♥
♥ क्षण..! ♥
"काही.. बोलायाचे आहे..!"
बंद ओठातून.. मिटलेल्या पापणीशी..
गहिवरल्या कंठाने काही बोलायाचे आहे,
कोऱ्या कागदातून.. सपाट चेहऱ्यांशी..
मनातले बंद पेटारे काही खोलायाचे आहे,
देऊन सुख सारं.. घेऊन दुःख उराशी..
हिशेब ते पावसांचे काही लावायाचे आहे,
अबोल राहून सांगू.. की बोलते मौनाशी..
उघड गाव-चर्चेला काही चावायाचे आहे,
अंतरं मैलांची.. तरी सांगड पावलांशी..
वळणावळणावर काही थांबायाचे आहे,
म्होरं हे पदर पसरुन.. प्रेमाने उराशी..
मरणासमोर काही कवटाळायाचे आहे,
घोर जीवाला लाऊन.. नातं वौराग्याशी..
स्वतःचे स्वतःला काही टाळायाचे आहे,
मोह त्यागून.. लक्तरे घेऊन.. पायरीशी..
देहाशिवाय पूजाया काही जायाचे आहे,
ओंजळ करुन.. अमृतसम प्राक्तणाशी..
नीलकंठ, रुद्र असं काही बनायाचे आहे,
मागायाचे, द्यावयाचे, घ्यावयाचे..नशिबाशी
काय सरळ मोकळं काही विचारायाचे आहे,
मुक्या जाणिवांतून.. बोथट लेखणीशी..
तुला, मला, प्रत्येकाला काही बोलायाचे आहे,
.."काही.. बोलायाचे आहे..!"
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment