♥
♥ क्षण..! ♥
मला वेळ नाही..!
वेळ कधीच नसतो...वेळ काढावा लागतो... हे आपल्यावर असतं... आपण वेळ काढावा की, न काढावा... कारण वेळ द्यायची आहे म्हटल्यावर... ती वेळ निभवावी लागते... त्यावेळेला सांभाळून घ्यावं लागतं आणि ती वेळ आठवण म्हणून लक्षात ठेवावी लागते... उत्तरार्धात नजरेसमोर खोडकरतेने बागडणारा क्षण येऊन जातो... तेव्हा... ती वेळ खूप सुखात गेली याची जाणीव होते... वेळ नाही हे कारण झालं... वेळ द्यायची नाही हे टाळणं झालं... वेळ देणं हे आश्वासन झालं आणि वेळ काढणं हे वास्तवाचं सुंदर चित्र स्वतः रेखाटणे झालं... वेळेचं महत्त्व अवश्य जोपासावे पण महत्त्व जोपासतांना काही निसटतं आहे का? एकदा बघून घ्यावं... त्यानंतर केलेलं वेळेचं नियोजन कुणाच्या सवडीने आपलं वेळापत्रक बिघडत नाही आणि आपल्या ठरलेल्या शेड्युलवर परिणाम होत नाही... थोडा वेळ देण्या-घेण्यापेक्षा काढून बघायचा... जमतं! बराच वेळ मिळून पूर्ण वेळ दिल्याचं समाधानसुद्धा मिळतं....
ज्याच्यासोबत आपल्याला हसता येतं, त्याच्यासोबत पूर्ण दिवस काढता येतो, पण
ज्याच्या जवळ आपल्याला रडता येतं, त्याच्यासोबत मात्र पूर्ण आयुष्य जगता येतं..!
---------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment