Powered By Blogger

Sunday, August 30, 2015

मला वाटलं..! :-)


♥ क्षण..! ♥

मला वाटलं..!

वाटलं, तुला वाटलं यावर कित्येक गैरसमजुतींचे अस्तित्व शाबूत होत असतं आपल्या नात्यात थोडा अंदाज असेलच ना तुला? म्हणून तुला वाटणं संपत नाही. कधी तुझा अंदाज बरोबर असतो पण वास्तवात बऱ्याचदा चुकीचा असतो. कारण प्रसंगाचा अनुभव घेतांना निष्कर्ष तुझे त्वरित लागतात. संयम बाळगून स्थिरतेने परिस्थिती हाताळने तुला सहज जमत नाही. आधीच त्रास होत असतो तुला कळत असूनही त्यात तुला तुझं तत्व आणि महत्त्व शाबूत ठेवायचे असते का? माहीत आहे कारण एक तूच अशी असतेस जी ओढावलेल्या प्रसंगात खंबीर उभी राहणार असतेस आणि तुला न मागता मिळणार श्रेय घेणार असतेस.
खोट! मला असं काहीच नको हे तू नक्कीच म्हणशील पण तुझं महत्त्व तुझ्या नाकरण्याने कमी होऊ देशील? नाही ना! 'तुला हवे ते तू कर, तुझा तू मोकळा आहेस' असे बोलून दुनियेत नसलेली सुचनांची पुस्तिका तू तोंडीपाठ मला सांगायला चुकत नाही. मग माझं मोकळ होणं आलंच ना पुन्हा तुझ्याच सुचनांच्या पायथ्याशी? आताही तू मान्य करणार नाहीस हे मला ठाऊक आहे. 'मला वाटलं ते मी सांगितले, बाकी तुझी इच्छा' इथे परत तुझ्या वाटलंच्या इच्छेचा गळा कसा घोटायचा?
शब्दात पकडू नकोस म्हणून आणखी तडफड तुझी होते. मी गप्प बसलो तर ते ही असह्य उठलेलं वादळ तुझ्या वाटलंच्या तावडीत तू जखडते. विषयांतर करत मनातलं बरोबर काढून घेतेस आणि शेवटी परत मला नाही वाटत तस काही इथे तुझ्याच तुला वाटलंची गळचेपी करतेस. हे बोलून दाखवल तर परत 'मला त्रास होतोय, मला तसे नव्हते म्हणायचे' असे तुझे हळवे कापरे उत्तर तयार असते. मुळात तुला तुझे वाटलं बरोबर करुन पाट्यावर आपलं नातं ठेवून वरवंट्याने सगळ्या स्वप्नांना एकजीव करुन घेऊन आयुष्य खुळखुळ बनवून टाकायचे असते. इथेही तू कमी पडायला चुकत नाही. कसं होणार आहे तुझं? हे बोलून तुझ्या वाटलंचा संपूर्ण मिश्रणाच्या परिणामांना जबाबदार देखील मलाच ठरवून तू बिचारी होऊन बसते. पुढे वाढणाऱ्या वादांना संवाद मी म्हणतो! ऍटलीस्ट ते तुझ्या वाटलंच्या चौकटीत अजून तरी सापडत नाही म्हणून.
अजून नाही पण कधी कुठेतरी तुझ्या वाटलं मध्ये मला काय वाटतं आलंच तर आपण म्हणजे मी काही बोलायचे नाही तुझा हुकुम मान्य करायचा आणि होऊ द्यायचे तुला हवे तसे कारण तुझं फक्त मला वाटलं असतं त्याच्या पुढे तुला जे करायचे ते कर असतं. कुठेही तुला काय वाटतेय? असं चुकुनही नसतं. कदाचित हे सगळे वाचून तरी तुझं मला वाटलं आपल्याला वाटलं होईल याची परिणाम शून्यता ओळखून निष्फळ आशेवर लिहून टाकावे असे "मला वाटलं..!"
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

No comments:

Post a Comment