Powered By Blogger

Saturday, August 30, 2014

प्रसंग..! :-)

क्षण..!

प्रसंग..!

वैतागून होते आज सगळे, प्रत्येकाचे कुठे ना कुठे काही ना काही बिनसले होते. माझ्यापरिणे मी सोडवण्याचा निश्फळ प्रयत्न केला पण अपयशीच ठरलो. का? माहित नाही.  कशासाठी मी स्वत:चा त्रास विसरुन त्यांच्या मदतीला धावून गेलो? माहित नाही. आता स्वत:लाच कोसत बसलोय.
झालं-गेलं सगळं उसवत बसलोय. गाठी सोडत एकाकी स्वत:शीच हसलो अन् पुन्हा चालू लागलो. त्याच उन्हात तिच चटके सहन करत. अनवाणी वाळवंटात गुंतत गेलो. राजरोस हे कुणा ना कुणा सोबत घडणार असते. मी तरी कुठवर पुरणार आहे?
आज मी आहे तर उद्या दुसरं कोणी असेल. वेळेचे चक्र फिरत राहिल. पुन्हा असंच घडत राहिल. व्यक्ती तिच नसेल आणि वेळही दुसरी असेल. प्रवासी मात्र वेगवेगळे असतील. काही सावरायला धावत जातील. काही तमाशा बघत टाळ्या पिटतील. मी तेव्हा असेल-नसेल ठाऊक नाही. बघ्या असण्यापेक्षा धावून गेलो एव्हढेच म्हणेल. राहिलाच तो प्रसंग आहे-होता-असेल तसाच जिवंत..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment