क्षण..!
शब्द खेळ..!
दिल्या घेतल्या वाचनांची
शप्पथ तुला आहे..! च्या धर्तीवर वाचावे..! :-)
दिल्या घेतल्या जखमांची
वेदना माझ्यात आहे..
निसटल्या हळव्या क्षणांची
ओढ या मनाला आहे..
अंधारलेल्या दाही दिशांची
ही सवय कुणाला आहे..
वठलेल्या त्या गुलमोहराची
ती झळ वसंताला आहे..
गंधाळलेल्या उष्ण श्वासांची
उब माझ्या उशीला आहे..
ओघळलेल्या त्या आसवांची
ही ओल काजळाला आहे..
चुरगाळलेल्या या कागदाची
शब्द फुलांना जाण आहे..
मिटल्या चाफेकळी पापणीची
भुरळ मला क्षणभर आहे..!
.
दिल्या घेतल्या उष्ट श्वासांचे
'गणित' सांग कसे सोडवायचे,
चाड न चारीत्र्य शब्दांना नव्हे
ठेवणीतले 'अर्थ' कुणा द्यायचे..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment