क्षण..!
अ फेसबूक लव्ह स्टोरी..!(कथा)(भाग-1)
सोशल साईट ॲडव्हान्स आणि अप टू डेट असण्याचे हे दिवस. आंघोळीला जाण्यापासून प्रात:विधीचेही स्टेटस निलाजरेपणा सारखे हल्ली अपडेट होतात. "What's on your mind?" च्या नावाखाली सामान्य मानसाला तर ही पर्वणीच. काही येत नसेल तर आयुष्याच्या आज मध्ये घडणारी एखादी गोष्ट सहज मांडून जगभरात पोहोचण्याचे अगदी सोईस्कर माध्यम..!
शाळा, college येव्हढेच काय ऑफिसील वर्कही हल्ली इथे सर्रास शेअर होतात. भले कुणाचा याच्याशी काडीचाही संबंध नसो, वाचले अन् डोक्यात शिरले तर मदतीचे दहा काय शेकडो हात कमेंट्स मध्ये उपलब्ध होतात. विचार अन् मदतीची पद्धत देशी-विदेशी वेग-वेगळी. करमणूक करता करता आयुष्याचा भावी जोडीदार निवडणे येव्हढेच काय साधी गर्ल फ्रेन्ड हवी आहे पासून इथे स्टेट्स अपलोड(पोस्ट) आहेत.
चांगले-वाईट अनुभव तसेच किचन मधल्या रेसिपिंचीही इथे चंगळ आहे. सद्य मोबाईल वरुन प्लेस लोकेशन ते मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमा. लिसनिंग songs ते फिलिंग सॅड पर्यंत हरएक सुटसुटीत सुविधा हवे ते म्हणण्यापेक्षा वाट्टेल ती मुभा. कुणाला रुचले नाही, पटले नाही block ऑप्शन दिमतीला.
आयडेंटीटी व्यक्तीमत्व प्रायव्हसीच्या नावाखाली हाईड झालेली अथवा करुन ठेवलेली. वर्तुळ प्रत्येकाचे इथे असतेच. मित्र-मैत्रीणी अन् रक्ताची नातीही या वर्तुळात भटकत असतात.
असेच भटकत कधी हाती गुलाबाचे फुल लागते अथवा दगडही लागतात. जितक्या झटपट इथे काही मिळते तितक्याच झटक्यात वेगळेही होते. पण ते दोघेच नव्हे तर बरेच जन इथे रिलेशनच्या बाबतीत सिरियसली पुढे चालतात. काही यशस्वी होतात तर काही अपयशी. इथे सगळ्या चौकटी अन् संस्कार असुनही नवजात शिशू सारखे ते नागडेच वावरतात. बंधने असतातच पण मिळालेली अन् सहज उपभोगता येणारी मोकळीकता कोण नाही उपभोगणार. ते बिंधास्त मन मौजी इथे वावरतात तर वास्तवात पदराचा काठ सांभाळून असतात. सुरुवातीला अवघडलेले इथे पुढे सराईत वागू लागतात.
अश्याच एका वर्तुळातल्या ग्रुप मध्ये एक न्यु कमरचा एक स्टेटस अपलोड होतो
"hey! friends my self ambar.." अन् त्याच्या स्टेटसवर त्वरीत एक कमेंट येते. hey! hello i am also new here, myself Dhara.."
.
क्रमश:
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment