Powered By Blogger

Tuesday, April 29, 2014

बाजार..! :-)

क्षण..!

बाजार..!

कधी प्रेम विकत मिळत नाही. निराशेचे गाठोडे कुणी आणत नाही. टोपली घेवून जखमेची घासाघीस होत नाही. कधी वेदनेला मोल असत नाही. कधी अश्रूंचे लिलाव होत नाही. स्वप्नांचे बाजार पापण्यांवर रोज असतात. ओंजळीची थैली(पिशवी) घेवून कुणी येत नाही. निवडून आठवांच्या शेंगांना अळ्या पडत नाही. साठे साठवून ठेवले तरी बुरशी लागत नाही. मन कोवळेच राहाते अन् हृदय किडलेले म्हणून बाजुला ठेवले जाते. सौदर्य फोफसाळे असते तरी सजवले जाते. घ्या कि भाऊ / ताई रुपयावर शेर भर सुख आहे. दु:खाचा हंगाम आज तेजीत आहे. पोतडीभरुन बाजारात जरा आलोय. थैलीत काही मावले नाही, स्वस्त काही मिळाले नाही. खिसा भरला होता माझा. माझे पोट भरता आले नाही. बाजारातून रित्या हातानेच परतलो. श्वास माझे विकले गेलेच नाही..!
---------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment