♥
♥ क्षण..! ♥
प्राजक्त गंधाळतांना..!
प्रत्येकाचा प्रवास सारखा नव्हे! एकसारखाच असतो... लुभावण्या वाटेच्या प्रेमात जो-तो पडतो... ओळख होते... मैत्री वाढते... ओढ लावणाऱ्या क्षणांशी नाते घनिष्ट जुळते... प्रेम म्हणजे काय? हे समजन्या आधी स्वप्नांचे मनोरे सजू लागतात... अपेक्षांचे जाळे गुंता वाढवू लागतात... पावसाच्या पहिल्या सरेसारखा प्राजक्त ओंजळीत एकनिष्ठ होऊन गंधाळू लागतो... कुणाला आवडू लागतो मखमली स्पर्श... हवाहवासा वाटतो कोवळा गंध... मोह दोन क्षणांचा आयुष्य नासवतो... येणाऱ्या प्रत्येक लाटेवर श्वासांना तू-मी उसवतो... तरीही प्राजक्ताचा गंध रित्या ओंजळीत दरवळतो... कारण प्राजक्ताच्या फुलांचे बरेच पावसाळे भरल्या ओंजळीतच कोमेजुन गेले असतात... भर पावसात मग प्राजक्त उभा-उभा जळतो... कोणी आठवतं तर कोणी विसरतं... पावसाच्या ओल्या चिंब दिवसात... ओंजळीत मातीनंतर एक कोमेजलेला प्राजक्तच उरतो गंधाळतांना..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment