♥
♥ क्षण..! ♥
तू..!
काजळ नयनी, लाली ओठांवर
नखशिखांत सजलेली नार तू...
शृंगार लेऊन, आली अलवार
हृदयी छेडलेली प्रेमळ तार तू...
सौंदर्य झरा, तरंग पाण्यावर
खोडकर उथळ लाट धार-धार तू...
कट्यार कामनीय देहाची देहावर
मिलनातूर केलेला पलटवार तू...
लाल-गुलाबी, आरक्त या गालांवर
बेधुंद रातीतला प्रणय प्रहार तू...
मुक्त हे केश, शेष रंग स्पर्शांवर
मखमली सुखाची उभी मदार तू...
तू.. आतुर, फितूर क्षणा-क्षणावर
क्षणभंगुर क्षणाची मोहिनी, अंगार तू...
आसमंत-धरणीच्या मध्य सागरावर
रुणझुणलेला नादमय झंकार तू...
..."नादमय झंकार तू..!"
................ तू..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment