♥
♥ क्षण..! ♥
आर्त प्राजक्त..!
पहाटे पांढऱ्या चांदण्यांचा
माझ्या अंगणात सडा पडतो,
गंधाळलेला बेधुंद गंध मग
घरभर यथेच्छ दरवळू लागतो..!
सुरेल ताण छेडते कोकिळ
अन् दिवस माझा बकुळ होतो,
कर्दळी पानांवर पापण्यांना
काजळ एक काळा ढग लावतो..!
फांदी-फांदीवर थेंब उतरतो
अन् ओंजळ माझी मागत राहतो,
थेंबातून एक हात पुढे येतो
आभास स्वप्नांचा फसवत राहतो..!
एक क्षण प्राजक्ताचाच पाऊस
मला त्याचे आयुष्य परत मागतो,
आणि मी त्याची राख बागेतल्या
मातीत पुन्हा-पुन्हा पेरत राहतो..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment