क्षण..!
प्रेम..!
जगण्यात मजा येईल आणि जगायला आवडेल एव्हढेच प्रेम करावे. कुणाच्या नसण्याने गुदमरायला होईल किंवा कुणाच्या असण्याने डोकेदुखी वाढेल ते कसले प्रेम? तुझ्यासोबतही आयुष्य असायला हवे आणि तुझ्याशिवायही आयुष्य असायला हवे. दुध नासले म्हणून वाया ते जात नाही. काही ना काही चविष्ट पदार्थ बनवता येतो. तसेच दुध उतु गेले म्हणून चुकचुकत बसण्यातही अर्थ नसतो. जरा वेळाने सांडलेल्या त्या दुधाजवळ, डोळे मिटून अवघडून बसलेलं मांजर आलेलंच असतं. पर्याय असतोच पण तो शोधायचा नसतो. मोकळीक आहे म्हणून थोडं चुकण्याचाही हक्क असतो. बरोबर उत्तर आले तरच प्रश्न सुटाणार. शेवटचे नेमके उत्तर चुकले म्हणून सगळेच चुकायला आयुष्य न सोडवता येणारे गणित आहे असे थोडीच असते. उगाच श्वासांचे हिशेब लावत बसण्यात, समोर आलेला एक क्षण उष्टाच होवून जातो. प्रेमात जगायचे तर नभातल्या स्वच्छंद पाखरांसारखे. प्रेमात हारायचे तर पुन्हा बरबाद होण्यास जवळ काहीच शिल्लक अन् उसणेही नको..!
------------------ मृदुंग
kshanatch@gmail.com
7387922843
No comments:
Post a Comment