क्षण..!
अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा)(भाग-3)
रात्रीच्या अंधारात अंबर धाराचा विचार करत कधी निजला त्याचे त्याला कळले नाही. उजाळलेला दुसरा दिवस धावपळीत गेला. दमलं-भागलं शरीर घेवून तो घरी येवून पोहोचला. दिवसभराच्या कामाच्या व्यापात धाराचा विचार जो बाजुला झाला होता तो विचार सहज मनाच्या दारावर टकटक करुन गेला. लॅप्पीच्या कि-बोर्डवर त्याची बोटे सराईत फिरु लागली. होम पेज ओपन होताच मॅसेजेस् मध्ये त्याच्यासाठी धाराचा एक ऑफलाईन मॅसेज वाट बघत होताच.
"मैं तो नहीं कहूंगी के आपसे मिलकर मुझे बुरा लगा हो, पर एक बात समझ नहीं आयी, एक तरफ दोस्ती का हाथ बढा दिया और दुसरी तरफ कहते हो किसी रिश्ते के लिये जगह नहीं, क्या आपकी नजर में दोस्ती रिश्ता नहीं केहलाती? और दिल के दरवाजे तभी खोलना जब अंदर आने की इजाजत दे सको.."
एकदा वाचले दोनदा वाचले समाधान काही अंबरचे होत नव्हते. वाचनाची शतकी खेळी पण खेळून झाली. विकेट काढावी कशी त्याला कळत नव्हते. काही रिप्लाय द्यायचा कि, नाही द्यायचा? छे! मर्गळ आलीये आधी फ्रेश होवू मग चिरफाड करु. उठून आवरायला अंबर निघून जातो. शांत होवून न टवटवीत होवून पुन्हा धाराच्या रिप्लायमध्ये डोक घुसवतो. नाही डोक तोंडावर पाडेल मला. मनाचाच आधार घ्यावा लागेल. समोरचा शत्रू तगडा आहे अन् त्याचे पारडे सुरुवातीलाच भारी झाले आहे. इथे बुद्धीचा निभाव लागेल असे वाटत नाही. तसे तर सोडून मोकळाही होवू शकतोय. पण माहित नाही का रिप्लाय मधला एक एक शब्द मनाला गुदगुदल्या करतोय. अध्ये-मध्ये जागा होणारा त्याच्यातला कवी आज खुशाल कवितेचा फक्त आस्वाद घेतोय. बजावतो स्वत:ला प्रतिद्वंदी-प्रतिस्पर्धी टिकाकार भेटला बाळा तुला. मोजक्या शब्दात सहज धारेवर धरले तुला. हार माणायची नाही उत्तर द्यायचेच. मग घाव वर्मी लागले तरी पर्वा नाही करायची.
"क्या बात हैं मिस ऑक्सफर्ड या ही प्रांतात तुमचा हातखंडा असेल असे वाटलेच नव्हते. खैर..! दोस्ती के रिश्ते तो नाजायज होते हैं, मतलब पे आके और अपने मुकाम पे आके एक दिन बिछड जाते हैं और बिखर जाते हैं, हाथ बढाने कि फितरत से मजबूर होकर हम ने तो हाथ बढा दिया, रिश्तों का खयाल जहेन में आकर दोस्ती का सवाल अधुरा छोड कर आपने तो रिश्तों पर जोर दिया हैं, जैसे हमने कोई आसान रिश्ता ना मांग कर कोई उलझन मांग ली हो आपसे. कोई बात नहीं, दिल के दरवाजे तो खुले ही हैं पर डर लगता हैं कहीं खेल खेल में दिल खो ना जायें या तुट ना जायें, दिल लगा भी ले वजुद सेहम ना जायें..!
एंटर करतो तर युझर ऑफलाईन, पाच एक मिनिट रेंगाळून भुक लागलीये म्हणत किचन मध्ये उलथापालथ करायला निघुन जातो..!
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
(नोंद: कथा काल्पनिक आहे याचा अस्तित्वाशी ताळमेल आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)
No comments:
Post a Comment