♥
♥ क्षण..! ♥
नजर..!
काळोख असला तरी कुठेतरी एका बिंदूवर नजर खिळली असते. कधी मनात झाल्या-गेल्याचा हिशेब लागत असतो तर कधी काळोखाला नजरेने क्षणभराचा उजेड मागत असतो. मिळत काहीच नसत,गमवायला अजून काय उरलेले आहे याचाच ताळमेळ साधला जातो. कधी अधीर होतं मन अन् कधी हळवही होतं. एखादा विषय काढून थोडंस हसणंही उगाच होतं. काळोखाला स्वीकारलं जातं, प्रकाशाला नाकारलं जातं. भूतकाळासह स्वतःला दोषी ठरवलं जातं.
काळोख असतो तसाच! तरी डोळ्यात धुकं दाटत जातं. कधी ओढ लागते, कधी जीवावर येत राहतं. आयुष्याच राहाट गाडं पुढे ढकलत नेतं. नजरेसमोर अंधारातले खेळ चालतात. सोबत असलेले सवंगडी फक्त मज्जा पाहतात. कधी काजळ पसरतं अन् नात्यांची वीण विस्कटते. नजरेसमोर असलेलं अस्तित्व काळकुट्ट बिंदू होऊन नजरेतच रुतत जातं. कारण नजरवेध घेण्यासाठी असलेली सगळी लुभावणारी सोहळे फक्त नजरकैद होत असतात. नजर कुठे पोहोचत नाही. अंतरंग उलगडत नाही. म्हणून प्रश्न असतात नजरेत पण उत्तरं मुक्या नजरेतून कळत नाही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment