क्षण..!
परी-लोक..! (चिमुरड्यांच्या विश्वातून..!)
गोब-या गोब-या गालांची एक परी होती छान
तिचे कर्दळी डोळे अन् चाफे कळी होती मान,
हसतांना लुकलुकायचे तिचे पांढरे शुभ्र दात
उशीर झाला म्हणून कंबरेवर ठेवायची हात,
विचार मग्न होत एक गोड शिक्षा द्यायची दान
पुन्हा असे करु नाही धरले होते माझेच कान,
कसे-बसे मनवत बसलो खर्जात अंगाई गात
खदखदून हसली यात गदगदून आलेच आत,
पाहाटे पर्यंतच्या स्वप्नात हुकूमत होती लहान
कोरड पडलेल्या घशाला ठावूक नव्हती तहान,
चोळून डोळे शिरायची बाणासारखी ह्या मिठीत
ढाल वेढली जायची दोन्ही हातांची त्या पिढीत,
क्षिण कसाला उरणार निरागस तो चेहरा पाहुन
परी सोबत बघू या म्हणतो परी-लोकात राहून..!
----------------- © मृदुंग
kshanatach@gmail.com
very beautiful poem sir
ReplyDelete