Powered By Blogger

Thursday, March 3, 2016

लिहा-बोला= उधारीवर..! :-)


♥ क्षण..! ♥

लिहा-बोला= उधारीवर..!

तसं लिहायला म्हणा किंवा बोलायला बरंच काही आहे. कुठून सुरुवात करायची हे नक्की झालं की, कागदाला भरायला वेळ लागत नाही अन् बोलायला असलेल्या एका विषयातून सगळे विषय कसे व्यक्त झाले हे ओघवत्या प्रवाहात कळतही नाही. यांच्यात एक 'पण' मात्र निश्चित आहे. कागदावर लिहिलेलं स्वतःजवळ लपवून ठेवता येतं. बोलतांना मात्र कुणाशी? का? कशाबद्दल? कशासाठी? एवढंच काय ऐकणाराही निवडावा लागतो. त्यानंतर विषयाची बोलण्यात सुरुवात होते. त्यापेक्षा एक कोरा कागद जवळ असलेलं उत्तम! चार भिंतींशी किती आणि काय बोलायचं याचा दररोजचा प्रश्न उरणार नाही आणि आपलं बोलणं जरा जास्तच लांबले याची खंत उरणार नाही. तेव्हा कोरा असलेला एक कागद भरतांना जाणीव होईल आपण बोलणं सोडून दिलं हे फार बरं केलं. निदान कागदावर चुकलेला शब्द खोडता तरी आला. बोलून रंगलेली स्वप्ने आणि सजलेली क्षण आठवण म्हणून सतत रुतत तरी नाहीत अन् जगण्याचं शल्यही देत नाहीत. बसं हा अबोला असाच कायम ठेवायचा आणि आधीच वाढलेल्या अंतरात अजून मैलांची भर करुन बेरीज करत राहायची. हिशेब न करता रंगणारा एक डाव शेवटी एकदमच सोडून द्यायचा असतो. त्यात नुकसान झाले की नफा याची दखल घ्यायला एक लांब पल्ल्याचा श्वास कोण उधारीवर देणार असतो..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment