Powered By Blogger

Thursday, August 13, 2015

आयुष्य नावाच्या पुस्तकात..! :-)


♥ क्षण..! ♥

आयुष्य नावाचे पुस्तक..!

आयुष्य नावाच्या पुस्तकात अनुभव नावाचे धडे असतात. परिस्थिती नावाचे आव्हाने असतात. निशिबाचे कुजकट विनोद असतात. प्रसंग नावाची प्रश्नमंजुषा असते. उत्तरादाखल वेळेची अवधी असते. हारण्या-जिंकण्याची भविष्यासाठी संधी असते. सोडवण्यासाठी श्वासांची बेहिशेबी गणिते असतात. समजन्यासाठी आणि कळण्यासाठी अस्तित्वाची प्रमाणे असतात. दिवस-रात्री नावाची चंदेरी-सोनेरी पाने असतात. लिहायला-अनुभवायला-घडायला अपघात-घडामोडी असतात. हे सगळे असूनही जगायला सवडी नसतात. वाचायला अवधी नसतात. गुह्यांची दखल घ्यायला अपराधी नसतात. आयुष्य नावाच्या पुस्तकात खरे न होणारे लुभावणे स्वप्ने डोळ्यात बंद असतात. ओढ लावणारी मने संकुचित असतात आणि या पुस्तकात स्वतःसह असलेली माणसे उपरी असतात- स्वार्थी असतात-मतलबी असतात-बरोबर असतात. आयुष्य नावाच्या पुस्तकात पात्रे नसतात-कथा नसतात-कविता नसतात-गीते नसतात फक्त आरोप असतात. हे आयुष्य का दिले? दिले त्याबद्दल अप्रूप का नाही उरले? या आयुष्याच्या पुस्तकाच्या पानांना वाळवी का लागली नाही-कुजली का नाही-गळून का गेली नाही? आयुष्य नावाच्या पुस्तकात..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

No comments:

Post a Comment