Powered By Blogger

Monday, March 7, 2016

काळोखाचं अस्तित्व..!


♥ क्षण..! ♥

काळोखाचं अस्तित्व..!

दुरुन बघण्यातही मज्जा येते...
जवळ जाऊन शोकांतिका होते..

दुरुन काय काय चांगलं दिसतं?
तर चंद्र.. चांदण्या.. चष्मा नसेल आणि डोळे शाबूत असतील तर काजवे.. काळोखाला नजर सरसावली तर वेंधळ्यासारखी इकडून तिकडे उडणारी वटवाघळे... याच्याही फार जवळ जाऊन अगदी समाधी लागली ना बघण्याची तर नक्षत्र दिसत तू समोर आणलेलं... काही क्षण लुब्ध होऊन पुन्हा स्वतःच अस्तित्व दाखवत... म्हणतं... ही लुभावणी कल्पना आहे.. जरा व्यवस्थित बघ काळाकुट्ट काळोख आहे... पण नजर तेच नक्षत्र शोधत काळोखात पुन्हा हरवून गेली असते...

शेतात...अंगणात किंवा टेरेसवर... रातकिड्यांची किरकिर ऐकत पापणी मिटण्यापूर्वी नजरेसमोर आणखी काय येतं..?

उपहास! काळोखाने चांदणीचा केलेला आणि त्यावर चांदणीने चंदेरी रंगाचा मिनमिनता उजेड पाडत काळोखाला दडपण्याचा केलेला दुबळा प्रयत्न... सगळं उपहासात्मकच आहे...

याचं कारण..?

काळोखाचं स्वीकारलेलं आणि तेवढाच शाश्वत असलेलं स्वतःच वेगळं अस्तित्व..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment