♥
♥ क्षण..! ♥
तिसरी ओळ..!
एका माणसाने नाव विचारल्यावर
दुसऱ्या माणसाने नाव सांगितल्यानंतर
तिसरी ओळ ही जातीची असते. कुठल्या जातीचा याची गृहीतके बुद्धी तर्क लाऊन अंदाजे ठरवते आणि कृती ही जातीचाच मागोवा घेते. कारण एकत्र राहण्यापेक्षा स्वतंत्र बेट तयार करुन राहण्याची मराठी अस्मिततेची वृत्ती आणि प्रवृत्ती आहे. तिचे प्रदर्शन घोष आणि स्फुरण देणाऱ्या वाक्यांत करण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानात कर्तृत्वाची मराठी रुजवली की रक्त थंड पडत नाही, ते उसळत राहतं. त्या उसळणाऱ्या रक्तातून मराठी अस्मिततेचा सन्मानाने व ताठ मानेने ओसंडून वाहणारा प्रवाह पहिला की, प्रत्येक नजरेला मुजरा करावाच लागतो! तेव्हा मराठी बाणा वक्तव्यात ठेवावा की, वृत्तीत हे मराठी मातीचे वक्तव्यात तीर्थ पिणारे भक्तच ठरवतील..!
---------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment