Powered By Blogger

Friday, March 4, 2016

अथांग..! :-)


♥ क्षण..! ♥

अथांग..!

काही नाही रोजचंच आपलं काहीतरी... चोथा झालेला एखादा विषय काढायचा आणि चघळत बसायचं.

"वास्तवात कुठल्यातरी एका विषयावर बोलणं होण्यासाठी एक मत कुणाचं झालेलं असतं..?"

"नाण्याच्या दोन्ही बाजू या एकमेकांबद्दल विरोधाभासच दर्शवतात.."

"काहीतरी काढायचं मात्र, बोलायला नाही सुचलं नाही सुचलं; सगळं अवसान एकवटून भांडायला सज्ज तरी राहायचं.."

"काय? मिळत काय एवढ्याने..? तुझा वेळ की माझा वेळ..?"

"मिळतं काय..? तर आपला वेळ.."

'प्रेमाचे गुलाबी दिवस हे, पंख लाऊन भर्रकन उडून जातात.. मागे ना छाटलेल्या पंखांची तडफड नाहीतर.. बळ निघून गेलेल्या पावलांची दुखणी उरलेली असतात..'

"म्हणून का असं आपणही जगायचं..?"

"छे! म्हणून तर सगळं बळ एकवटून पुन्हा उडण्याचा प्रयत्न तोही निकराचा.."

"अन्यथा, दार उघडं असूनही न उडणाऱ्या पाखरांची खंत पिंजऱ्यालाच कळते.."

"जरातरी स्वतःच्या मनाचा थांग लागू द्यायचा माणसाने..."

"तो लागला तर त्या माणसाला अथांग समुद्र कोण म्हणणार..?"

"खोलात जाऊ द्यायचेच नसते तर गाभा कशाला उघडायचा..?"

"उघडे असलेलं प्रत्येक दार आपल्यासाठीच उघडलेलं असतं असं नसतं ना..."

"मग दिसणाऱ्या आणि लुभावणाऱ्या गोष्टींचा देखावा कशाला मांडायचा..?"

"सहज, भुरळ पडली याचा अर्थ मोह आहे आणि मोह आहे म्हटल्यावर ओढ असणारच नस..!"

"कधीतरी सहज उलघड, फक्त एकदाच..."

"नको..!"

"का नको..?"

"तू पुन्हा प्रेमात पडशील..!"

"नाही पडणार प्रॉमिस..."

"म्हणजे तू आधीच पडलेली आहेस हे तू मान्य करतेस..?"

"शब्दात पकडू नकोस मला, बजावते आहे..."

"हो..? की मी स्वतःचा विचार न करता तुला सोडून देईल याची खात्री आहे..?"

"जा रे तू.. नाही बोलायचं मला तुझ्याशी..."

"मला जायला सांगून तुला स्वतःला निघून जायचं आहे..?"

"गप्प बसतो का आता..?"

"हो म्हटलं तर आणि नाही म्हटलं तर..?"

"गप्प ना रे, का सतवतोय..?"

"मी कुठं काय केलं..?"

"माझंच चुकलं, जाते मी..?"

"जातांना जाते नाही, येते म्हणावं संस्कृती आहे आपली ती! फार नाही पण थोडतरी जपावं..."

"बरं, येते..."

"कशाला येते? नको येऊ.. असं रात्री अपरात्री यायचं नाही...!"

"तुझ्या नानाची टांग..."

"का तुझ्या नानाला नाहीये का..?"

"ए! माझ्या नानावर जायचे नाही..."

"मला कुठंच जायचे नाही, तुम्हाला जायचे आहे..."

"मंद, बावळट..."

"तारीफ का शुक्रिया..!"

"तू ना... खरंच..."

"वाईट आहे फार, दूर हो..!"

"ए! माझं मी ठरवेल तू नको सांगू मला..."

"नेहमी प्रमाणे काही स्वतःहून विचारलेच नाही तर सांगायचं तरी काय..?"

"काय झालंय सांग..."

"नाही काही..!"

"काय झालंय सांग..."

"काही नाही..!"

"काय झालंय सांग..."

"जर लागला असता कुणाला काही थांग... तर समुद्राला उगाचच कोणी म्हटले असते का.. अथांग..?

"नाही सुधारणार..?"

"कधीच नाही, तू मात्र बदलणार... खूप बदलणार..."

"माझ्या बदलण्याचं कारण तूच असणार हे लक्षात ठेव..."

"माणूस आपल्या कर्माची फळ विसरत नाही, हा तर प्रेमाचा बगिचा आहे... ओवाळू कुणावर तरी जो आपलं बनवून ठेवेल..!"

"म्हणजे तुला खात्री आहे..?"

"हो! त्या बगिच्यात हिरवळ दिसेल पण फुल काही कुठल्याच झाडा-वेलीला येणार नाहीत..!"

"फजिलपणा करू नकोस..."

"अनुभवशील तेव्हा मला दोष देऊ नकोस, सांगितलं नाही म्हणून..?"

"फुलं येणार..."

"गंध आणि सौंदर्य नसलेली फुलं कुरवाळायला शिकून घे मग..!"

"दुष्ट..."

"आहेच, लहानपणापासून..!"

"सांगतोस की, नाही..?"

"नाही..!"

"शेवटचं विचारतेय सांगतोस की, नाही..."

"नाही..!"

"चालू लाग मग..."

"थांबणं प्रवाहाला माहीत नसतं, काही असतं तर थोडं थांब...काही दे... काही माग... काही सांग... आणि बाकी सगळंच अथांग..!"
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment