Powered By Blogger

Monday, August 10, 2015

संभाषण..! ;-)


♥ क्षण..! ♥

(बॅक विथ ओल्ड फॉर्म)

संभाषण..!

सुरुवातीच्या औपचारिक हाय-हॅलोनंतर आणि एकमेकांना दररोजची सवय लागल्यावर, कसायेस-कशीयेस यांच्या पुढच्या प्रश्नावर म्हणजे काय करतोयेस आणि करतेयेस यावर थेट अनौपचारिक अतिक्रमण होऊन सराइतपणे प्रश्नांची गळती होते. उत्तरांची वेळ वाचवली जाते. आपल्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीची पुढची ओळ अचूक हरेली जाते. सुरुवात आणि औपचारिकतेचे जाळे तोडून नात्यांचे केशरी नाजुक बंध बांधले जाऊ लागतात.
तुला मी आणि मला तू या थराचे नाते छान जुळते. तळमेळ उत्तम जमतो सवयी आठवणीने लक्षात राहतात. लटक्या रागाचा नखरेल नाकावर असलेले स्थान स्वतःच्या लेखीसुद्धा नसतांना इगो-अहंकार म्हणत आरोपांची सर बेधुंद बरसवली जाते. एखादा तीसरा मध्यस्ती करुन तेढा सोडवण्यापेक्षा त्याचा मनमुराद आनंद घेतो. तू अशीच आहे, तो असाच आहे! वाद नुसता वाद मग उरतो. बोलायच्या आधीच सरळ बोलायचे तिरकस बोलायचे असेल तर बोलू नकोस हुकूम मिळतात.
कुठलीही कारणमीमांसा न करता आलेला दुरावा दीर्घकाळ टिकतो. चांगलं-वाईट प्रसंगांत तो विषयच टाळलेला बरा वाटतो. काळ जातो वेळ जाते. तू बदललास तू बदललीस म्हणत जो तो जैसे थे उरतो आणि दरम्यान होत असलेले संभाषण अबोल्यात-एकांतात थैमान घालते. तेव्हा जावू दे तो नाही सुधारणार आणि ती नाही बदलणार म्हणत दोघेही बदलून जातात. शेवटी एक दिवस पुन्हा नवी ओळख, नवा परिचय, जूना संवाद आणि ते तसलेच वाद त्याच संभाषणाच्या माध्यमातून होत असणार-राहणार आणि तेवढाच वेळ जाणार..! दे टाळी..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

No comments:

Post a Comment