Powered By Blogger

Tuesday, October 21, 2014

जगणे झाले..! :-)


♥ क्षण..! ♥

जगणे झाले..!

काही कारण नसतांना ओठांचे हसणे झाले
दु:खात सोपे न सुखात अवघड जगणे झाले,

सतत ये-जा होत राहिली ना माझ्या घरात
का बंर उभ्या दारात चौकटीचे नसणे झाले,

तिष्टीत उभे राहून दुखली मरणाची पाऊले
उगा पायरीवर मरणाचे हतबल बसणे झाले,

जरासे खोडकर होते तेव्हाही माझे आयुष्य
माझे नजरांना चोरुन पाठमोरं बघणे झाले,

मागून मला उत्सवाची खोटी-खोटी पर्वणी
उधारीच्या श्वासांचे श्वासात सजणे झाले,

आठवणीत कोमेजलेल्या काही फुलांवर
गोंधळून अबोल क्षणांचे क्षणभर येणे झाले,

चुरगाळलेल्या कागदालाही गृहीत धरुन
चार खांद्यावर माझ्या आसवांना नेणे झाले..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment