड उघडे ते एक दार होते
बघणारे डोळे इथे फार होते,

दुरदैव म्हणे ते भागिदार होते
वासनेचे प्रेतं साक्षिदार होते,

विकलेले अन्याय हजार होते
मिळालेले पुण्य बेजार होते,

चढवून मिरवलेले विजार होते
हे मन शोकात निजार होते,

एव्हढे या दु:खाचे उकार होते
सुखावर सुखाचे नकार होते..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, August 5, 2014

वंगाळ..! :-)

क्षण..!

वंगाळ..!

एका प्रेतात आणि एका कवितेत फरक फार नसतो, जे मेलेलं आहे त्याला कुणी विचारत नाही अन् जे जिवंत आहे त्यांच श्राध्य कुणी घालत नाही. एव्हढेच काय कवितेत जिवंत असुनही जुमानत कुणी नाही. निव्वळ कागदात अन् प्रेतात उरतं ते अस्तित्व आणि पुसट होतं ते ही अस्तित्व. वंगाळ तर मग आयुष्य झालेलं असतं..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

पुन्हा एकदा मेलेलं..! :-)

क्षण..!

पुन्हा एकदा मेलेलं..!

एक प्रेत चितेवर
शांतपणे जळत होतं,
उपहास करुन ज्वालेचा
ते ही सुखात लोळत होतं,
आक्रोश केला नाही
थेंबांवर घर गळत होतं,
तू नाहीच तर तुझं गाव
उभ्या सरीवरच बुडत होतं..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com