Powered By Blogger

Friday, October 31, 2014

विसंबून..! :-)


♥ क्षण..! ♥

विसंबून..!

रिळातून नको असलेला धागा काढल्यावर...त्या धाग्याची गुंता होण्याची दाट शक्यता असते...पहिलं टोक कुठे राहिलं..? या शोधात एक गाठ पडते...टोक सापडत नाही...वैताग वाढतो...झालेला गुंता हैराण करतो...तोडावा धागा न करावी पुन्हा एक नवी सुरवात...रिळात मग फारसा धागाच नसतो...थोडा धागा निघून...एक टाकं पाडून...धागं कुजकंच वाटतं...गाठ टिकेल किंवा नाही या साशंकात विण विस्कटलेली होते...शेवटच्या टोकावर माझं मानू कि परकंच ठेवू...भ्रमात स्वत:लाच हसून अलिप्त व्हायचं...गाठींवर निश्फळतेने विसंबून..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

अतिप्रसंग..! :-)


♥ क्षण..! ♥

अतिप्रसंग..!

माहित नाही तिचं बिनसलं का होतं... रात्रीच्या अतिप्रसंगानंतर फारस काही नाविन्य उरलंही नव्हतं...शरिराचे व्यवहार चुकते करुन कर्तव्याचे प्रलोभने तेव्हढे उरलेले...एकट...एकाकी...सोबतीला पुन्हा तोच अंधार... आणि तोच निराधार आधार... का कशाला..?
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, October 21, 2014

जगणे झाले..! :-)


♥ क्षण..! ♥

जगणे झाले..!

काही कारण नसतांना ओठांचे हसणे झाले
दु:खात सोपे न सुखात अवघड जगणे झाले,

सतत ये-जा होत राहिली ना माझ्या घरात
का बंर उभ्या दारात चौकटीचे नसणे झाले,

तिष्टीत उभे राहून दुखली मरणाची पाऊले
उगा पायरीवर मरणाचे हतबल बसणे झाले,

जरासे खोडकर होते तेव्हाही माझे आयुष्य
माझे नजरांना चोरुन पाठमोरं बघणे झाले,

मागून मला उत्सवाची खोटी-खोटी पर्वणी
उधारीच्या श्वासांचे श्वासात सजणे झाले,

आठवणीत कोमेजलेल्या काही फुलांवर
गोंधळून अबोल क्षणांचे क्षणभर येणे झाले,

चुरगाळलेल्या कागदालाही गृहीत धरुन
चार खांद्यावर माझ्या आसवांना नेणे झाले..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, October 13, 2014

आयुष्य गुलजार आहे..!(3) :-)


♥ क्षण..! ♥

आयुष्य गुलजार आहे..!(3)

सैपाकाच्या खोलीत तिची तारेवरची कसरत सुरु होती. मुलांच दुध, त्याचा नाष्ता नंतर जेवणाची रोजचीच उठाठेव चालली होती. विना तक्रार अगदी आनंदाने कसलीच पोकळीक जाणवत नव्हती. संसारात काही कमी पडतंय तिच्या मनातही येत नव्हतं..!
दोन-तिन वर्षाच्या संसारात उत्कृष्ट बायको-सुन-गृहिणी नंतर आई या पदवीचा अभ्यासक्रम सुरळीत सुरु होता. भरल्या घरात सुखाचे दुध अगदी उतू जात होतं. घराला फक्त चार भिंती असतात पण त्या चार भिंतीना घर म्हणायला आणि बनवायला आपली माणसे लागतात..!
दैनंदिन प्रमाणे तिचे पाक गृहात हसत मुखाणे गुणगुणत राबणे सुरु असते. तो त्याचे नित्याक्रम आवरुन ऑफिससाठी तयार होवून डायनिंगवर विराजमान होतो. समोर तिनेच आणून ठेवलेला पेपर उचलत एक नजर तिला पाठमोरीच न्याहाळून घेतो. बातम्यांची हेडलाईन बघत असतो आणि तिचा स्वर उमटतो.
"जेवन तयार आहे वाढू गरम-गरम?" जरासा पेपर बाजुला करुन घड्याळात वेळ बघत हं! वाढ बोलुन त्याच-त्याच बातम्या म्हणून पेपर बाजुला ठेवून बडबडत बसतो. कधी सुधरणार लोकं काय माहिती. तो त्याच्या तालात असतो. ती तिच्या गुणगुणन्यात तव्यावरुन गरम पोळी ताटात ठेवून त्याचे ताट वाढून देते. ताट वाढून पुन्हा त्याची पोळी संपण्या आधी, दुसर्या पोळीला लाटायला घेण्याची तिची चुणचुणीत लगबग असते. अर्ध्या पोळीचा आस्वाद घेवून, 'भाजी छान झालीये' एव्हढी दाद त्याच्या कडून येई पर्यंत तिची दुसरी पोळी तव्यावर ठेवली जाते.
कधी नव्हे ते सहज जेवता-जेवता तिचे निरिक्षण सुरु होते. तापलेल्या तव्यावरची पोळी पलटवतांना, तव्याचे तिच्या बोटांना बसलेले चटके, तिच्या मुखाच्याच हलक्या फुंकरवर, स्वत:चा पराभव स्विकारतांना दिसतात. कधी जास्तच वाफ आली तर बोटांचे झटकणे न मुखातून स्स्स करत फुक मारुन क्षणभर थांबलेलं गुणगुणने पुन्हा सुरु होते.
तो तिला पाहातोय तिला माहित नसतं. तिची दुसरी पोळी त्याच्या ताटात वाढायची आहे. या आपल्याच तंद्रीत ती पोळी घेवून, त्याला हवं नको पाहात पोळी ताटात वाढून पुन्हा माघारी वळते. तिसर्या पोळीलाही स्स्स करत फुक मारुन पुन्हा गुणगुणने...चौथ्या पोळीलाही तसेच... त्याच्या विचारांच्या अंदाजानुसार, आजवर केलेल्या प्रत्येक पोळीसाठी एव्हढे चटके तिला तव्याने दिले असावे निष्कर्श त्याचा निघतो. आजवर साल! तिचा हात बघतांना मग बोटांवर व्रण-डाग किंवा हात भाजला कुरबुर करतांना दिसली कशी नाही..?
आताही भाजलं असेल पण मुखावर एक रेष नाही. तिच्या जवळ येण्याची संधी साधत तिच्या हाताची बोटेही दोन नाही चार वेळा निरखून बघतो. काहीच नाही तशीच मऊ मखमली असतात. ती संभ्रमात अचानक काय झाले? काय बघतोय हातावर? काही न कळून ती विचारतेच..!
तो जागेवरुन उठतो तव्यावरुन हात फिरवत त्याच्या तापमानाचा अंदाज घेतो. अनोळखी अतिक्रमण म्हणून तवाही त्याला इंगा दाखवतो न त्याचा हात भाजतो. आई-आऊच! ती लागलीच जवळ येते न थंड पाण्याखाली त्याचा हात धरते. काय चाललेय तुझे? मुर्ख-बावळट आहेस का? हसणार नाहीस ना तर सांगतो..!
हम्म! बघू सांगा आधी. झाला प्रकार तो तिला कसं न कुसं तोंड करत सांगतो. सरते शेवटी बघुया सहज हात फिरवून तव्यावर म्हणून फिरवला तर भाजला. रोज तुझा नाही भाजता आला तव्याला म्हणून, माझा हात भाजून तव्याने त्याचा गुणधर्म पाळत, थोडा काळपट रंगही चटक्या स्वरुपात मला दिला. हे बघ! हे बघ! हे बघ! अर्रर्रर्रर्रर्र, अवघड आहे तुला समजुन घेवून सांभाळणं. वेडी होवून त्याची ती हसत सुटते. हसू नकोस म्हणून तो खोटा रुसुन बसतो. त्याचे ते उतरलेलं तोंड पाहून तिचे हसणे अजुन खळखळून वाहात भिंतीत रुतत राहाते. जा आता काही सांगणार नाही म्हणत लेकरासारखा तो वागू लागतो. तिचे हसणे सुरुच असते न त्या दोघांची चिमुरडी धावत येते. चिमुरडीला अलवार उचलून तिला तो खोट-खोट दटावू लागतो. तिला तिचे हसणे थांबवणे शक्य नसते. मोकळे हास्य पसरुन ती दोघांच्या जवळ येते. लज्जा घेवून नजरेत पापण्यांचे झुकते माप होते. त्याला वाटणारी आणि असणारी तिची काळजी अशीच व्यक्त होते. क्षण-दोन क्षण ऐकमेकांच्या नजरेत हरवले असतांना चिमुरडीचे तोतळे बोल भिंतीत रुततात. "आयुछ्य गुलदार आहे" ही ही ही ही..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, October 8, 2014

कोजागिरी सरुन गेल्यावर..! :-)


♥ क्षण..! ♥

कोजागिरी सरुन गेल्यावर..!

चांदणी रात्र भरात आली
चंद्राची गाठ घरात पडली,
बोलले ना ते शब्द काही
भेट अबोल स्वरात घडली..!

मना मनाचे हाल झाली
सुखाची एक चाल झाली,
नको करुस त्रागा आज
वेडी ती रात्र काल झाली..!

जी अत्तरे शब्दात दडली
ती उत्तरे कागदात नडली,
गळत्या पाकळ्यांत फुला
कळ्यांची मोजदात रडली..!

ऋतु बदलास ठेवतांना
हिरवे शालू पिवळी झाली,
जेव्हा भाकरच करपली
माझे आभाळ निळी झाली..!

चंद्राची चांदणी उरली
आणि पुनवेची रात्र सरली,
पैज लावून काळोखाशी
माझी उजेडाची हौस हरली..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, October 6, 2014

निघुन जा..! :-)


♥ क्षण..! ♥

निघुन जा..!

रोजचाच अधुरा खेळ आज तू मांडून जा
कारण नसतांना माझ्याशी तू भांडून जा,

कण-कण करुन वेचला पाहाटे मी प्राजक्त
वेंधळ्या क्षणाला येवून सडा तू सांडून जा,

नियमात बसलो नाही मी कुणाच्या कधी
ही चौकट माझी एकदाच तू ओलांडून जा,

अबोल शब्द होते नुसतेच माझे कागदावर
प्रत्येक कागदाला उगाचंच तू फाडून जा,

भुस-भुशीत झाली या बगिच्यातली माती
पाऊले ठेवून तुझे माझे प्रेत तू गाडून जा,

दिसशील कधी माझ्या नजरेतून कुणाला
तू दुर मिटलेल्या माझ्या नजरे आडून जा..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, October 4, 2014

सांज किनारा..! :-)


♥ क्षण..! ♥

सांज किनारा..!

ती त्याची वाट बघत सारखी ये-जा करत होती. वेळ झाली होती त्याच्या येण्याची पण उगाच तिची नजर भिरभिरत होती. सांजेचा रवि पुन्हा तिच्या हातांवरच्या मेहंदीचा रंग नभावर उधळत होता. फिक्कट पुसट होत किनारा वारा दमट होत होता.
अजुन कसा आला नाही. कुठे राहिला हा! नेमकं वेळे आधी हजर असलेला एखाद वेळेस चुकला तर होता-होईल तितका त्रागा-शंका-कुशंका वरचे-वर मनात डोकावत राहातात. धावत येत असलेल्या लाटेसोबत सावकाश तो ही तिच्या मागे तिच्या नकळत येतो.
डोळ्यांवर हात ठेवून खर्जातला आवाज अजुन खर्जात नेवून बोलतो "ओळख पाहू". तिची वैतागलेली पाकळी त्याच्या स्पर्शाने मोहरुन खुलून येते. एका हातात त्याने लपवलेली गुलाबाची फुले 'तुला हवा तोच आहे' गंधातून चुगली लावून देतो. ती ओळखते आणि तो विस्मयीत होतो.
कसं ओळखलंस-कसं ओळखलंस सांग-सांग हैरान करु लागतो. ती फक्त हसते! त्याच्या हातातली फुले घेवून लाटांजवळ धावत जाते. तिच्या मागे तो पळतो आणि अस्ताला जाणारा सुर्य गुलाबी रंगाची बरसात करतो. लाटांशी खेळ करत, वाळूवर पाऊले रुतवत त्या  दोघांची  क्षितिजावर एक शत-पावली सुरु होते.
हातात हात गुंफले जातात. पावलांशी पाऊले मिळवले जातात. सहवास स्पर्शाचा अबोल एका क्षितिजाचा नजरेतून नजरेत संवाद पेरतो. उधळलेला प्रत्येक रंग त्यांच एकमेकांवरच प्रेम व्यक्त करतो. ते दोघं मात्र त्याच रंगांवर नजर खिळवून एकमेकांच्या शेजारी उभे असतात. नि:शब्द-स्तब्ध-हतबद्ध स्वत:च्या प्रेमाच्या उधळणीला दृष्ट लावत, हातांची गुंफण घट्ट करत अनवाणीच...रात्रीच गडद सावट उमटे पर्यंत..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, October 3, 2014

तुझी लेखणी तळपू दे..! :-)


♥ क्षण..! ♥

तुझी लेखणी तळपू दे..!

दरवेळी प्रमाणे यंदा आई-बाबांना सोनं देवून पाया पडल्यावर...दोघांनीही आलटून पालटून माझ्या पाठीवर हात फिरवत, डोक्यावर हात ठेवून एकच आशिर्वाद दिला... तुझी लेखणी तळपू दे... थोड भरुनही आलं आभाळ न मनही शांत झालं...कदाचित, मला हवं असलेलं मिळालं...ज्या प्रतिक्षेत होतो तिचं संपणं जाणवलं...प्रेम आहेच ते नकळत व्यक्त झाल्यावर हलकं वाटतंच... ओझं मग कितीही लादो... पर्वा नाही..!

आई-बाबांच्या ऋणात असणं व्यक्त करणं  अवघडच जातं...तिथे फक्त नतमस्तक होण्यातच सर्व येतं..! _____/|\____

शुभ दसरा..!

------- पियुष / क्षण / मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, October 1, 2014

होती ती एक..! :-)


♥ क्षण..! ♥

होती ती एक..!

तिला सोडून बोललो कुणाशी किंवा फ्लर्ट केले कुणाशी तर रागाने लालेलाल होणारी. जाणून-बुजून दुर्लक्ष केल्यावर लक्ष दे म्हणनारी. सुधर माझ्यासारखी दुसरी नाही मिळणार म्हणत भाव खाणारी. गुलाबाच्या पाकळी सारखे यौवन होते तिचे. दाट काळे नसले तरी सोनेरी केश होते तिचे. काजळ नयनांचे दररोज असंख्य वार व्हायचे. लहरी गुन्हेगार हा तरीही तिच्या तावडीतून पसार व्हायचा. मागे-मागे यायची सावलीसारखी. पुढे-पुढे जायची वाटेसारखी. थांबलो न गुंतलो कुणात तर चरफडत बसायची. समोर असुनही तिचा मी नसायचो. 'जल बिन मछली' अवस्था तिची असायची. फुलपाखरासारख बागडत झगडत राहायचो एकमेकांशी. सात जन्माचे वैरी भेटले कि काय असे रान पेटवून द्यायचो. अध्ये-मध्ये लुडबूड करणारे मग तिची बाजू घ्यायचे. जुमाणलंय कुठे कुणाला अफाट सैन्य असले तिच्यासोबत तरी तह करण्याची एकट्यात ताकद असायची. हा देव तो देव धरुन बसल्यावर मग या देवाची बारी यायची. जा दगडाजवळच झिडकारले जायचे. वाईट आहेस तू खुप! ओघळलेले दोन थेंब चुगली लावून मन विरघळून द्यायचे. खाली-पिली मिठीत मग कशाला जखमांना चिघळून द्यायचे. चुकलं- सॉरीची पंगत मध्यरात्री रांगेत बसायची. पाहाटे पर्यंत छळून झाल्यावर दिवसभर डोक दुखवायची. काही म्हणा होती ती एक वेळ जी खुप छान जायची..!
----------------- मृदुंग
kshanatch@gmail.com