Powered By Blogger

Tuesday, April 29, 2014

बाजार..! :-)

क्षण..!

बाजार..!

कधी प्रेम विकत मिळत नाही. निराशेचे गाठोडे कुणी आणत नाही. टोपली घेवून जखमेची घासाघीस होत नाही. कधी वेदनेला मोल असत नाही. कधी अश्रूंचे लिलाव होत नाही. स्वप्नांचे बाजार पापण्यांवर रोज असतात. ओंजळीची थैली(पिशवी) घेवून कुणी येत नाही. निवडून आठवांच्या शेंगांना अळ्या पडत नाही. साठे साठवून ठेवले तरी बुरशी लागत नाही. मन कोवळेच राहाते अन् हृदय किडलेले म्हणून बाजुला ठेवले जाते. सौदर्य फोफसाळे असते तरी सजवले जाते. घ्या कि भाऊ / ताई रुपयावर शेर भर सुख आहे. दु:खाचा हंगाम आज तेजीत आहे. पोतडीभरुन बाजारात जरा आलोय. थैलीत काही मावले नाही, स्वस्त काही मिळाले नाही. खिसा भरला होता माझा. माझे पोट भरता आले नाही. बाजारातून रित्या हातानेच परतलो. श्वास माझे विकले गेलेच नाही..!
---------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, April 26, 2014

लांब राहा..! :-)

क्षण..!

लांब राहा..!

शरीराच्या लांब असण्यात मनाची जवळीकता कुठे लांब करता येते? सहज लांब राहा म्हणने म्हणजे शरीराने लांब राहाणे अन् मनाने इतक्या जवळ असणे कि त्यात वारा, पाण्याची थेंबही स्वत:साठी जागा शोधू लागावीत..!
अंतर ठेवणे अन् अंतर करणे येव्हढाच काय फरक असेल लांब राहा म्हणण्यात. हे लांब राहाणे क्षणभरचेच असते. या लांब राहा म्हणण्याचा सहसा आपण त्रास करुन घेतो. वास्तविक अहंकार दुखवला गेलाय असा पोकळ पुरुषार्थ समजही करुन घेतो..!
भावनेच्याभरात लांब असण्याची पडलेली दरी सहसा अजुन वाढवण्याचा प्रयत्न आपण करतो. जमेल तसे स्वत:वर नियंत्रण ठेवून होता होईल तितके आपण आपल्याच व्यक्ती पासून लांब राहातो. खरं तर एकाच छताखाली नात्याची फाळणी होवून जात असते..!
तसे अनुभवावरुन पाहिले तर ही इच्छा गरजही असू शकते. स्पर्श करुन सहवास उपभोगण्या व्यतिरिक्त नजरे समोर असणं कधी कधी मनाला पुरेसे असते. तरी पुन्हा जवळ घेतल्यावर प्रश्न पडतातच. लांब राहा बोलून गेल्यावर काही वेळाने सहज जवळ घेतल्यावर होणारा स्पर्श थेट स्पंदनात उतरत का नाही? सगळे ठीकच तर आहे, मग ओलावा जाणवत का नाही? आवेग उफाळून बाहेर येवून व्यक्त का होत नाही? 'चुकलं' कि काय आपलं? उगाच असे बोलायला अन् वागायला नकोच का होते? कि आपल्या जोडीदाराकडून बंडखोरीची अन् दिडमुढ स्वभावाची आपण अति अपेक्षा केलेली असते..?
उत्तर सोपेच असते मग अजुन ताणून किचकट का करतो आपण हे आयुष्य? गोडवा कटूता घेवून मिळवण्यासाठी कि, आपले वर्चस्व नात्यात ठासून सांगण्यासाठी? असेही अन् तसेही मनात काही वेगळे नसते. बस्स! थोड दुर लोटून पाहावे लागते, अस्वस्थ होवून नेमकं स्वत:ला तरी काय हवे होते? पडलेली गाठ सहजा-सहजी सुटत नाही. दोन्हीकडून धागा ओढून ती गाठ अजुन घट्ट बसते अन् चिवट होते..!
शेवटी मन हे लहान लेकरासारखे वागत हिरमुसून त्वेशात एकमेकांना एकमेकांच्या जवळ ओढते. सगळे हट्ट एकदम पुरवून घेवून शांत होते. सरितेचा सागराशी संगम व्हावा तशी वेळ विरघळून जाते. आठवणींच्या क्षणात मग हे क्षण मंद गंध उधळत राहातात. बेधुंदीत दरवळत राहातात अन् नाजूक धाग्याची विण आयुष्याचा सदरा देखणा करतात..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, April 25, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-6)

क्षण..!

अ फेसबूक लव्हस्टोरी..! (कथा) (भाग-6)

'Sorry..!' बोलून गेलेल्या अंबरला गायब होवून आता आठ दिवस झाले होते. या आठ दिवसात आवरलेलं असलेलं धाराच घर पुरते विस्कळीत झाले होते. एव्हढेच काय जागेवर सहज मिळणारी वस्तू तास भर शोधा-शोध केल्यावर मिळू लागल्या. प्रॅक्टीकल अन् सोफेस्टीकेटेड आयुष्याचे ध्येय उराशी बाळगणारे मनापुढे हारुन बरेच इमोशनल अन् पझेसीव्ह झाले होते.
अटॅचमेन्ट काय साधी ॲजस्टमेन्टही तिथे काहीच नव्हती. मग जी उलथा-पालथ होत होती तिचे तरी काय समिकरण असेल? नियतीच्या मनातलं कुठे कोण काही जाणू शकतो का? ज्या वळणावर नियती नेईल त्या वळणावरुन दिसेनासे व्हावेच लागते.
बराच वेळ धाराचा फोन खणखणत शांत होत असतो. जागेवर मिळेल तर काही खरे ना! मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत घराची पसारा होवून जी अवस्था होते त्यात रोज वापरात येणारी वस्तूच गहाळ झालेली असते. जिद्द न सोडता शोधा-शोध सुरुच राहाते अन् शेवटी रायटींग टेबलवरच्या पुस्तकांच्या गर्दीत फोन सापडतो अगदी शांत अवस्थेत.
मिस्ड called लिस्ट चाळत, आईचे फोन?...करु कि नको फोन या दोलायमान विचारात असतांनाच पुन्हा फोन खणखणतो.
धारा : हॅल्लो!... अगं, फोन सापडत नव्हता म्हणून... तू बोल कशी आहेस?... हो मी मजेत आहे... अगं, रेंज नाहीये म्हणून आवाज निट ऐकू येत नसेल... मी ठीक आहे... बाबा कसेत?... (जरासा आवाज वाढतो) आई, मी तुला किती वेळा सांगीतले माझे मत तू त्यांना का नाही समजवत? तुला जमत नसेल तर मला सांग मी बोलते त्यांना...आई! मला आता वेळ नाही बाय.. फोन बंद करुन पुन्हा त्या पुस्तकांच्या गर्दीत झोकवून देते...स्वत:शीच बडबडत राहाते...जो तो मला स्वत:च्या तालावर नाचवू का पाहातोय?... लॅप्पीकडे नजर जाते...आणि एक हा अंबर... 'Sorry' म्हणाला तेव्हा वाटले कि हा तरी... पण हा तर 'Sorry' बोलून असा निघून गेला जसे माझ्यावर उपकारच केलं आहे... फेसबूक पेज साईन इन करते अन् उघडताच पहिली धाव अंबरच्या प्रोफाईलवर घेते... गेल्या आठ दिवसात आठशे वेळा मी याची प्रोफाईल चाळली असेल... जरासा विचार करुन बोलते... आता बस्स! अजुन नाही...एक मॅसेज करते 'कहा हो?'... आज रात्री पर्यंत रिप्लाय आला तर ठीक नाही तर... पाच मिनिटे वाट बघून ऑफलाईन होवून ऑफिसची तयारी करायला निघून जाते..!

परतीचे टिकीट बुक करायला म्हणून अंबर कॅफे गाठतो. सहज एक नजर फेसबूक बघून घ्यावे म्हणत अंबर साईन इन करतो. आठ दिवसाचे नोटिस्फीकेशन क्लिअर करुन अंबर फ्रेंड रिक्वेस्ट चाळतो. धाराची रिक्वेस्ट पाहून जरा संभ्रमात पडतो. प्रस्ताव स्विकारत मग मॅसेजेसकडे त्याचा मोर्चा वळवतो. दहा पंधरा जनांचे मॅसेजेस वाचून उत्तर कुणाला न देता सरळ धाराची प्रोफाईल चाळत बसतो. तिचे आलेले मॅसेजेस पुन्हा पुन्हा वाचून काढतो. उत्तर तर द्यायचेय पण हे आयुष्याच्या दु:खाचे वादळ आपलं छे! माझं असतांना वाटेकरी का म्हणून हवे असावे? तरी काही बोलावेच लागेल. काही न बोलता होणारे समज-गैरसमज असण्यापेक्षा काही तरी बोलून वाढणारे गैरसमज अन् संभ्रम तसेच ठेवावे लागतात.

h! मिस ऑक्सफर्ड, आय एम ग्रेट इन इंडीया. कधी कधी परिस्थिती अशी बिकट होते कि त्या परिस्थित साधे कळवताही येत नसते. आताही घाईतच आहे, चार-पाच दिवसांनी पुन्हा इटली गाठायची आहे. त्यामुळे निवांत अन् मोकळे आता मला बोलता येणार नाही. अर्थात याचे वाईट तुम्हाला वाटणार नाही अशी अपेक्षा करतो. सरळ स्पष्ट बोलावे हे कळतेय मला पण...

आज पाऊले जरा
डगमगलेली आहेत,
कोसळून पुन्हा ती
उभी राहिली आहेत..!

थोडा वेळ हवाय अजुन एकांतात. कदाचित त्याची गरजही असते म्हणतात. परत आल्यावर कळवतो. Thank you for your masseges & care. पुन्हा एकदा "Sorry..!" स्वत:ची काळजी घ्या. मी जातो, जावेच लागेल. "उत्तरक्रिया अन् कर्तव्ये पार पाडायची आहेत". बाय..! इतर कुणाला मॅसेज न करता तुम्हाला तरी मी का मॅसेज करतोय माझे मला कळत नाहीये. काही चुकले असेल माझे तर मनावर घेवू नका. एंटर करुन ऑफलाईन होतो..!
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)

Thursday, April 24, 2014

सोपस्कार..! :-)

क्षण..!

सोपस्कार..!

वाटेतल्या दगडात अन् मंदीरातल्या दगडात, माती अन् शेंदुर एव्हढाच फरक असतो. जागेचेच काय ते महत्व. कुठे हात जोडून उभे राहावे लागते, तर कुठे पायांनी लाथाडावे लागते..!
---------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, April 22, 2014

अभाग्य..! :-)

कुणाला परिपक्व होवून समजदारीचे चार शब्द सांगू शकतो, पण कोवळ्या वयात स्वत:लाच दोन गोष्टी निश्चयाने सांगणे अन् तसेच वागण्याचा आटोकाट प्रयत्न करणे याहून वेगळे अभाग्य आणि दुर्भाग्य असू शकत नाही..!------------------- © मृदुंग

Saturday, April 19, 2014

माहित आहे..! / वाटलेच होते..! :-)

क्षण..!

माहित आहे..! / वाटलेच होते..!

काही प्रश्न कुणाला विचारण्या आधी, त्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडून अपेक्षीत असते तेच मिळते. तेव्हा 'माहित आहे / वाटलेच होते' म्हणाल्यावर एकमेकांत गुंतल्याची जाणीव होणे आणि काळजीचे स्वरुप शब्दात हुबेहूब व्यक्त होणे, यांची पराकाष्ठा एकत्र करुन काही असते तर ते एक 'नातं' असते.
नात्यांची रित, पत वेग-वेगळी का असे ना. मनात त्या नात्याचे पवित्र अस्तित्व एक सारखेच असते. तिथे सिमा नसतात, बंधणे नसतात अन् गाठी ही नसतात. धाग्यांच टोक सोडून धाग्याचा एक मोठा पल्ला अथवा पदर पापण्यात पकडून ओलावा असलेला काठ किंवा किनारा येव्हढाच नात्यांचा पसारा असतो..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, April 17, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-5)

क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-5)

स्वत:शीच नैराश्यात नकारार्थी मान हलवत अंबर त्या चॅट विन्डोकडे शुन्यात बघत राहातो. शरीर असत जागेवर पण मन..? मनाला कुठे आणि कसली बंधणे ते तर लगेच सात समुद्र पार करुन धारा जवळ धावत गेलं. लहान लेकराच्या हट्टांना-नखर्याला वैतागून आईची जशी अवस्था होते, तशीच अवस्था धाराची होती. किचनमधला बॅड कूक जसा त्याच्या अवजारांना दोष देत बसतो अगदी तसेच धाराकडून भांड्यांवर भांडे आदळत होते. कुठे तरी तिच्या मनात एक पाऊस दाटत होता अन् कुठे तरी आभाळ फक्त मिश्किल हसत होता.
जरा वेळाने पुन्हा असेल अंबर तर येवून बघते. युझर ऑफलाईन पाहून जरासे मन तिचे खट्टू होते. फक्त "sorry..!" वाचून तिची कळी उमलते. अजुन नको ताणायला म्हणत अंबरच्या प्रोफाईलचे पुन्हा निरिक्षण करते. अगदी नकळत ॲड् टॅबवर क्लिक होते अन् मैत्री प्रस्ताव तिच्याकडून धाडले जाते. तासाभरा पुर्वीचा चॅट पुन्हा पुन्हा वाचत उगाच स्वत:ला इडीयट स्टूपीड म्हणत हसत बसते.
क्षणभर थांबून अंबरचा प्रोफाईल पिक्चर चाळते. वाळलेल्या झाडावर नव्याने उमलून येणा-या पालवीला रसिका सारखी बघत राहाते. अव्यक्त भावना मग मंत्रमुग्ध होवून शब्दात व्यक्त होत जातात. बुद्धी तरी एकदा बुचकळ्यात पाडते अन् शेवटी डोक्यात धुडगुस घालून मनात रुतलेल्या त्या एका क्षणभरच्या ओलाव्यात स्वत:ला हरवून बसते.

"पहिली पालवी पाहिली
माझी मी मग हरवून गेली,
जगा वेगळी भेट तुझ्याशी
का माझी आठवण बनली

धिटाई तुझी मी ओळखली
अन् माझीच मी न राहिली,
काय तू न काय मी म्हणत
ही ओढ कसली रे लागली..!

कसे बसे उतावळेपणाने दोन घास घशाखाली ढकलून धारा पुन्हा अंबरच्या उत्तराची वाट बघत बसली. तिच्या मागे गेलेला अंबर आता परत यायला हवा होता. हुरहुर दाटलेल्या धाराच्या मनात एकदा डोकावून बघायला हवा होता. एकदा उशीराणे का असे ना किंवा घाईत गडबडीत का असे ना वेळ काढून ऑनलाईन येवून मॅसेज तरी वाचून जायला हवा होता.
उत्कंठेत धाराची ती रात्र सरते. पाहाटे उठल्या उठल्या पुन्हा तपासते. आलाच नाहीस ना यंत्राशी बोलते. अनइच्छेने अंबरचा विचार बाजुला ठेवून आवरुन ऑफीसला निघते. कामातही लक्ष कुठे असते तरी दुपारच्या वेळी आलेल्या त्या मॅसेजला आठवून हसते. आज दुपारी काय बोलेल, काय म्हणेल सोडून कसं वाटलं असेल याचा विचार करुन मोहरुन येते.
दुपार टळून सांज होण्यात असते. थोडा अवकाश काढून स्वत:च्या होम पेजवर फेरफटका मारते. अपेक्षीत असलेलं तेव्हाही काहीच नसत. बिझी असेल स्वत:ला समजावत कामात गढून जाते. सांज होते धावत पळत घर गाठते. चहा उकळायला ठेवत लॅप्पीच्या स्क्रिनवर वाट पाहाणारी धाराची नजर स्थिर होते. काहीच हालचाल नाही कदाचित मी लवकर आले म्हणते. फ्रेश होवून ब्रेड-चहा घेवून अंबरच्या स्वागतासाठी स्वारी काकूळतीने वाट बघत राहाते. चहा गार होवून जातो. ब्रेड तसाच राहातो वाट बघायची हद्द संपुन धाराचा तिळपापड उडतो.
"व्हेअर आर यू मिस्टर स्ट्रेंजर?..."
व्हेअर एव्हर यू मे आर जस्ट बी ऑलराईट..! बाय..!

रातीला निजतांना पुन्हा धाराची एक फेरी होते. काहीच नाही असं कसं? आहे कुठे हा नेमका? माझं तर काही चुकलं नाही पुन्हा सारे पडताळून बघते. चुक त्याचीच मी माझ्या जागी बरोबर पण हा असा अचानक गायब?... गेला तरी कुठे..? अंबरचा प्रोफाईल पिक्चर सेव्ह करुन धाराच्या लॅप्पीचा पहिला 'wallpaper' सेट होतो. "आहेस कुठे रे?.." न राहावून पुन्हा भावना उफाळून येतात..!

तुझी पहिली पालवी
खुरडून काढलीस का,
करुन पाकळी पाकळी
समाधान मानलेस का..?
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा..!)

Wednesday, April 16, 2014

सुचना..! :-)

:-)
क्षण..!

सुचना..!

माझे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे म्हणून प्रांतवादावर फुकट ताशोरे ओढून, घुसमटत असलेल्या मराठी माणसाच्या भावना, उफाळून बाहेर काढण्यात मला काही एक सोयरे सुत्तक वाटत नाही. अर्थात 'राज'कारणाचा भावनिक मुद्दा ज्याने-त्याने आपापल्या सोईने चमचमीत बनवावा. नको असतो तो अर्थ काढावा अन् 'लाज वाटते का बोलावे' त्यापेक्षा ज्यांनी 'मराठी भाषा चळवळ' उभी केली आहे त्यांना पाठींबा द्यावा. व्यक्त होणारी माझी मराठी भाषा दर वेळी परप्रांतियांवर टिकास्त्र म्हणून मैदानात उतरवण्यात मला काहीच कणवं वाटत नाही. काही कारण नसतांना उगाच चामडे ओढून आणि टोमणेबाजी करुन स्वत:चा अमुल्य वेळ वाया घालवू नये अपमान होईल. मराठीचे माजलेले अन् तापट ठेकेदार बरेच आहेत त्यांना पाचारण करुन मुरलेल्या शौकीन मुसद्यांनी झाडावर चढून आस्वाद घ्यावा. जमते तेव्हढे वेळो वेळी अथवा प्रसंगावधान राखून माझी लेखणी कार्यन्वयीत होत असते. यात गर्व-माज-अभिमान काही एक नसुन मराठी 'स्वाभिमान' आहे याची दखल घ्यावी..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, April 15, 2014

सावली..! :-)

क्षण..!

चालायला लागल्यावर दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट आपल्या वाटेतून काही गोष्टी स्वत:ला बाजुला करवून घेतात. दुसरी गोष्ट काही गोष्टी-व्यक्ती-हट्ट-जिद्द-स्वप्न-क्षण अन् अनुभव आपल्यासोबत चालत राहातात. कायम स्वरुपी एक सावली अथवा काळजी म्हणून..!
--------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

दुर्वा..! :-)

"दुर्वा" थोडी थोडी करत जास्तच गुंतागुंत होत चाललीये मालीकेची. भुपतीच्या हत्ये नंतर अदितीची हत्या काय झाली. एक प्रकरण निस्तारत नाही तर दुसर उभ राहातय. सावळा गोंधळच चालू ये लेखकाचे कसब छान आहे गुंता वाढवलाय पण तो अतिच वाटतोय ताणून धरावे पण उत्कंठेचा अंत करु नये येव्हढेच वाटते. बाकी एपीसोड वाढतोय पण वर्तुळ तिथेच घुटमळतय वाढतही नाही न सुटतही नाही..!

बघु या! कौशल्य पणाला लावलेच आहे तर गोंधळातही कुठवर निभाव लागणार आहे अन् कसा लागणार आहे..! :-)

----------------- © मृदुंग

शब्द खेळ..! :-)

क्षण..!

शब्द खेळ..!

दिल्या घेतल्या वाचनांची
शप्पथ तुला आहे..! च्या धर्तीवर वाचावे..! :-)

दिल्या घेतल्या जखमांची
वेदना माझ्यात आहे..
निसटल्या हळव्या क्षणांची
ओढ या मनाला आहे..
अंधारलेल्या दाही दिशांची
ही सवय कुणाला आहे..
वठलेल्या त्या गुलमोहराची
ती झळ वसंताला आहे..
गंधाळलेल्या उष्ण श्वासांची
उब माझ्या उशीला आहे..
ओघळलेल्या त्या आसवांची
ही ओल काजळाला आहे..
चुरगाळलेल्या या कागदाची
शब्द फुलांना जाण आहे..
मिटल्या चाफेकळी पापणीची
भुरळ मला क्षणभर आहे..!
.
दिल्या घेतल्या उष्ट श्वासांचे
'गणित' सांग कसे सोडवायचे,
चाड न चारीत्र्य शब्दांना नव्हे
ठेवणीतले 'अर्थ' कुणा द्यायचे..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

काही ऐकव..! :-)

क्षण..!

काही ऐकव..!

काय ऐकवू तुला
वठलेला गुलमोहर,
कि बाधित मोगरा
कि प्राजक्ताच जहर

एक सोडून अनेक
पर्याय माझ्या जवळ,
निवड तुझी आवड
ते तर अबोल वादळ

कधी घे फक्त आस्वाद
मुक्या हुंदक्यांचा संवाद,
कागद न शब्द हे बरबाद
घरचाच काळोख वस्ताद..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, April 11, 2014

मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : सहा)

क्षण..!

मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : सहा)

पुन्हा दिवस जरा वेगात सरत आहेत. एखादी वेळ एखादा क्षण कधी सरुच नये वाटत असते, तोच क्षण तिच वेळ लागोपाठ सरुन जाते. थांबवावे वाटते अन् क्षणभर पुन्हा जवळ घ्यावे वाटते. गुंतली होती बोटात बोटे तशीच आज वेग-वेगळी बेटे. तू ही तिकडून चालत नाही. मी ही इकडून चालत नाही. अंतर तसेच अबाधीत आजही काही केल्या कमीच होत नाही..!

(मी)
नको जावूस सोडून आज
मैफलीत ठेव माझी लाज,

होवू दे झालीच जरी सांज
बनू नकोसच तू दगाबाज,

कैक होते इथेही सरताज
तू फक्त माझ्यातच गाज,

अजुन काही नको आज
रंग तुझे ओंजळीने पाज..!

(ती) तू वेडा आहेस का? उशीर होतोय माहित आहे तुला. निघते वेळी तुझे रोज असेच असते. एक-एक क्षण करत रातीला गडद करायचे असते. मला सोडून चांदणं मग बघत राहातोस. चंद्र दिसला कुठे तर मला दाखवत राहातोस. माझं आभाळ माझं चांदणं तुच तर आहेस स्पर्शाचे अंतर मिटवून तुझ्याच मिठीत मला ठेवले आहेस. सैल करुन मिठी खांद्यावर डोक ठेवून शतपावली करत घराची वाट धरते..!

किती बंर असतो रे तुझा शब्द खरा
जेव्हा बघावं तेव्हा तुझा हा नखरा

मागे-पुढे घुटमळत तू करतो पसारा
पदराच्या आभाळात फुलवतो पिसारा

रागावते तुला मारतेही शब्दांचा मारा
फक्त मिठीत घेवून देतोस मला शाहारा

सुखावतो तू माझा रोम-रोम रे सारा
नकळत डोळ्यात अश्रू घेतो रे आसरा..!

एकमेकांच्या भरुन आलेल्या डोळ्यात बघत, शुन्यात हरवून दोघेही चालत राहातात. प्रेमाचे वेडे सगळेच असतात. एकतर्फी असो अथवा दुतर्फी सजलेली वाट असो, हवं कुणाला नको असतं..?

(कोरस)

एक वाट सजलेली असते
एक लाट तहानलेली असते
अनोळखी सारे प्रवासी इथे
प्रवासच तर बनून जात होते

(मी)
काय होते माझ्याजवळ
काय होते तुझ्याजवळ
बनुन आपण एकमेकांचे
घडवले आयुष्याचे वादळ

(ती)
तुझं-माझं करु नकोस
आपलं हे अस्तित्व आहे
आयुष्याच्या एका गाडीचे
हे दोन चाकं वास्तव आहे

(मी)
नाही कुठे बंर मी म्हणालो
तुझ्यातच तर मी सामावलो
विरोधात नाहीच गं मी गेलो
आजच जरा भानावर आलो

(ती)
आयुष्य तुझ्यासोबत सुंदर
श्वासांच कुठे रे आहे अंतर
हौस-मौज पुरवतोस माझी
तरी उगाचेच म्हणते नंतर

(मी)
हा प्रवास कधीच संपला
पाय घरालाच आहे लागला
दुर तू नाही जवळच आहे
उंबरठा माझा तू ओलांडला

(ती)
भलतेच लाड तू पुरवले
शब्द अन् शब्द गिरवले
हिरवले नाही रे मी तुला
तू मलाच तर तुझे केले

(कोरस)
अशी अंधारली ती खोली
मिठीही पुन्हा चुरगळलेली
बनूनच साखर आयुष्याची
मनातच आहे विरघळलेली

प्रवाह वाहात राहातो अन् आयुष्याला पुढे नेत राहातो. दिवसा मागून एक दिवस येतो, रात्री मागून एक रात्र येते. चालढकल करत रस्त्यावरच घर लागत असते. प्रवास सुरुच असतो झालं-गेलं नवंच समोर असते. नकळत भरुन येतात डोळे स्वत:चे, स्वत:लाच जेव्हा स्वत:चे सुख भर-भरुन मिळत असते..!
.
------- समाप्त -------
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Sunday, April 6, 2014

स्वगत..!

क्षण..!

स्वगत..!

साळसुद लिखाणासोबत रसिक तर तयार होतात. कधी एखाद्या समिक्षीकेच्या भुमीकेत शिरुन स्वत:चा विद्रोही अन् टिकाकार जन्माला घालून पाहावे. आपलं लिखाण चौफेर फिरते त्यानंतर विषयांचे भरमसाठ ढिग डोळ्यासमोर लागतात. गुदगुल्या करणारे शब्द जेव्हा अंगाची नव्हे मनाची लाहीलाही करुन आत्म्यावर ओरखडे उमटवतो तेव्हा शब्दांचे वारसाहक्क मिरवणारे सळो कि पळो करुन सोडतात त्या वेळेस स्वत:तला परिपक्व अन् अनुभवी कलाकार टिका टिप्पण्यांवर साजेसे अन् चपराख युक्त शब्दांची उधळन करुन प्रतिस्पर्ध्याला नामोहराम करण्याची कुवत स्वत:जवळ ठेवतो हे दिसून येते. यात नकळत नाही तर जाणून बुजून स्वत:चा वेगळा दर्जा अन् स्वत:चीच उपजत श्रेणी ठरवायला तसेच विविधतेचे आकलन सहज स्वत:लाच घडवून आणायला उपयोगात येत असते. प्रवाहासोबत जाण्यात थकवा असतो तर प्रवाहा विरोधात जावून अस्तित्व अन् वाचक घडवण्यात जिद्द पणाला लागली असते तेव्हाच कागदाचे, शब्दांचे अन् वाचाकांचे समाधान होवून शांतताही टाळ्यांचा 'गजरात' गोंधळ आणि श्रोता वर्ग यांची उपस्थिततेची जाणीव आपल्याला करुन देत असते..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-4)

:-)
क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-4)

अंबर सारखाच धाराचाही दिवस गडबडीत गेला. तिच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार चहा सोबत ब्रेडचे लचके तोडत फेसबुकावर तिचे आगमन झाले. अंबरचा मॅसेज वाचुन चहाचे तापमान तिच्या तळपायापासून मस्तकात ठनकले. लॅप्पीच्या कि-बोर्डवर खटखट करत तिचा राग अंबरसाठी लिहित असलेल्या मॅसेज मध्ये व्यक्त होवू लागला..!

"हातखंडा वगैरे काहीच नाही तुमच्या प्रश्नावर दिलेले माझे उत्तर नाही मत आहे असे समजा. और रही बात दोस्ती के रिश्तों कि तो बहोत बुरा लगा दोस्ती के लिये आपकी सोच जाणकर...नाजायज!....खैर आपको कोई नसीहत नहीं देना चाहती क्युं कि जो दिल से नहीं बल्की फितरत से मजबूर होकर हाथ बढाये ऐसा इन्सान दोस्ती का असली मतलब समझे ये मेरी बेवकुफी होगी. और आपका बढाया हुवा हाथ मेरे लिये उलझन ही हैं. इस हाथ को थाम कर दोस्ती का असली रंग दिखावू या फिर दोस्ती को नाजायज समझने वाले का हाथ झटका कर आगे बढ जावू. फिर सोचती हूं जो दिल खोल कर नो ऐंट्री का बोर्ड लगा दे ऐसे दरवाजे से आगे बढ जाना ही बेहतर. जाते जाते इतना जरुर कहूंगी कुछ खोने का डर दिल में लिये फिरोगे तो कुछ भी हासील नहीं कर पाओगे और वजुद ऐसा बनाओ जिसकी दुनिया कदर कर सके..!"
मिस्टर स्ट्रेंजर बाहोत भारी पडेगा, विजयी मुद्रेने धारा एंटर करते. एकदा काय लिहिले परत वाचते अन् संतुष्ट होते. एक क्षण जातो अन् मॅसेज सीनचा राईट मार्क तिला दिसतो..!

धाराचा मॅसेज वाचून अंबर अपेक्षीत असलेलाच मॅसज आला या तर्क वितर्काच्या आनंदात मॅसेज वाचतो अन् तत्परतेने प्रतिसाद लिहू लागतो.
"किती छान चिडता हो, अगदी नजर लागण्यासारखेच. असो, वाढवण्यात काही अर्थ नाही जर तुम्हीच माघार घेवून अलिप्त आणि दुर राहात असाल तर आनंदच आहे. और वैसे भी अगर आपके दिल में थोडी चाहत मेरे लिये ना होती तो आप जवाब देने कि जहेमत ना उठाती. बाकी मर्जी आपकी जो चाहे कर लो. हम तो बदल देते हैं जमाना और खातीर के लिये थोडा बदलाव आपके चेहरे पे भी ये पढ कर उभर राहा होगा जिसे आप गुस्सा और मैं अपनी याद समझ राहा हूं. अब इस बात पर कोई जुल्म मत उठाना खुद पर मुझसे तो साहा जायेगा लेकीन परेशानी आपको होगी. इसमे आप भी कुछ कर नहीं सकती हर झगडालू औरत कि यह फितरतही होती हैं. अपनी खुबसुरती बढाने के लिये..!

धारा : जी जवाब देने कि जेहमत मैने इसलीये उठाई क्युं के आपने दिस्ती के रिश्तों को बहोत निचे गिरा दिया था उस रिश्ते को "नाजायज" कहा जिसे आपको छोडकर सभी पाक समझते हैं. खैर आप क्या समझोगे और मैने जवाब दिया इसका मतलब ये नहीं के आपके लिये मेरे दिल में कोई चाहत हो.. रही बात मेरी फितरत और खुबसुरती कि तो इन दोनो को बढाने के लिये मुझे आपकी जरुरत नहीं और ना ही आपके साथ झगडने कि...अलिप्त राहून आनंद तुम्हाला होतोय तर दु:ख मलाही नाही..!

अंबर : मग का आणि कशाला उत्तर देत बसला आहात आपण समजू शकेल का?

धारा : मी तर शेवट करायचा बघते.. पण सुरुवात का केली तुम्ही हे कळेल का मला?

अंबर : (सटपटतो) कारण...

धारा : कारण?......

अंबर : शेवट होणार... नाही...हे सुरुवातीला माहित नव्हते.

धारा : सुरुवात जर चांगली केली असती तर नक्कीच शेवट इतक्या लवकर नसता झाला...

अंबर : चांगल्या गोष्टी लवकर संपतात...ॲज लाईक युवर टी... बट वाईट गोष्ट तुमच्या रागा सारखी नाकावर टिच्चून असते कायम स्वरुपी....

धारा : नको ते ऐकले कि हा राग असाच राहातो...

अंबर : कदाचित आज पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या रागाचा त्रास होतोय असे दिसतेय... कि याची जाणीव आज झाली पहिल्यांदा?...

धारा : इतरांच्या रागाचा त्रास इतका नाही होत... जितका स्वत:च्या रागाचा होतो... अन् ही जाणीव खुप आधीपासून झाली आहे मला.

अंबर : मग आज स्वत:चा इतका राग का आलाय? कळेल का?...

धारा : Sorry, खुप वेळ घेतला मी तुमचा... Bye...

अंबर : Hey, Don't be sorry... काय झाले समजू तरी द्या...

धारा : काही समजुन घ्यायची गरज नाही..ज्याला मैत्री नाही कळत त्याने तर कोणाचा रागही समजुन घ्यायची तसदी घेवू नये... So bye i have to go now...

अंबर : I hate this igo... as you wissh...bye

धारा : Bye

अंबर : Bye!
(दोन मिनिटांनी) गेली..?

धारा : आहे पण रिप्लाय नाही देणार...(स्वगत: कसला घमंडी आहे हा एक तर सुरुवातीला नको ते बोलला अन् sorry बोलायचे सोडून मलाच igo आहे म्हणतो... मुर्ख बावळट कुठला)

अंबर : कसली आहेस ना श्या..! (स्वगत: जा आता मी पण रिप्लायच नाही देणार विचारले काय झाले काय prob..आहे... दुनियाभराची अक्कल काढून झाली पण एक चुक नाही दाखवता आली...मंद इडीयट)

धारा : (स्वगत) मी नाही आता रिप्लाय देणार... त्याला स्वत:ची चुक स्वत: कळायला हवी मी का सांगू...पण मी याचा विचारच का करते... इतका विचार करुन ऑफलाईन निघुन जाते..!

युजर ऑफलाईल बघुन अंबर पुन्हा एक ऑफलाईन मॅसेज लिहून ठेवतो..!

"Sorry..!"
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)