Powered By Blogger

Sunday, August 30, 2015

मला वाटलं..! :-)


♥ क्षण..! ♥

मला वाटलं..!

वाटलं, तुला वाटलं यावर कित्येक गैरसमजुतींचे अस्तित्व शाबूत होत असतं आपल्या नात्यात थोडा अंदाज असेलच ना तुला? म्हणून तुला वाटणं संपत नाही. कधी तुझा अंदाज बरोबर असतो पण वास्तवात बऱ्याचदा चुकीचा असतो. कारण प्रसंगाचा अनुभव घेतांना निष्कर्ष तुझे त्वरित लागतात. संयम बाळगून स्थिरतेने परिस्थिती हाताळने तुला सहज जमत नाही. आधीच त्रास होत असतो तुला कळत असूनही त्यात तुला तुझं तत्व आणि महत्त्व शाबूत ठेवायचे असते का? माहीत आहे कारण एक तूच अशी असतेस जी ओढावलेल्या प्रसंगात खंबीर उभी राहणार असतेस आणि तुला न मागता मिळणार श्रेय घेणार असतेस.
खोट! मला असं काहीच नको हे तू नक्कीच म्हणशील पण तुझं महत्त्व तुझ्या नाकरण्याने कमी होऊ देशील? नाही ना! 'तुला हवे ते तू कर, तुझा तू मोकळा आहेस' असे बोलून दुनियेत नसलेली सुचनांची पुस्तिका तू तोंडीपाठ मला सांगायला चुकत नाही. मग माझं मोकळ होणं आलंच ना पुन्हा तुझ्याच सुचनांच्या पायथ्याशी? आताही तू मान्य करणार नाहीस हे मला ठाऊक आहे. 'मला वाटलं ते मी सांगितले, बाकी तुझी इच्छा' इथे परत तुझ्या वाटलंच्या इच्छेचा गळा कसा घोटायचा?
शब्दात पकडू नकोस म्हणून आणखी तडफड तुझी होते. मी गप्प बसलो तर ते ही असह्य उठलेलं वादळ तुझ्या वाटलंच्या तावडीत तू जखडते. विषयांतर करत मनातलं बरोबर काढून घेतेस आणि शेवटी परत मला नाही वाटत तस काही इथे तुझ्याच तुला वाटलंची गळचेपी करतेस. हे बोलून दाखवल तर परत 'मला त्रास होतोय, मला तसे नव्हते म्हणायचे' असे तुझे हळवे कापरे उत्तर तयार असते. मुळात तुला तुझे वाटलं बरोबर करुन पाट्यावर आपलं नातं ठेवून वरवंट्याने सगळ्या स्वप्नांना एकजीव करुन घेऊन आयुष्य खुळखुळ बनवून टाकायचे असते. इथेही तू कमी पडायला चुकत नाही. कसं होणार आहे तुझं? हे बोलून तुझ्या वाटलंचा संपूर्ण मिश्रणाच्या परिणामांना जबाबदार देखील मलाच ठरवून तू बिचारी होऊन बसते. पुढे वाढणाऱ्या वादांना संवाद मी म्हणतो! ऍटलीस्ट ते तुझ्या वाटलंच्या चौकटीत अजून तरी सापडत नाही म्हणून.
अजून नाही पण कधी कुठेतरी तुझ्या वाटलं मध्ये मला काय वाटतं आलंच तर आपण म्हणजे मी काही बोलायचे नाही तुझा हुकुम मान्य करायचा आणि होऊ द्यायचे तुला हवे तसे कारण तुझं फक्त मला वाटलं असतं त्याच्या पुढे तुला जे करायचे ते कर असतं. कुठेही तुला काय वाटतेय? असं चुकुनही नसतं. कदाचित हे सगळे वाचून तरी तुझं मला वाटलं आपल्याला वाटलं होईल याची परिणाम शून्यता ओळखून निष्फळ आशेवर लिहून टाकावे असे "मला वाटलं..!"
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

Wednesday, August 26, 2015

विचारांचे वावटळ..! :-)


♥ क्षण..! ♥

विचारांचे वावटळ..!

विचारांचे वावटळ कधी-कधी इतके प्रखर असते की, नजरेला शून्यात नेवून वेळेला बरेच गतिमान करतात आणि काळामागे होता शब्द जसा अगदी तसाच पुढे पुन्हा विचारांचा शून्यच लिहून मोकळा होतो! कारण विचारांचे वावटळ गुंताच वाढवतात व अजून नवा गुंता करतात तो ही अर्थहीन गोष्टींचा-नात्यांचा-आयुष्याचा किंवा तुझ्या मनात भरलेल्या पुढे येणाऱ्या माझ्या क्षणांचा..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
73879 22843

Sunday, August 23, 2015

आपलंही-परकंही..! :-)


♥ क्षण..! ♥

आपलंही-परकंही..!

दररोज स्वतःच्या अस्तित्वाची लढाई होते. पुरुन उरता-उरता दिवसासारखंच सगळ संपल्यात जमा होते. जाणारी वेळ कळत नाही, येणारा काळ दिसत नाही. रोज सजणं होतं, शृंगाराचे विस्कटणं होतं. हसण्यामागच्या कुजकट यातनेला साराईतांसारखं मुखावट्यात लपवलं जातं. 'तुला कळत नाही, मला समजत नाही.' रोज दिवस उगवतांना दिसतो पण दिवस मावळाला-संपला हे बघायला वेळ नसतो. पायरी सोडून चाकरी निभावली गेली असते. स्वतःची चौकट-ऐपत कवडी मोलाची जगाच्या लेखी होते. स्वतःचेच स्वतःला काही कळत नाही. जगाच्या दूतोंडी व्यवहाराची पर्वा करायला वेळ कुणाकडे आहे? कसे चाललेय तुझे? "मस्त-मजेत" स्वतःच्याच कानफट्यात स्वतःने चपराख बसवल्यासारखी अवस्था उत्तर देतांना होते. त्यात रोज भेटणं, भेटून भांडणं. वैताग येतो! असलेलं सगळच ओवाळून टाकावसं वाटतं. कधी-कधी तर 'हे एक फार वाईट स्वप्न पाहात आहोत या स्वप्नातून खूप गोड जाग येणार आहे.' या विश्वासावर कित्येक आयुष्य मातीत गेले. आपण काहीच नाही!
होईल! बरं होईल, तेवढच खरं होईल. दिलासे मिळतात आणि उसासे सुटतात. रोजच्या आखून ठेवलेल्या वर्तुळात बदल होत नाही. स्वप्न आहे तर त्यातून जाग येत नाही. वास्तव म्हणून स्वीकारायचे तर धाडस काय मनसुद्धा तयार असत नाही. ठरलेली वेळ, नेमून दिलेलं काम, सरलेला-गेलेला दिवस आणि तेच वर्तुळ तोच कोरडेपणा अन् हेच उसणे अवसान! मोकळा श्वास घ्यायचाय तर प्रत्येकाने वाळी/त टाकल्यासारखंच!
स्वार्थ्यांसोबत जगतांना स्वतःचा स्वार्थ एकदा पाहिला तर गुन्हा म्हणून नजरांचे स्वागत करावे लागते. त्याच नजरांना न जुमानता श्वास घेतला तर घमंडी-हेकेखोर-अहंकारी दागिने दिमाखात नजर केली जातात. दैनंदिन अशी घालमेल असतांना नात्यांच्या बाजारात कर्जबाजारी होऊन बरबाद होणं निश्चित असतं. पाण्यात पडल्यावर पोहायला शिकता येतं. एकट्याने पडलेलं ठीक! स्वतःच बरं-वाईट झाल्याची पर्वा नाही. एकासोबत दुसऱ्यालाही पाण्यात ढकलले की, पोहायच कुणी आणि बुडायच कुणी? वाचवणारे किणाऱ्यावर दात काढतात त्यांच्याकडून यापेक्षा अजून अपेक्षा कसली करावी? स्वतःची शास्वत बुद्धी जागृत असते शरीराला प्रवाहावर सैल सोडून दिले की किनारा गाठता येईल. मनाची किनारे मैलो दूर असलेल्या टोकावर सहप्रवास करतांना नेवून सोडतात. त्यात जवळ येणं-असणं-आणि आपलं होणं कसे शक्य आहे? कुणाचे होता येतं पण कुणाला आपलं करता येत नाही.
प्रत्येक गोष्टीची वेळ ही वेळ गेल्यावरच का होते आजवर कुणालाच कळालेल नाही. तरी रोज आवडीने 'माझीसुद्धा वेळ येईल' याची वाट बघणाऱ्यांची अपेक्षा एक थट्टाच असते. हे टोक नाही तर ते टोक मधल्या मध्ये तारेवरची कसरत करणाऱ्यांची 'एक ना धड ढगभर चिंध्या' होणे नक्की असते.
अशावेळी करायचे काय? निर्णय घ्यायचे काय? स्वतःला उभे करायचे कसे काय? प्रश्नांचे भरलेलं पान असते पण उत्तर देणारं कुणीच असत नाही आपलंही-परकंही..!
------------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

Tuesday, August 18, 2015

"आईसाठी - आई विषयी..!"


♥ क्षण..! ♥

'आईसाठी-आई विषयी..!"

【१】
आई ही जीवनाची कल्पतरु असते
नात्यांच्या धाग्यांची एक गाठ असते
कष्टमय आयुष्याची सहनशील मूर्ती असते
अविरत बरसणारी प्रेमाची ओली सर असते
माया-ममतेचा सागर कधी आटत नाही
थकते शरीर पण उत्साह संपत नाही
अपार कष्टांची पराकाष्टा कृपाछत्र तुझे
ऋणी तुझे राहून सार्थ व्हावे आयुष्य माझे..!
----------------------------- मृदुंग™

【२】
सतत पाठीशी उभी असते
पदरात माया कायम असते..
सानिध्यात तुझ्या वात्सल्य
अविरत प्रेम तुझे अमूल्य..
कधीच तू स्वतःसाठी जगत नसते
उद्याच्या दिवसालाही आज राबवते..
तुझ्या कष्टांचे संस्कार झालेत
तुझ्या प्रेमाचे अलंकार झालेत..
होs! हवा तुला तर हा हट्ट समज
तुझं आयुष्य आतातरी जग सहज..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

Friday, August 14, 2015

६८वा स्वातंत्र दिन..! :-)


♥ क्षण..! ♥

६८वा स्वातंत्र दिन..!

तुझा मान आज अन् मला अभिमान आहे
तांबडा पांढरा हिरवा अन् निळा प्राण आहे,

दृष्टिकोण दे मला जरा सभ्यतेत जगायला
तुझे नावच म्हणतात उत्साहाने भरुन आहे,

निष्प्राण होतो म्हटले मी जेव्हा देशभक्ताला
उसनवार तेव्हा मातीचा एक एक कण आहे,

बलिदानाच्या बाता नकोत पुन्हा सांगायला
स्वतंत्र बेटांचे छोटे घर प्रत्येकाचे छान आहे,

माणसे फार झाली माणूस ना कोण झाला
संकुचित अस्वच्छ मनातच फार घाण आहे,

चुका दाखवतो पण येत नाही सुधारायला
एका दिवसासाठीच हा भारत महान आहे,

तुला हवेय? घेऊन जा, उरलेलं ठेवायला
पापण्याच्या ओंजळीत जागा लहान आहे,

काळ्या हृदयात स्वप्ने एकत्र सामवायला
शेजारुन मागत आणतो मी ही वाण आहे,

उडू दे! उडू दे! भिडू देs! पंख गगनाला
पदरात पडणार एवढसच एक दान आहे,

स्वतंत्र नव्हेच! करा साजरे स्वातंत्र्याला
बोलत स्पष्ट इतिहासाचा कोरा पान आहे..!
------------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

६८व्या स्वतंत्र नव्हे स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा..! :-)

Thursday, August 13, 2015

आयुष्य नावाच्या पुस्तकात..! :-)


♥ क्षण..! ♥

आयुष्य नावाचे पुस्तक..!

आयुष्य नावाच्या पुस्तकात अनुभव नावाचे धडे असतात. परिस्थिती नावाचे आव्हाने असतात. निशिबाचे कुजकट विनोद असतात. प्रसंग नावाची प्रश्नमंजुषा असते. उत्तरादाखल वेळेची अवधी असते. हारण्या-जिंकण्याची भविष्यासाठी संधी असते. सोडवण्यासाठी श्वासांची बेहिशेबी गणिते असतात. समजन्यासाठी आणि कळण्यासाठी अस्तित्वाची प्रमाणे असतात. दिवस-रात्री नावाची चंदेरी-सोनेरी पाने असतात. लिहायला-अनुभवायला-घडायला अपघात-घडामोडी असतात. हे सगळे असूनही जगायला सवडी नसतात. वाचायला अवधी नसतात. गुह्यांची दखल घ्यायला अपराधी नसतात. आयुष्य नावाच्या पुस्तकात खरे न होणारे लुभावणे स्वप्ने डोळ्यात बंद असतात. ओढ लावणारी मने संकुचित असतात आणि या पुस्तकात स्वतःसह असलेली माणसे उपरी असतात- स्वार्थी असतात-मतलबी असतात-बरोबर असतात. आयुष्य नावाच्या पुस्तकात पात्रे नसतात-कथा नसतात-कविता नसतात-गीते नसतात फक्त आरोप असतात. हे आयुष्य का दिले? दिले त्याबद्दल अप्रूप का नाही उरले? या आयुष्याच्या पुस्तकाच्या पानांना वाळवी का लागली नाही-कुजली का नाही-गळून का गेली नाही? आयुष्य नावाच्या पुस्तकात..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

Monday, August 10, 2015

संभाषण..! ;-)


♥ क्षण..! ♥

(बॅक विथ ओल्ड फॉर्म)

संभाषण..!

सुरुवातीच्या औपचारिक हाय-हॅलोनंतर आणि एकमेकांना दररोजची सवय लागल्यावर, कसायेस-कशीयेस यांच्या पुढच्या प्रश्नावर म्हणजे काय करतोयेस आणि करतेयेस यावर थेट अनौपचारिक अतिक्रमण होऊन सराइतपणे प्रश्नांची गळती होते. उत्तरांची वेळ वाचवली जाते. आपल्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीची पुढची ओळ अचूक हरेली जाते. सुरुवात आणि औपचारिकतेचे जाळे तोडून नात्यांचे केशरी नाजुक बंध बांधले जाऊ लागतात.
तुला मी आणि मला तू या थराचे नाते छान जुळते. तळमेळ उत्तम जमतो सवयी आठवणीने लक्षात राहतात. लटक्या रागाचा नखरेल नाकावर असलेले स्थान स्वतःच्या लेखीसुद्धा नसतांना इगो-अहंकार म्हणत आरोपांची सर बेधुंद बरसवली जाते. एखादा तीसरा मध्यस्ती करुन तेढा सोडवण्यापेक्षा त्याचा मनमुराद आनंद घेतो. तू अशीच आहे, तो असाच आहे! वाद नुसता वाद मग उरतो. बोलायच्या आधीच सरळ बोलायचे तिरकस बोलायचे असेल तर बोलू नकोस हुकूम मिळतात.
कुठलीही कारणमीमांसा न करता आलेला दुरावा दीर्घकाळ टिकतो. चांगलं-वाईट प्रसंगांत तो विषयच टाळलेला बरा वाटतो. काळ जातो वेळ जाते. तू बदललास तू बदललीस म्हणत जो तो जैसे थे उरतो आणि दरम्यान होत असलेले संभाषण अबोल्यात-एकांतात थैमान घालते. तेव्हा जावू दे तो नाही सुधारणार आणि ती नाही बदलणार म्हणत दोघेही बदलून जातात. शेवटी एक दिवस पुन्हा नवी ओळख, नवा परिचय, जूना संवाद आणि ते तसलेच वाद त्याच संभाषणाच्या माध्यमातून होत असणार-राहणार आणि तेवढाच वेळ जाणार..! दे टाळी..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

Thursday, August 6, 2015

स्वर विरले, सुर हरवले..! :-)


♥ क्षण..! ♥

स्वर विरले, सुर हरवले..!

ओठाशी घेऊन बासरीला असे काही झाले
मंजुळ स्वर विरले आणि मधुर सुर हरवले,

मला काळ पुढे नेत गेला माझ्या असण्याचे
तराणे; शब्दानेच कागदावर उतरत राहिले,

अनावधाणाने सुरांचीच राणी आली समोर
परिस्थिती बघ मी तिलासुद्धा ना ओळखले,

आठवली मला रसिका ती नव्हे ना राधिका
स्वर होते सुरांतच परी सुर माझे ना लागले,

दशा झाली होs! दशाच झाली आयुष्याची
सुर छेडतांना स्वरांनी मनाला अस्वस्थ केले,

खंबीर, घट्ट न मजबूत होती हातांची पकड
सैल झालेल्या गाठीतच ही हाते थरथरले,

कापरे झाले स्वर आणि ओठ शुष्क झाले
राधा-मीरा एकरुप परी कृष्ण उपरे पाहिले..!
------------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Monday, August 3, 2015

दुनियेची रित..! :-)


♥ क्षण..! ♥

दुनियेची रित..!

जीवनात अपयशी झालेली माणसे यशाची व्याख्या जगत असतात आणि जीवनात यशस्वी झालेली माणसे यशाची व्याख्या शोधत असतात. विचित्र आहे पण दुनियेची हिच रित आहे..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.co