Powered By Blogger

Friday, February 12, 2016

लाईट्स, कॅमेरा,sssऍक्शन..! :-)


♥ क्षण..! ♥

लाईट्स, कॅमेरा,sssऍक्शन..!

मोजून १२ शब्द अर्थात एक ते दीड ओळ कागदावरची.. काही मिनिटात कागदावर लिहिली गेलेली.. काही सेकंदात ज्याच्यासाठी लिहिली होती त्याने वाचली काय.. व्हिडिओ शूटसाठी सेटअप उभारला.. तो ही स्पेशल.. का..? तर हेच पाहिजे.. असच पाहिजे.. घे.. जेवढं घेता येत तेवढं.. तसच्या तसं उमटवायला सगळं बळ एकवटावं लागतं.. दमलास की कळेल तुला.. थोडंस जगायला किती मरावं लागतं.. एकेका शब्दाला कॅमेरात कैद करुन कधी-कधी फक्त हसावं लागतं.. लाईट्स, कॅमेरा आणि ऍक्शन म्हणून संवाद सुरु करण्या आधी असलेलं मौन हाही एक अभिनय, डायलॉग आणि लिहिला गेलेला एक क्षण आहे..!✍🏻
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment