♥
♥ क्षण..! ♥
तुझी लेखणी तळपू दे..!
दरवेळी प्रमाणे यंदा आई-बाबांना सोनं देवून पाया पडल्यावर...दोघांनीही आलटून पालटून माझ्या पाठीवर हात फिरवत, डोक्यावर हात ठेवून एकच आशिर्वाद दिला... तुझी लेखणी तळपू दे... थोड भरुनही आलं आभाळ न मनही शांत झालं...कदाचित, मला हवं असलेलं मिळालं...ज्या प्रतिक्षेत होतो तिचं संपणं जाणवलं...प्रेम आहेच ते नकळत व्यक्त झाल्यावर हलकं वाटतंच... ओझं मग कितीही लादो... पर्वा नाही..!
आई-बाबांच्या ऋणात असणं व्यक्त करणं अवघडच जातं...तिथे फक्त नतमस्तक होण्यातच सर्व येतं..! _____/|\____
शुभ दसरा..!
------- पियुष / क्षण / मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment