♥
♥ क्षण..! ♥
निघुन जा..!
रोजचाच अधुरा खेळ आज तू मांडून जा
कारण नसतांना माझ्याशी तू भांडून जा,
कण-कण करुन वेचला पाहाटे मी प्राजक्त
वेंधळ्या क्षणाला येवून सडा तू सांडून जा,
नियमात बसलो नाही मी कुणाच्या कधी
ही चौकट माझी एकदाच तू ओलांडून जा,
अबोल शब्द होते नुसतेच माझे कागदावर
प्रत्येक कागदाला उगाचंच तू फाडून जा,
भुस-भुशीत झाली या बगिच्यातली माती
पाऊले ठेवून तुझे माझे प्रेत तू गाडून जा,
दिसशील कधी माझ्या नजरेतून कुणाला
तू दुर मिटलेल्या माझ्या नजरे आडून जा..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment