Powered By Blogger

Sunday, August 23, 2015

आपलंही-परकंही..! :-)


♥ क्षण..! ♥

आपलंही-परकंही..!

दररोज स्वतःच्या अस्तित्वाची लढाई होते. पुरुन उरता-उरता दिवसासारखंच सगळ संपल्यात जमा होते. जाणारी वेळ कळत नाही, येणारा काळ दिसत नाही. रोज सजणं होतं, शृंगाराचे विस्कटणं होतं. हसण्यामागच्या कुजकट यातनेला साराईतांसारखं मुखावट्यात लपवलं जातं. 'तुला कळत नाही, मला समजत नाही.' रोज दिवस उगवतांना दिसतो पण दिवस मावळाला-संपला हे बघायला वेळ नसतो. पायरी सोडून चाकरी निभावली गेली असते. स्वतःची चौकट-ऐपत कवडी मोलाची जगाच्या लेखी होते. स्वतःचेच स्वतःला काही कळत नाही. जगाच्या दूतोंडी व्यवहाराची पर्वा करायला वेळ कुणाकडे आहे? कसे चाललेय तुझे? "मस्त-मजेत" स्वतःच्याच कानफट्यात स्वतःने चपराख बसवल्यासारखी अवस्था उत्तर देतांना होते. त्यात रोज भेटणं, भेटून भांडणं. वैताग येतो! असलेलं सगळच ओवाळून टाकावसं वाटतं. कधी-कधी तर 'हे एक फार वाईट स्वप्न पाहात आहोत या स्वप्नातून खूप गोड जाग येणार आहे.' या विश्वासावर कित्येक आयुष्य मातीत गेले. आपण काहीच नाही!
होईल! बरं होईल, तेवढच खरं होईल. दिलासे मिळतात आणि उसासे सुटतात. रोजच्या आखून ठेवलेल्या वर्तुळात बदल होत नाही. स्वप्न आहे तर त्यातून जाग येत नाही. वास्तव म्हणून स्वीकारायचे तर धाडस काय मनसुद्धा तयार असत नाही. ठरलेली वेळ, नेमून दिलेलं काम, सरलेला-गेलेला दिवस आणि तेच वर्तुळ तोच कोरडेपणा अन् हेच उसणे अवसान! मोकळा श्वास घ्यायचाय तर प्रत्येकाने वाळी/त टाकल्यासारखंच!
स्वार्थ्यांसोबत जगतांना स्वतःचा स्वार्थ एकदा पाहिला तर गुन्हा म्हणून नजरांचे स्वागत करावे लागते. त्याच नजरांना न जुमानता श्वास घेतला तर घमंडी-हेकेखोर-अहंकारी दागिने दिमाखात नजर केली जातात. दैनंदिन अशी घालमेल असतांना नात्यांच्या बाजारात कर्जबाजारी होऊन बरबाद होणं निश्चित असतं. पाण्यात पडल्यावर पोहायला शिकता येतं. एकट्याने पडलेलं ठीक! स्वतःच बरं-वाईट झाल्याची पर्वा नाही. एकासोबत दुसऱ्यालाही पाण्यात ढकलले की, पोहायच कुणी आणि बुडायच कुणी? वाचवणारे किणाऱ्यावर दात काढतात त्यांच्याकडून यापेक्षा अजून अपेक्षा कसली करावी? स्वतःची शास्वत बुद्धी जागृत असते शरीराला प्रवाहावर सैल सोडून दिले की किनारा गाठता येईल. मनाची किनारे मैलो दूर असलेल्या टोकावर सहप्रवास करतांना नेवून सोडतात. त्यात जवळ येणं-असणं-आणि आपलं होणं कसे शक्य आहे? कुणाचे होता येतं पण कुणाला आपलं करता येत नाही.
प्रत्येक गोष्टीची वेळ ही वेळ गेल्यावरच का होते आजवर कुणालाच कळालेल नाही. तरी रोज आवडीने 'माझीसुद्धा वेळ येईल' याची वाट बघणाऱ्यांची अपेक्षा एक थट्टाच असते. हे टोक नाही तर ते टोक मधल्या मध्ये तारेवरची कसरत करणाऱ्यांची 'एक ना धड ढगभर चिंध्या' होणे नक्की असते.
अशावेळी करायचे काय? निर्णय घ्यायचे काय? स्वतःला उभे करायचे कसे काय? प्रश्नांचे भरलेलं पान असते पण उत्तर देणारं कुणीच असत नाही आपलंही-परकंही..!
------------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

No comments:

Post a Comment