क्षण..!
अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा)(भाग-2)
क्षणभरात आलेल्या धाराच्या कमेंटवर अंबर चापापला. विचारी माणूस करणार तरी काय? सरळ तिच्या प्रोफाईल अबावूट मध्ये धुडगुस घालू लागला. नाव धारा सरदेसाई, लोकेशन लंडन आणि एज्युकेशन स्टेटस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (howords ठेवण्याची तिव्र इच्छा असुनही ऑक्सफर्ड ठेवले कल्पनेला बंधने कसली?) प्रोफाईल पिक्चर एक पिवळे गुलाब. कव्हर पिक ब्रिटीश फ्लॅग. अबावूट मी मध्ये इनमीन चारच ओळी. I am simple girl with stylish attitude, quite frindly and short temperd. Watch your feet when you walk on my lighting street's. I don't care if you lost your self..! बर्थ डेट 7 नोहेंबर, होमटाऊन लोकेशन पुणे. लास्ट ॲक्टिव्हिटी ट्रॅव्हेल्ड टू लंडन (दोन महिन्या पुर्वी). नो म्युच्युअल फ्रेन्ड्स इफ यू क्नो धारा सेंड हर मॅसेजचा फेसबूक pop-up.
धाराचीही काहीशी अशीच धुडगुस अंबरच्या प्रोफाईल मध्ये. नाव अंबर अत्रे. लोकेशन इटली वर्कींग आयटी रिसर्च ॲन्ड डेव्हलोपमेन्ट लिगल ॲडव्हायझर. प्रोफाईल पिक वाळलेल्या झाडावर उमलणारी दोन हिरवी कोवळी पाने. कव्हर पिक किनारा. बर्थ डेट 15th नोव्हेंबर. होमटाऊन लोकेशन अहमदनगर. नो म्युच्युअल फ्रेन्डस अबाऊट मी मध्ये एकच ओळ "सोच भी नहीं सकते..!" ॲड फ्रेन्डची टॅब अन् फेसबूकचा pop-up सेन्ड मॅसेज टू अंबर इफ यू क्नो हिम.
क्वालीफीकेशन इंप्रेस करण्यासारखे असले तरी व्यक्तीची ओळख, स्वभाव अन् त्यांची समजदारी यावर काही गोष्टी अवलंबून असतात. जसे फेसबूक म्हणटले तर फ्रि-माईन्डेड स्वत:ला म्हणवणारे नेहमी बुरसटलेल्या विचारसारणीला प्राधान्य देतांना आढळून येतात. ओळखी-पाळखी जरी क्षणभरात होत असतात तरी पहिले ॲट्रॅक्शन अन् अटेन्शन काही औरच.
दहा मिनिट झाली असतील-नसतील. अंबरने प्रतिसाद काही दिला नाही. न त्याच्या स्टेटसवर आलाही नाही. उशीर झालाय म्हणत धारा ऑफलाईन गेली. पंधराव्या मिनिटाला अंबरचा मॅसेज तिच्या inbox मध्ये येवून पडला. "h! मिस ऑक्सफर्ड, नाईस टू मिट यु. दोस्ती के लिये दरवाजे खुले हैं, रिश्तों के लिये फिलाल जगह नहीं हैं, जब चाहे आ जायीये, जरुत ना समझ कर बस पेहचान मेरी यहां रख लीं हैं." एन्टर करुन बघतो तर युझर ऑफलाईन. पाच एक मिनिट रेंगाळून तो ही निघून जातो..!
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
(नोंद: कथा अन् पात्रे काल्पनीक आहेत. यांचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
No comments:
Post a Comment